मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

मुकेश अंबानींचे भाषण एअरटेल आयडियाला पडले ११,९८३कोटींना

2 मिनिट वाचन
शेअर करा:
मुकेश अंबानींचे भाषण एअरटेल  आयडियाला पडले ११,९८३कोटींना

मोबाईल इंटरनेटच्या मार्केटमध्ये  रिलायन्स जिओनं कालपासून सगळीकडं धूम माजवलीय.  काल आलेले इंटरनेट दरांचे तक्ते बघता अंबानी खरोखर जगातलं सर्वात स्वस्त 4G देणार असं दिसतंय खरं. 
 

सध्याच्या ऑफरनुसार देशभरात काही सिलेक्टेड 4G स्मार्टफोन असणार्‍यांना रिलायन्स जिओ सिम मोफत दिलं जात आहे. सोबत 3 महिन्यांसाठी फ्री वॉईस आणि विडीओ कॉल्स, मोफत एसएमएस, फ्री अनलिमिटेड 4G डाटा पण  दिला जातोय. 3 महिन्यानंतरही कॉल्स आणि एसएमएस लाईफटाईम फ्री राहतील. आणि १ जीबी 4G डाटाचा दर असेल फक्त ५० रुपये ! सोबत जिओने सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन आणि राउटरही बाजारात आणलाय. म्हणजे इंटरनेटवर पडीक असणारे आता आणखी  स्वस्त दरात तिकडे जास्तच पडीक राहणार!!

पण या अंबानींच्या ऑफरमुळं काय झालं माहित आहे? अंबानींचं रिलायन्स जिओबद्दलचं भाषण चालू असतानाच  बघता-बघता एअरटेल आणि आयडिया सारख्या बड्या कंपन्यांचे शेअर्स मार्केटमध्ये धडाधड कोसळले हो!! आणि त्यांची मार्केटमधलं बाजारमूल्य ११,९८३ कोटींनीं गडगडलं.

           सध्यातरी हे सिमकार्ड  मिळवण्यासाठी ठिकठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. रिलायन्सने  काही मुख्य १४ मोबाईल कंपन्यांशी करार केलाय. या करारानुसार  तुम्ही नवा 4G स्मार्टफोन खरेदी केला किंवा तुमच्याकडे तो आधीच असेल तर तुम्हाला हे सिम मोफत मिळू शकते. तुमचा 4G स्मार्टफोन सॅमसंग, सोनी, पॅनासोनिक, LYF, अॅसुस, मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन, जिओनी, TCL, झोलो यापैकी एका कंपनीचा असेल तर रिलायन्स स्टोअरला नक्की भेट द्या..

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलकोरियाच्या गल्लीबोळात भारतीय आयुर्वेदाचा डंका: हिमालयच्या गोळीने कसं लावलं वेड?दक्षिण कोरियाच्या २५० दशलक्ष डॉलर्सच्या हँगओव्हर मार्केटमध्ये भारताच्या हिमालय कंपनीच्या 'पार्टी स्मार्ट' गोळीने कशी क्रांती केली?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?
लाइफस्टाइल

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?

महागडे विदेशी फळ असणाऱ्या ॲव्होकॅडोची भारतात वाढती मागणी आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती.

३१ जुलै, २०२६

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!
लाइफस्टाइल

शक्तिमानची जादू आणि पार्ले-जीने काबीज केलं तामिळनाडूचं मार्केट!

९० च्या दशकात तमिळनाडूमध्ये मिल्क बिस्किटांचे वर्चस्व असताना शक्तिमानच्या मदतीने पार्ले-जीने विक्री ५० वरून २ हजार टनांवर कशी नेली?

२२ जून, २०२६

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!
लाइफस्टाइल

मोदी-मेलनींची ती 'मेलडी' आणि दलाल स्ट्रीटवरची 'कॉमेडी'!

पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलनी यांच्या 'मेलडी' चर्चेमुळे गुंतवणूकदारांनी चुकून पार्ले इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी केल्याची रंजक गोष्ट.

२१ मे, २०२६

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स
लाइफस्टाइल

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स

शेअर बाजारात शांतपणे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सामान्य ट्रेडर्सच्या यशोगाथा सांगणाऱ्या पुस्तकाचा आढावा.

९ मार्च, २०२६