मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

मिसाईलपासून ते स्कूटरपर्यंत... ३९ वेळा नापास झालेल्या एका 'फॉर्म्युल्याची' गोष्ट!

4 मिनिट वाचन

रॉकेटला गंजण्यापासून वाचवण्यासाठी सुरू झालेला शोध ३९ वेळा अपयशी ठरला आणि चाळीसाव्या प्रयत्नात WD-40 चा जन्म झाला.

शेअर करा:
मिसाईलपासून ते स्कूटरपर्यंत... ३९ वेळा नापास झालेल्या एका 'फॉर्म्युल्याची' गोष्ट!

मिसाईलपासून ते तुमच्या पावसाळी स्कूटरपर्यंत... ३९ वेळा नापास झालेल्या एका 'फॉर्म्युल्याची' भन्नाट गोष्ट!

१९५३ सालची गोष्ट आहे.एका बाजूला अमेरिकन सरकार रशियाला धडकी भरवण्यासाठी अक्राळविक्राळ 'ॲटलस' मिसाईल्स बनवण्याच्या कामात मग्न होतं, तर दुसरीकडे सॅन दिएगोमधल्या एका छोट्या लॅबमध्ये नॉर्म लार्सन नावाचा एक केमिस्ट सलग ३९ वेळा नापास होत होता. ज्या मिसाईल्सनी अंतराळात झेप घ्यायची होती, त्यांना गंज लागण्यापासून वाचवणारा एक फॉर्म्युला लार्सन शोधत होते, पण यश काही केल्या पदरात पडत नव्हतं.

विज्ञानाची कमाल बघा, जे रसायन अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या रॉकेटसाठी बनवलं गेलं होतं, तेच आज आपल्या घराघरात पावसाळ्यात जाम झालेली कुलुपं आणि अडकलेल्या चाव्या उघडण्यासाठी वापरलं जातं.पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की छत्री आणि रेनकोटसोबतच आजकाल सुजाण बाईकस्वारांच्या बॅगेत एक निळ्या-पिवळ्या रंगाचा कॅन दिसतो, तो म्हणजे WD-40®.

WD-40®. या नावामागचा किस्सा मोठा रंजक आहे. 'WD' म्हणजे 'Water Displacement' आणि '40' म्हणजे चाळीसावा प्रयत्न. नॉर्म लार्सन आणि त्यांच्या टीमने तब्बल ३९ वेळा वेगवेगळी मिश्रणं तयार केली,पण ती सगळी फेल गेली. शेवटी चाळीसाव्या प्रयत्नात त्यांना जे हवं होतं ते मिळालं आणि जगाला गंज घालवणारं एक अजब अस्त्र मिळालं.

सुरुवातीला हे रसायन फक्त 'रॉकेट केमिकल कंपनी'साठी बनवलं गेलं होतं. मिसाईल्सचे भाग गंजू नयेत आणि ते स्वच्छ राहावेत, हाच त्याचा मूळ उद्देश होता. पण कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात आलं की, हे रसायन तर जादूई आहे. ते चोरून आपल्या जेवणाच्या डब्यात भरून घरी नेऊ लागले.

कोणाच्या घराचा दरवाजा करकरत होता, तर कोणाचं सायकलचं चाक जाम झालं होतं. कामगारांनी घरी नेलेल्या त्या चोरट्या नमुन्यांनी इतकं भारी काम केलं की, नॉर्म लार्सन यांना आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागली. विज्ञानाची ही प्रगती फक्त रॉकेटपुरती मर्यादित न ठेवता ती सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

या प्रॉडक्टचं यश बघून अनेक कंपन्यांना त्याचा फॉर्म्युला हवा होता. पण नॉर्म लार्सन यांनी एक अजब चाल खेळली. त्यांनी WD-40® चं कधीही पेटंट घेतलं नाही. पेटंट घेतलं असतं तर त्यांना त्यात काय काय वापरलंय हे जगाला सांगावं लागलं असतं आणि १७ वर्षांनंतर कोणालाही त्याची कॉपी करता आली असती.

त्याऐवजी त्यांनी हा फॉर्म्युला एक 'ट्रेड सीक्रेट' म्हणून जपून ठेवला. आजही या रसायनाचा मूळ फॉर्म्युला सॅन दिएगोमधल्या एका बँकेच्या लॉकरमध्ये अतिशय सुरक्षित ठेवलेला आहे. कोका-कोलाच्या रेसिपीसारखंच हे एक असं गुपित आहे, जे जगाला माहीत असूनही कोणालाच बनवता येत नाही.

बरं, या प्रॉडक्टच्या जाहिराती हा तर एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. परदेशात याच्या काही जाहिराती थोड्याशा 'चावट' किंवा द्विअर्थी ढंगाने केल्या गेल्या, ज्या बघून कोणालाही हसू येईल. पण त्यामागे एकच मेसेज होता - "जर काही अडकलं असेल, तर ते सोडवण्यासाठी आम्ही आहोतच!"

मंडळी,आज जगभरात दररोज १० लाखांहून अधिक WD-40® चे कॅन विकले जातात. पावसाळ्यात जेव्हा तुमच्या गाडीचं लॉक जाम होतं किंवा खिडकीचा बिजागरी आवाज करायला लागते, तेव्हा हे चाळीसाव्या प्रयत्नात मिळालेलं यशच धावून येतं.नाही म्हणजे विचार करा, जर नॉर्म लार्सन ३९ व्या अपयशानंतर थांबले असते, तर आज आपल्याला पावसाळ्यात जाम झालेल्या चावीशी किती कुस्ती खेळावी लागली असती?

कधी कधी तुमचं मोठं यश हे तुमच्या ३९ अपयशांच्या अगदी पुढच्या पाऊलावर उभं असतं, नाही का?

पुढची गोष्ट
विज्ञान'या' मुंग्यांच्या दीर्घायुष्यामागचे धक्कादायक वास्तव- या अमरत्वाचे गुपित नक्की काय आहे ?एका परजीवी टेपवर्ममुळे कामगार मुंग्यांचे आयुष्य राणीसारखे विलासी आणि प्रदीर्घ होते, पण हे दीर्घायुष्य त्यांच्या वसाहतीसाठी घातक ठरते.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईन
विज्ञान

लाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईन

जॉर्ज क्लाईन यांची मोटराइज्ड व्हीलचेअर ही एक क्रांतिकारी निर्मिती होती. या शोधामुळे हजारो-लाखो माणसांना स्वतःच्या इच्छेने जगात फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

४ नोव्हेंबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

मृत्यूचं सोंग आणि जगण्याची धडपड: बेडकीची अनोखी 'नो मिन्स नो' पद्धत
विज्ञान

मृत्यूचं सोंग आणि जगण्याची धडपड: बेडकीची अनोखी 'नो मिन्स नो' पद्धत

प्रजननाच्या काळात नको असलेल्या नरांपासून वाचण्यासाठी मादी बेडूक कशा प्रकारे मृत्यूचं सोंग रचते, यावर झालेलं रंजक संशोधन.

२९ मार्च, २०२६

फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?
विज्ञान

फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?

फुलबाजी शांत आणि सुतळी बॉम्ब धडाम का? फटाक्यांचे रंग कुठून येतात, ग्रीन फटाके म्हणजे काय, आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारं स्टील वूल का पेटतं: दिवाळीच्या फटाक्यांमागचं सोपं विज्ञान.

४ नोव्हेंबर, २०२६

'Oh Be A Fine Girl Kiss Me' हे वाक्य कशासाठी वापरतात माहितीये का?
विज्ञान

'Oh Be A Fine Girl Kiss Me' हे वाक्य कशासाठी वापरतात माहितीये का?

'Oh Be A Fine Girl Kiss Me' ही एखाद्या इंग्रजी गाण्याची ओळ नाही. तार्‍यांच्या तापमानावरून त्यांचे वर्गीकरण लक्षात ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हे वाक्य!

३ नोव्हेंबर, २०२६