मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

१२ कॅमेरे, एक घोडा आणि जगाला वेड लावणारा तो पहिला 'मूव्हिंग' फोटो!

3 मिनिट वाचन

१८७८ मध्ये एडवर्ड मुयब्रिज यांनी घोड्याच्या धावण्यावर लावलेल्या एका पैजेतून जगातील पहिल्या चलचित्राचा आणि सिनेमाचा जन्म कसा झाला?

शेअर करा:
१२ कॅमेरे, एक घोडा आणि जगाला वेड लावणारा तो पहिला 'मूव्हिंग' फोटो!

१८७८ साली एका घोड्याचे चारही पाय धावताना जमिनीपासून वर असतात की नाही,हे सिद्ध करण्यासाठी आजच्या हिशोबात तब्बल ५ कोटी रुपये खर्च झाले होते. ही रक्कम एका साध्या पैजेसाठी लावण्यात आली होती. ही पैज फक्त एका घोड्यापुरती मर्यादित नव्हती, तर तिने भविष्यातल्या करोडो रुपयांच्या सिनेमा उद्योगाचा पाया रचला.

कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर लेलँड स्टॅनफोर्ड यांना एक शंका आली. घोडा जेव्हा वेगाने धावतो, तेव्हा एखादा क्षण असा असतो का, जेव्हा त्याचे चारही पाय हवेत असतात? मानवी डोळ्यांना हे पाहणे अशक्य होते, कारण घोड्याचा वेग प्रचंड होता.ही शंका मिटवण्यासाठी त्यांनी एका अवलिया फोटोग्राफरला साकडं घातलं, त्याचं नाव होतं एडवर्ड मुयब्रिज. मुयब्रिज हा माणूस तसा विक्षिप्त पण प्रयोगाच्या बाबतीत पक्का होता. त्याने स्टॅनफोर्डच्या फार्मवर एक अजब प्रयोग करायचं ठरवलं.

आता कल्पना करा, एक धावण्याची पट्टी आहे आणि त्या पट्टीच्या बाजूला एका रांगेत १२ कॅमेरे लावले आहेत. प्रत्येक कॅमेऱ्याला एक दोरी बांधलेली होती, जी थेट धावण्याच्या ट्रॅकवर पसरलेली होती. जसा घोडा धावत येईल आणि त्या दोरीला स्पर्श करेल, तसा कॅमेऱ्याचा शटर 'क्लिक' होईल.घोड्याचं नाव होतं 'सॅली गार्डनर'. सॅली धावू लागली आणि एकामागून एक १२ कॅमेऱ्यांनी तिचे फोटो टिपले. जेव्हा ते फोटो डेव्हलप झाले, तेव्हा सगळ्या जगाचे डोळे विस्फारले गेले.
एका फोटोमध्ये सॅलीचे चारही पाय जमिनीपासून काही इंच वर होते. स्टॅनफोर्ड आपली पैज जिंकले होते, पण एडवर्ड मुयब्रिजने त्याहून मोठं काहीतरी जिंकलं होतं. त्याने स्थिर चित्रांना 'गती' दिली होती.

...आणि मग काय झालं? मुयब्रिजने हे फोटो एका चक्रावर फिरवले, ज्यामुळे तो घोडा चक्क धावताना दिसू लागला. १८८० मध्ये जेव्हा त्याने कॅलिफोर्निया स्कूल ऑफ फाईन आर्ट्समध्ये हे प्रदर्शन भरवलं, तेव्हा लोकांना वाटलं की हा काहीतरी जादूटोणा आहे. मुयब्रिजला त्यावेळी कल्पनाही नसेल की तो एका जागतिक क्रांतीची सुरुवात करत आहे.

आज २०२६ मध्ये, जेव्हा आपण AI वापरून काही सेकंदात व्हिडिओ बनवतो, तेव्हा मुयब्रिजच्या या प्रयोगाची आठवण येणं स्वाभाविक आहे.तंत्रज्ञानाची प्रगती कितीही झाली तरी, एका साध्या कुतूहलापोटी सुरू झालेला हा प्रवास थक्क करणारा आहे. विचार करा, जर त्या दिवशी त्या घोड्याने धावायला नकार दिला असता, तर आजचा सिनेमा कसा दिसला असता?
आजच्या हाय-स्पीड कॅमेऱ्यांच्या जगात, त्या १२ लाकडी कॅमेऱ्यांची किंमत आपल्याला कळेल का?

पुढची गोष्ट
विज्ञानप्राण्यांच्या जगात नको असलेल्या प्रेमाला नकार कसा दिला जातो?प्राण्यांच्या जगात नको असलेल्या नरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ड्रॅगनफ्लाय आणि इतर प्रजातींच्या माद्या चक्क मेल्याचं नाटक करतात!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

लाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईन
विज्ञान

लाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईन

जॉर्ज क्लाईन यांची मोटराइज्ड व्हीलचेअर ही एक क्रांतिकारी निर्मिती होती. या शोधामुळे हजारो-लाखो माणसांना स्वतःच्या इच्छेने जगात फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले.

४ नोव्हेंबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!
विज्ञान

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

“जीभेवर ठेवलं आणि माणूस मेला!” पोटॅशियम सायनाइडचे वास्तव काय?
विज्ञान

“जीभेवर ठेवलं आणि माणूस मेला!” पोटॅशियम सायनाइडचे वास्तव काय?

सिनेमात दाखवल्याप्रमाणे सायनाइड जिभेवर ठेवताच माणूस क्षणात मरतो का? काय सांगते याचे खरे वैद्यकीय विज्ञान, जाणून घ्या.

२२ सप्टेंबर, २०२६

वणव्याचा धोका ठरणारी नीलगिरी आता बांधणार घरं; हवाईचा क्रांतीकारी प्रयोग
विज्ञान

वणव्याचा धोका ठरणारी नीलगिरी आता बांधणार घरं; हवाईचा क्रांतीकारी प्रयोग

जंगलातील वणव्यांना कारणीभूत ठरणारे नीलगिरीचे लाकूड बांधकामासाठी वापरण्याचा हवाई विद्यापीठाचा अभिनव संशोधन प्रकल्प.

१७ ऑगस्ट, २०२६

'या' मुंग्यांच्या दीर्घायुष्यामागचे धक्कादायक वास्तव- या अमरत्वाचे गुपित नक्की काय आहे ?
विज्ञान

'या' मुंग्यांच्या दीर्घायुष्यामागचे धक्कादायक वास्तव- या अमरत्वाचे गुपित नक्की काय आहे ?

एका परजीवी टेपवर्ममुळे कामगार मुंग्यांचे आयुष्य राणीसारखे विलासी आणि प्रदीर्घ होते, पण हे दीर्घायुष्य त्यांच्या वसाहतीसाठी घातक ठरते.

२७ जुलै, २०२६