मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पॅन नंतर आधार, ८१ लाख आधार कार्ड सरकारनं केले ब्लॉक ? बघातर तुमचं नाहीय ना त्यात !

2 मिनिट वाचन
शेअर करा:
पॅन नंतर आधार, ८१ लाख आधार कार्ड सरकारनं केले ब्लॉक ? बघातर तुमचं नाहीय ना त्यात !

जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत अगदी पहिल्या चार पाच वस्तूंमध्ये आधार कार्डचा नंबर लागतोय अशी परिस्थिती सरकारने निर्माण केलीय. आज त्याहून जबर बातमी कळालीय, सरकारनं म्हणे कोणत्या तरी कलमाच्या आधारे ८१ लाख आधार कार्ड ब्लॉक केलीयेत. ही माहिती सरकारनेच राज्यसभेत दिली आहे.

आधार कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीला दोन आधारकार्ड देण्यात आले असतील, बायोमेट्रिक डेटामध्ये बदल, कागदपत्रे व्यवस्थित नसल्यास आधार ब्लॉक केलं जाऊ शकतं. ५ वर्ष वयाच्या खालील मुलांना पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा व १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकदा आधारचं रिव्हेरिफिकेशन करावं लागतं.
 

आता बघूयात कसं तपासायचे आधारचं स्टेटस :

1. UIDAI च्या वेबसाईटच्या https://uidai.gov.in होम पेजवर तुम्हाला आधार सर्व्हिसेस नावाचा टॅब दिसेल. त्या खाली तुम्हाला Verify Aadhar Number ही लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.


स्रोत

 

2. हे तुम्हाला एका नव्या पानावर घेऊन जाईल. तिथे तुमचा आधार नंबर आणि व्हेरिफिकेशन टेक्स्ट भरून हिरव्या रंगाच्या Verify  बटणावर क्लिक करा. 

स्रोत

 

3. खालच्या चित्राप्रमाणे तुमच्या नावासमोर ग्रीन टिकमार्क आला, तर तुमचं आधार चालू आहे.


 

स्रोत

 

जर तुमचं आधार कार्ड ब्लॉक झालं असेल तर तुम्हाला जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपली कागदपत्रे दाखवून आधार चालू करून घ्यावे लागेल.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएका थुंकीची किंमत दीड लाख रुपये! ब्रिटनमध्ये पानशौकिनांना बसलेला 'महागडा' फटकाब्रिटनमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दोन भारतीयांना पडले महागात; सीसीटीव्हीच्या आधारे पकडून कोर्टाने ठोठावला दीड लाखांचा दंड.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!
लाइफस्टाइल

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

लोक गिफ्ट व्हाउचर्स विसरल्यामुळे किंवा मुदत संपल्यामुळे कंपन्या 'ब्रेकेज'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा कसा कमावतात?

२० जून, २०२६

ताटातल्या अळ्यांकडे दुर्लक्ष करून 'न्यू इंडिया'ची प्रतिमा कशी टिकणार?
लाइफस्टाइल

ताटातल्या अळ्यांकडे दुर्लक्ष करून 'न्यू इंडिया'ची प्रतिमा कशी टिकणार?

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना अळ्यायुक्त दही दिल्याप्रकरणी रेल्वेने कंत्राटदाराला ६० लाखांचा दंड ठोठावत परवाना रद्द केला आहे.

२७ मार्च, २०२६