मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ही अ‍ॅपची जाहिरात आहे की साऊथचा ऍक्शनपट...केरळ पोलिसांचा धमाकेदार व्हिडीओ पाहिला का?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
ही अ‍ॅपची जाहिरात आहे की साऊथचा ऍक्शनपट...केरळ पोलिसांचा धमाकेदार व्हिडीओ पाहिला का?

सध्या सर्वच सरकारी कार्यालये टेक्नोसॅव्ही होत आहेत. पोलिसांना देखील आपले काम सोपे होण्यासाठी तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. यासाठी मग ट्विटर आणि इतर समाज माध्यमांची मदत घेऊन पोलीस लोकांना सतर्क करणे, माहिती पुरवणे यासारख्या गोष्टी करत असतात. काही पोलीस दलांचे तर स्पेशल अ‍ॅप आहेत.

ही अ‍ॅपची जाहिरात आहे की साऊथचा ऍक्शनपट...केरळ पोलिसांचा धमाकेदार व्हिडीओ पाहिला का? – चित्र 1

केरळ पोलिसांनी देखील स्वतःचे खास ऍप तयार केले आहे. या अ‍ॅपचं नाव आहे ‘पोल अ‍ॅप’. हे अ‍ॅप खास लोकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आले आहे. आता अ‍ॅप’ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिरात तर आलीच, नाही का? केरळ पोलिसांनी या ऍपची जाहीरात तयार केली. ती जाहिरात बघीतल्यावर मात्र साऊथच्या सिनेमांचे भले भले सुपरस्टार चक्कर येऊन पडतील. ही जाहिरात त्या अ‍ॅपसाठी नाही, तर त्यातल्या ऍक्शन सीन्ससाठीच जास्त वायरल होत आहे.

केरळ पोलिसांना दाखवायचे होते की कसे पोल ऍपवर एका क्लिकसरशी पोलीस तुमच्या मदतीला हजर होतात. पण हे दाखवण्याचा नादात त्यांनी एक जबरदस्त असा ऍक्शन सिन तयार केला. हा सीन एवढा जबरदस्त झाला आहे की तो लोकांच्या लक्षात राहिला.

आम्ही काय तुम्हाला अधिक सांगत नाही. तुम्ही स्वतः ही जाहिरात बघा आणि आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कशी वाटली केरळ पोलिसांची डोक्यालिटी ते कळवा...

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलपीसी जेसी ॲण्ड आऊट: पोलिसांचा ससेमिरा आणि चौकशीचा थरार!बँक घोटाळ्यातील आरोपींची पोलीस कोठडीत होणारी झाडाझडती आणि चौकशीच्या थराराचा पुढील भाग.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

विक्षिप्त आणि विद्वान प्र.बा. जोग: ज्यांनी स्मशानात जाऊन 'ते' काम केलं!
लाइफस्टाइल

विक्षिप्त आणि विद्वान प्र.बा. जोग: ज्यांनी स्मशानात जाऊन 'ते' काम केलं!

विक्षिप्त आणि विद्वान या दोन शब्दात 'कहर' नावाचा आणखी एक शब्द टाकला की एकच नाव समोर येतं ते म्हणजे प्र.बा. जोग यांचं! यांच्या हुशारीचे आणि विक्षिप्तपणाचे किस्से एकत्र केले तर एक पाचशे पानाचं पुस्तक होईल.

३ नोव्हेंबर, २०२६

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!
लाइफस्टाइल

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!

सौदी अरेबियात फाशीची शिक्षा सुनावलेल्या अब्दुल रहीमची ३४ कोटींच्या 'ब्लड मनी'मुळे सुटका झाली. माणुसकीच्या या अभूतपूर्व गोष्टीचा आढावा.

२९ मे, २०२६