मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ही आहेत पुण्यात राहण्याची सर्वात वाईट ठिकाणे !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
ही आहेत पुण्यात राहण्याची सर्वात वाईट ठिकाणे !!

मंडळी पुण्यात घर घेताय किंवा भाड्याने राहायला जाताय? थांबा!! पुण्यातली ही दोन ठिकाणं सोडून कुठेही घर घ्या भौ!! या दोन भागांची नावे आहेत हडपसर आणि लोहगाव. हे दोन्ही भाग म्हणजे राहण्यासाठी सर्वात अयोग्य आहेत. नाही, असं आम्ही म्हणत नाहीये बरं का, नाही तर पुणेकर चिडतील. असं खुद्द पुणे महानगरपालिका म्हणत आहे.

पण राव, हे भाग एवढे वाईट का आहेत ? चला समजून घेऊया.

स्रोत

हडपसर आणि लोहगावात वायू प्रदूषण वाढलंय. हडपसर भाग हा आधीपासूनच सर्वात प्रदूषित भाग म्हणून ओळखला जातो. या भागातल्या हवेत नायट्रोजन प्रमाणाबाहेर आहे, तर लोहगाव भागात नायट्रोजन ऑक्साईड प्रचंड प्रमाणात आहे. त्यासोबतच हडपसरमध्ये हवेतल्या सल्फरची मर्यादा सुद्धा वाढलेली आढळून आली आहे. ही सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने त्यांच्या वार्षिक अहवालात सदर केली आहे.
सततचा ट्राफिक जाम आणि आजूबाजूला चालू असलेलं इमारतींचं काम यामुळे हवेत प्रदूषण पसरत जात आहे. यात दुसरा क्रमांक लागतो शिवाजीनगरचा आणि मंडईचा. हे वैज्ञानिक अहवाल आहेत असं जरी मानलं,  तरी तिथल्या लोकांच्या आरोग्यावरून या अहवालांना पुष्टी मिळते.

राव, या भागातील लोकांना दमा, खोकला, घश्याचे आजार तसेच डोळ्यांना त्रास होणे अशा आजारांना सामोरं जावं लागतंय. हे सर्व होतंय प्रदूषित हवेमुळे.

तर, या सर्व कारणांमुळे हडपसर, लोहगाव भागात राहणे टाळाच..

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलऑनलाईन खरेदीचा नवीन फंडा - ONDC!!!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

विक्षिप्त आणि विद्वान प्र.बा. जोग: ज्यांनी स्मशानात जाऊन 'ते' काम केलं!
लाइफस्टाइल

विक्षिप्त आणि विद्वान प्र.बा. जोग: ज्यांनी स्मशानात जाऊन 'ते' काम केलं!

विक्षिप्त आणि विद्वान या दोन शब्दात 'कहर' नावाचा आणखी एक शब्द टाकला की एकच नाव समोर येतं ते म्हणजे प्र.बा. जोग यांचं! यांच्या हुशारीचे आणि विक्षिप्तपणाचे किस्से एकत्र केले तर एक पाचशे पानाचं पुस्तक होईल.

३ नोव्हेंबर, २०२६

अल्बानियाची 'बर्नेशा' परंपरा: जिथे स्त्री पुरुष म्हणून जगण्याची शपथ घेते
लाइफस्टाइल

अल्बानियाची 'बर्नेशा' परंपरा: जिथे स्त्री पुरुष म्हणून जगण्याची शपथ घेते

अल्बानियातील 'बर्नेशा' परंपरेत स्त्रिया पुरुष म्हणून जगण्यासाठी जन्मभर कुमारिका राहण्याची शपथ का घेतात? जाणून घ्या या अजब प्रथेबद्दल.

१० मार्च, २०२६