मनी भाव एकच असला तरी तो व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आज अशाच आगळ्या लोकांच्या वेगळ्या भक्तींचे नमुने बोभाटा तुमच्यासमोर घेऊन आले आहे.
हा वरचं वालुकाशिल्प अर्थातच श्री. सुदर्शन पटनाईक यांनी बनवलंय. हे शिल्प भुवनेश्वरच्या एअरपोर्टवर आहे. पटनाईकांची वालुकाशिल्पं नेहमीच सुंदर असतात. परवाच झालेल्या पुरीच्या यात्रेच्यानिमित्तानंही त्यांनी १०० रथशिल्पं केली होती.

ऊसापासून बनवलेला गणपती..
परवापासून व्हॉटसऍपवर या गणपतीने सगळ्यांना दर्शन देऊन झालंय. तमिळनाडूमध्ये बनलेल्या या गणपतीसाठी २० टन ऊस लागलाय म्हणे. त्यासाठी ४ लोक दिवसरात्र खपत होते.

चॉकलेट गणपती
या रितू राठोड असा चॉकलेटचा गणपती तयार करतात.

काड्यांपासून बनवलेला गणपती
असे गणपती तयार करण्यासाठी चिकाटी भारी लागते राव..

मेणाचा गणपती
हा आहे गेल्यावर्षी मुंबईतल्या एका मंडळाने बनवलेला मेणाचा गणपती..

मेंटॉस गणपती
हा आहे कूलेस्ट गणपती.. कूल कूल मेंटॉसपासून बनवलेला. या गणपतीसाठी १८,९८१ मेंटॉस लागल्या म्हणे.

पारले-जी, बिस्किटांपासून बनवले गणेशजी
पारले-जी बिस्किटं आवडतात, पण त्यापासून गणपती? चहात बुडवल्यानंतर जे बिस्किट तोंडापर्यंत जाईल की नाही याची खात्री नसते, पण या लोकांनी अशा बिस्किटांचा दहा दिवस चालेल असा गणपती बनवला. त्यांच्या धाडसाची दाद द्यायला हवी..

कॅडबरी जेम्स!!
या सगळ्यांना खाद्यपदार्थ खायचे सोडून त्याचे आकारबिकार बनवणं का सुचतं कुणास ठाऊक!!

हा खेळ सावल्यांचा..
बोभाटा.कॉमने यापूर्वीच अनिलकुमार सनाच्या सावलीचित्रांबद्दल तुम्हांला सांगितलं होतं. खाद्यपदार्थांची नासाडी करण्यापेक्षा असा टाकाऊ किंवा पुन्हा वापरल्या जाण्यायोग्य गोष्टींपासून बनवलेला गणपती नक्कीच चांगला..






