मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

फुलांच्या पाकळ्या गळाल्यावर सुरू होतो नवा प्रवास: ॲनिमोनचं 'दुसरं' रूप

2 मिनिट वाचन

पाकळ्या गळून पडल्यानंतर ॲनिमोन कोरोनारिया या वनस्पतीमध्ये निसर्गाचे अद्भुत इंजिनीअरिंग कसे सुरू होते, जाणून घ्या बियांच्या संरक्षणाची ही कथा.

शेअर करा:
फुलांच्या पाकळ्या गळाल्यावर सुरू होतो नवा प्रवास: ॲनिमोनचं 'दुसरं' रूप

फुलांच्या पाकळ्या गळून गेल्या की सुरू होतो एक नवा अदृश्य प्रवास-ॲनिमोनचं 'दुसरं' रूप:

बागेतली वेलीवरची सुकलेली फुलं अनेकदा कचरा म्हणून छाटून टाकली जातात. पण निसर्गाच्या दृष्टिकोनातून, हा शेवट नसून पुनरुत्पादनाचा सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा असतो.

ॲनिमोन कोरोनारिया' (Anemone coronaria) या वनस्पतीकडे पाहिल्यास हे सत्य प्रकर्षाने जाणवते.

हिवाळ्याच्या उत्तरार्धात आणि वसंत ऋतूच्या आगमनावेळी ही फुलं घरांची शोभा वाढवतात. मात्र, एकदा का या शोभिवंत पाकळ्या गळून पडल्या, की या झाडाचा एक वेगळाच अवतार समोर येतो. ज्याला वरवर पाहता 'सुकलेलं फूल' म्हटलं जातं, ते प्रत्यक्षात एका अत्यंत कार्यक्षम बियांच्या संरचनेत (Seed-bearing fruit stage) रूपांतरित होत असते.

या झाडाच्या देठाच्या टोकावर एक वैशिष्ट्यपूर्ण शंकूच्या आकाराची (Cone shape) रचना तयार होते. सुरुवातीला दुर्लक्षित वाटणारा हा भाग काही दिवसांतच एका मऊ, लोकरीसारख्या केसाळ आवरणाने झाकला जातो.विज्ञानाच्या नजरेतून पाहिलं तर हे केवळ सौंदर्य नाही, तर भविष्यातील पिढी टिकवण्यासाठी केलेली एक तांत्रिक सोय आहे. या बारीक केसाळ तंतूंमुळे वाऱ्याच्या मदतीने बिया दूरवर पसरण्यास (Seed dispersal) मदत होते.हे तंतू केवळ प्रवासासाठी नसून संरक्षणासाठीही असतात. वातावरणातील ओलावा आणि तापमानातील अनपेक्षित चढ-उतार यांपासून बियांचे रक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही नैसर्गिक 'लोकरी टोपी' पार पाडत असते. या संरचनेच्या मध्यभागी असलेल्या शंकूमध्ये शेकडो बिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रचलेल्या असतात, ज्या योग्य वेळेची वाट पाहत असतात.

मनोरंजक गोष्ट म्हणजे, मानवी डोळ्यांना जे 'कोमेजणे' वाटते, ते प्रत्यक्षात निसर्गाचे एक उत्तम 'इंजिनीअरिंग' असते. फुलांचा भडक रंग उडाला तरी या सूक्ष्म रचनेतील सौंदर्य आणि उपयुक्तता टिकून राहते. बाह्य आकर्षणापेक्षा अस्तित्वाचे सातत्य राखणारी ही आंतरिक रचना अधिक अर्थपूर्ण ठरते.

निसर्गाचा हा प्रवास स्पष्ट करतो की,रंगांची उधळण थांबली तरी निर्मितीचे कार्य कधीच थांबत नाही.

पुढची गोष्ट
विज्ञानप्राण्यांच्या जगात नको असलेल्या प्रेमाला नकार कसा दिला जातो?प्राण्यांच्या जगात नको असलेल्या नरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ड्रॅगनफ्लाय आणि इतर प्रजातींच्या माद्या चक्क मेल्याचं नाटक करतात!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'बेहया' ही शिवी नाही, तर निसर्गाचा सर्वात 'धीट' चमत्कार आहे!
विज्ञान

'बेहया' ही शिवी नाही, तर निसर्गाचा सर्वात 'धीट' चमत्कार आहे!

गावठी भाषेत ज्याला बेशराम किंवा बेहया म्हणतात, त्या आयपोमोया कार्निया वनस्पतीच्या जगण्याच्या अनोख्या जैविक ताकदीची गोष्ट.

९ जुलै, २०२६

अँथुरियम: ज्याला आपण प्लास्टिक समजतो, तेच खरं अस्सल 'रॉयल' फूल आहे!
लाइफस्टाइल

अँथुरियम: ज्याला आपण प्लास्टिक समजतो, तेच खरं अस्सल 'रॉयल' फूल आहे!

प्लास्टिकसारखे दिसणारे पण निसर्गाची किमया असलेले अँथुरियम फूल आणि त्याची निगा राखण्याच्या काही खास टिप्स.

१४ मे, २०२६

रातकिड्यांची किरकिर मोजून सांगा सभोवतालचे तापमान!
विज्ञान

रातकिड्यांची किरकिर मोजून सांगा सभोवतालचे तापमान!

रातकिड्यांच्या आवाजाच्या गतीवरून वातावरणाचे अचूक तापमान कसे मोजता येते? जाणून घ्या शास्त्रज्ञ डॉल्बिअर यांचा रंजक नियम.

२३ सप्टेंबर, २०२६

गोगलगायीच्या तोंडात १२,००० पेक्षा जास्त दात!
विज्ञान

गोगलगायीच्या तोंडात १२,००० पेक्षा जास्त दात!

आपल्या बागेत सरपटणाऱ्या निरुपद्रवी गोगलगायीच्या तोंडात रॅड्युला नावाचा अवयव असतो, ज्यावर हजारो सूक्ष्म दात सतत तयार होत राहतात.

२२ ऑगस्ट, २०२६

कीटकांच्या अंगातला 'एसी' आणि 'हीटर': निसर्गाचं अजब इंजिनिअरिंग
विज्ञान

कीटकांच्या अंगातला 'एसी' आणि 'हीटर': निसर्गाचं अजब इंजिनिअरिंग

कीटक स्वतःचे तापमान कसे नियंत्रित करतात? निसर्गाच्या या अजब इंजिनिअरिंगबद्दल आणि त्यांच्या 'कोल्ड ब्लडेड' आयुष्याबद्दल रंजक माहिती.

३० मे, २०२६