मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

गोगलगायीच्या तोंडात १२,००० पेक्षा जास्त दात!

2 मिनिट वाचन

आपल्या बागेत सरपटणाऱ्या निरुपद्रवी गोगलगायीच्या तोंडात रॅड्युला नावाचा अवयव असतो, ज्यावर हजारो सूक्ष्म दात सतत तयार होत राहतात.

शेअर करा:
गोगलगायीच्या तोंडात १२,००० पेक्षा जास्त दात!

आपल्या बागेत सहज दिसणारी गोगलगाय दिसायला अगदी निरुपद्रवी.,पण तिच्या तोंडात डोकावले—विशेषतः सूक्ष्मदर्शकातून—तर आश्चर्याचा धक्का बसतो. तिच्या तोंडात शेकडो नव्हे,तर हजारो अतिसूक्ष्म दात असतात.

हे दात आपल्या दातांसारखे जबड्यात बसलेले नसतात.गोगलगायीच्या तोंडात Radula (रॅड्युला) नावाचा एक लांब, रिबनसारखा अवयव असतो. या रॅड्युलावर अतिशय शिस्तबद्ध आडव्या रांगांमध्ये सूक्ष्म दात बसलेले असतात. प्रजातीप्रमाणे त्यांची संख्या हजारोंपासून १० ते १२ हजार किंवा त्याहूनही अधिक असू शकते.

रॅड्युला एखाड्या जिवंत “सॅंडपेपर”सारखा असतो. गोगलगाय पानाचा घास आपल्यासारखा चावत नाही.ती रॅड्युला अन्नाच्या पृष्ठभागावर पुढे-मागे फिरवते आणि त्यावरील सूक्ष्म दातांनी वनस्पतीचा थर खरवडून काढते.त्यामुळे रॅड्युलाची तुलना अनेकदा खवणी,कानस किंवा सॅंडपेपरशी केली जाते.गोगलगाय पान खाताना कधी कधी अगदी हलका खर्र-खर्र आवाजही ऐकू येऊ शकतो.

दात झिजले तर? सतत पाने आणि इतर पदार्थ खरवडल्यामुळे पुढचे दात झिजतात किंवा तुटतात. पण त्याची फारशी अडचण होत नाही. रॅड्युलाच्या मागच्या भागात नवीन दात तयार होत राहतात आणि हळूहळू पुढे सरकतात. म्हणजेच हा एक प्रकारचा सतत स्वतःचे स्वत: रिन्युअल करणारी दातांचा कन्व्हेयर बेल्ट असतो.सर्व गोगलगायींचे दात सारखे नसतात. शाकाहारी प्रजातींमध्ये वनस्पती खरवडण्यासाठी योग्य दात असतात,तर काही शिकारी समुद्री गोगलगायींची रॅड्युला भक्ष्य पकडण्यासाठी किंवा त्यात छिद्र पाडण्यासाठी रूपांतरित झालेली असते.

थोडक्यात: आपल्या बागेत संथपणे सरपटणारी छोटीशी गोगलगाय प्रत्यक्षात तोंडात हजारो दातांची एक सूक्ष्म “जैविक खवणी” घेऊन फिरत असते—आणि जुने दात झिजताच निसर्ग तिच्यासाठी नवे दात तयार करत राहतो!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६