मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

वाढदिवस साजरा न करणारा देश.....कुठे आहे पाहा बरं !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
वाढदिवस साजरा न करणारा देश.....कुठे आहे पाहा बरं !!

मंडळी, तुम्ही जर कधी भूतानला गेलात तर तिथल्या लोकांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल न विसरता विचारा. पैज लावून सांगू शकतो तुम्हाला उत्तर मिळणार नाही. कारण भूतान मध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच नाहीय.

वाढदिवस साजरा न करणारा देश.....कुठे आहे पाहा बरं !! – चित्र 1

नाही राव, हा धर्माचा मामला नाहीय. भूतानच्या जनतेत आपल्या वाढदिवसाबद्दल एक वेगळं तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान असं की “आपण किती वर्ष जगलो यापेक्षा आपण किती आनंदी आयुष्य जगत आहोत हे जास्त महत्वाचं आहे”. आहे की नाही हटके ? तुम्हाला आनंद सिनेमाची आठवण होऊ शकते.

“बाबूमोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं”

वाढदिवस साजरा न करणारा देश.....कुठे आहे पाहा बरं !! – चित्र 2

मंडळी, आजही भूतान मध्ये जन्मतारीख लक्षात नसल्याने मोठ्या प्रमाणात लोक १ जानेवारीला आपला वाढदिवस साजरा करतात. ही झाली जुनी परंपरा. भूतानची नवी पिढी आता आपला वाढदिवस लक्षात ठेवत आहे, पण वृद्ध व्यक्ती आजही जुनी परंपरा पाळतात.

मंडळी, १ जानेवारीला वाढदिवस साजरा करणारं भूतान हे एकमेव राष्ट्र नाही. अफगाणिस्तान मध्ये पण हीच पद्धत आहे, पण इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे.

वाढदिवस साजरा न करणारा देश.....कुठे आहे पाहा बरं !! – चित्र 3

१९८० पासून अफगाणिस्तानात यादवी युद्धाला सुरुवात झाली. या दरम्यान जी मुलं जन्मली त्यांच्या जन्माची तारीख सरकारने नोंदवली नाही, त्यांच्या आईवडिलांनाही त्यावेळी जन्म तारीख लक्षात ठेवण्याची जरुरी वाटली नाही. पुढे जेव्हा युद्ध थांबून स्थिरता आली तेव्हा काम मिळवण्यासाठी जन्म तारीख गरजेची भासू लागली. यावेळी मोठ्या प्रमाणात अफगाणी लोकांनी १ जानेवारीला जन्म तारीख म्हणून स्वीकारलं.

 

तर मंडळी, वाढदिवस साजरा करण्याची ही अनोखी पद्धत तुम्हाला कशी वाटली ? आम्हाला जरूर कळवा !!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआज व्हॉट्सॅपचा 'हॅप्पी बड्डे' आहे२४ फेब्रुवारी हा दिवस तंत्रज्ञान विश्वासाठी खास आहे. याच दिवशी स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म झाला आणि व्हॉट्सॲपचीही सुरुवात झाली.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी
लाइफस्टाइल

सोन्याच्या खाणी, तरीही गरीब: बुर्कीना फासो देशाची कहाणी

या देशाचे उत्पन्न दोन प्रकारच्या सोन्यावर अवलंबून आहे: खाणीतले सोने आणि कापूस. तरीही ५०% हून अधिक जनता दारिद्र्य रेषेखाली जगते आहे.

३० ऑक्टोबर, २०२६

मुंबईची होळी 'वन-डे' का? आणि मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'चं गुपित काय?
लाइफस्टाइल

मुंबईची होळी 'वन-डे' का? आणि मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'चं गुपित काय?

मुंबईची धावपळीची होळी आणि नाशिक-मध्यप्रदेशातील 'रंग तेरस'ची अनोखी परंपरा; जाणून घ्या रंगांच्या या विविध उत्सवामागची रंजक माहिती.

१७ मार्च, २०२६

'अ‍ॅपल'वाल्या स्टीव्ह जॉब्सचा आज जन्मदिवस आहे!
लाइफस्टाइल

'अ‍ॅपल'वाल्या स्टीव्ह जॉब्सचा आज जन्मदिवस आहे!

अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा आज वाढदिवस. एका गॅरेजमधून जागतिक साम्राज्य उभं करणाऱ्या या किमयागाराची ही रंजक गोष्ट.

२४ फेब्रुवारी, २०२६