मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भाऊ, रेड अलर्ट म्हणजे काय ? सतर्कतेचा इशारा देण्यासाठी कोणकोणते अलर्ट्स जारी केले जातात ?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
भाऊ, रेड अलर्ट म्हणजे काय ? सतर्कतेचा इशारा देण्यासाठी कोणकोणते अलर्ट्स जारी केले जातात ?

वादळ, अतिवृष्टी, महापूर, भूकंप, त्सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. अशावेळी सतत ऐकू येणारा शब्द म्हणजे ‘रेड अलर्ट’. अमुक अमुक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी बातमी हमखास येत असते. नुकतंच केरळ मधल्या महापुरामुळे केरळच्या काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

राव, तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का. हे रेड अलर्ट म्हणजे काय ? नैसर्गिक संकटाच्यावेळीच तो का जारी केला जातो ? आज आपण जाणून घेणार आहोत सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जरी केल्या जाणाऱ्या अलर्ट्स बद्दल. 

१. ग्रीन अलर्ट

ग्रीन अलर्टचा अर्थ होतो सर्व ठीक आहे. कोणतंही संकट नाही.

२. यलो अलर्ट

२. यलो अलर्ट

यलो अलर्टचा अर्थ होतो पुढील काही दिवसांमध्ये हवामान बदलामुळे संकट ओढवू शकतं. दैनंदिन कामे रखडू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी हा अलर्ट जारी करतात.

३. अंबर(पिंगट) अलर्ट 

३. अंबर(पिंगट) अलर्ट 

अंबर अलर्ट म्हणजे खराब हवामानाची शक्यता पूर्वीपेक्षा कैकपटीने वाढली आहे. या अलर्टचा अर्थ होतो खराब हवामानामुळे लोकांनी पुढील संकटासाठी तयार राहावं. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते.

४. रेड अलर्ट

४. रेड अलर्ट

रेड अलर्ट हा अगदी आणीबाणीच्या प्रसंगी जारी केला जातो. नैसर्गिक संकट ओढवलेलं असताना लोकांना सतर्क राहण्यासाठी या अलर्टला जारी केलं जातं. लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा इशारा रेड अलर्ट द्वारे दिला जातो. 

 

तर मंडळी, अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगांच्या अलर्टचा वापर सतर्कतेचा इशारा देण्यासाठी केला जातो. आता हेच रंग का वापरले जातात तर त्याच्यामागेही वैज्ञानिक करणं आहेत. पण ते पुन्हा कधी तरी.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआखाती युध्द आणि शेजारच्या काकूंचा 'सिलेंडर' प्लॅन!आखाती देशात युद्ध सुरू झालं की आपल्या गल्लीतल्या कट्ट्यावर काय चर्चा रंगतात? वाचा या गमतीशीर प्रतिक्रिया.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

जगभरातल्या गुन्हेगारांना असतो इंटरपोलच्या 'कलर कोड्स'चा धसका!
लाइफस्टाइल

जगभरातल्या गुन्हेगारांना असतो इंटरपोलच्या 'कलर कोड्स'चा धसका!

रेड कॉर्नर नोटीसव्यतिरिक्त इंटरपोल गुन्हेगार आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध रंगांच्या नोटिसा कशा वापरते ते जाणून घ्या.

२७ जून, २०२६

न्यायाधीशांची निवड कोण करणार? कोलेजियम व्यवस्थेचा जन्म देणारा ऐतिहासिक खटला
लाइफस्टाइल

न्यायाधीशांची निवड कोण करणार? कोलेजियम व्यवस्थेचा जन्म देणारा ऐतिहासिक खटला

१९९३ च्या ऐतिहासिक खटल्याने भारतीय न्यायपालिकेचे स्वातंत्र्य कसे अबाधित राखले? न्यायाधीशांच्या नियुक्तीतील सरकारचा हस्तक्षेप थांबवणारी कोलेजियम व्यवस्था.

१० एप्रिल, २०२६