मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ??

2 मिनिट वाचन
शेअर करा:
ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ??

आम्ही आज ज्या कलाकृती दाखवणार आहोत त्या ५०० वर्षांपूर्वी नेदरलँड्सच्या फ्लँडर्स येथे तयार करण्यात आल्या होत्या. ही शिल्पं बॉक्स नावाच्या झाडाच्या लाकडापासून तयार केलेली असल्याने त्यांना बॉक्सवूड मिनिएचर म्हटलं जातं. बॉक्सवूड मिनिएचरचा मुख्य विषय हा ख्रिस्ती धर्मातील वेगवेगळे प्रसंग आणि बायबल मधल्या घटना दाखवणे हा होता. 

ही कोरीव शिल्पं आजही लोकांना थक्क करतात. या शिल्पांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्यात दडलेल्या रहस्याची उकल करण्यासाठी संशोधकांना चक्क मायक्रो-एसटी स्कॅनिंग आणि विश्लेषणासाठी अत्याधुनिक 3D सॉफ्टवेअर, तसेच एक्स-रे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागत आहे.

ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ?? – चित्र 1

बॉक्सवूड मिनिएचर्स हे युरोपातल्या ऐतिहासिक प्रोटेस्टंट सुधारणा चळवळीच्या पूर्वी प्रसिद्ध होते. कॅथलिक चर्च आणि प्रोटेस्टंट चर्चेसमध्ये आलेल्या सुधारणानंतर या कलाकृतींची मागणी कमी होती गेली.

बॉक्सवूड मिनिएचर्स त्याकाळातल्या एका विशिष्ट प्रतिष्ठित वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. या वर्गाकडून बॉक्सवूड मिनिएचर्ससारख्या धार्मिक कलाकृतींना मागणी होती.

ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ?? – चित्र 2

आजच्या काळात बॉक्सवूड मिनिएचरवर संशोधन होत आहे. कॅनडातील ओन्तारिओ येथील आर्ट गॅलरी मध्ये बॉक्सवूड मिनिएचर ठेवण्यात आले होते. तेव्हा तिथे अभ्यास करण्यासाठी मायक्रो-एसटी स्कॅनिंग, 3D सॉफ्टवेअर, एक्स-रे तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं. या मिनिएचर्सचे काही भाग हे बियांच्या आकारा एवढे आढळून आले आहेत.

ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ?? – चित्र 3

या लहान कलाकृतींना तयार करण्यासाठी लाकडाचे लहान लहान भाग जोडण्यात आले होते. हे सहसा डोळ्यांनी दिसत नाही, पण एक्स-रे मध्ये ही गोष्ट दिसून आली. तरी बॉक्सवूड मिनिएचरचा पूर्ण अभ्यास करणं जमलेलं नाही. कारण त्यांना तयार करताना वापरण्यात आलेले सोने आणि इतर गोष्टी एक्स-रे मध्ये अडथळा आणतात.

आता बॉक्सवूड मिनिएचर्सचे काही नमुने पाहूया.

ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ?? – चित्र 4
ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ?? – चित्र 5
ही लाकडात कोरलेली चित्रं समजून घेण्यासाठी चक्क 'एक्स-रे'चा वापर केला जातोय ?? – चित्र 6

तर मंडळी, आजच्या सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान नसलेल्या काळातील एवढ्या लहान कोरीव कलाकृती पाहून थक्क व्हायला होतं. तुम्हाला या कलाकृती आवडल्या का ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख