मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जुने मोबाईल फ़ेकून दिले? अरर्र, त्यात सोनं होतं की राव!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
जुने मोबाईल फ़ेकून दिले? अरर्र, त्यात सोनं होतं की राव!!

मोबाईलमध्ये सोनं पण असतं हे ऐकून (किंवा आत्ताच वाचून)  आपल्यापैकी बर्‍याच जणांनी कान टवकारले आणि डोळे विस्फारले  असतील. तसंही बर्‍याच कंपन्या या स्क्रॅप मोबाईल्स मधून सोनं काढायचं काम करतात. पण हे सोनं काढण्यासाठी जी पद्धत वापरली जाते ती बरीच हानीकारक आहे. कारण त्यात सायनाईड आणि पाऱ्यासारखी घातक रसायनं वापरली जातात. (कदाचित म्हणूनच आपल्यातले बरेच जण शांत बसलेत)

पण गुड न्युज ही आहे की, हे सोनं काढायची नवी आणि सोपी पद्धत शोधलीय युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग च्या शास्त्रज्ञांनी या नव्या प्रक्रियेत एका सौम्य अॅसीडमध्ये मोबाईलचा सर्किट बोर्ड ठेवला जातो ज्यामुळे बोर्डमधील सगळे धातु पाघळतील. आणि त्यानंतर त्यात एक केमिकल कंपाऊंड असणारा तरल पदार्थ मिसळला जातो जो फक्त सोनं वेगळं करतो !

आता जपान सरकार पण मोबाईल मधून सोनं काढायची तयारी करतंय म्हणे... कारण 2020 मध्ये होणाऱ्या टोकीयो अॉलिंपिक्स मध्ये मेडल्स तयार करण्यासाठी ते हेच सोनं वापरणार आहेत ! आतापर्यंत या लोकांनी अशा इलेक्ट्रॉनिक भंगारामधून 1564 किलोग्रॅम चांदी गोळा केलीय तज्ञांच्या मते जगभरात तयार होणारा हा इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करून दरवर्षी 300 टन सोनं वाचवता येऊ शकतं. आता तुम्हीच विचार करा... जुना माल फेकायचा ? की....  साठवायचा ?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!
लाइफस्टाइल

गोव्यातील ५,५८४ कुटुंबांच्या सोन्याची ३० वर्षांची 'कैद'; आजच्याच दिवशी परतला तो खजिना!

पोर्तुगीजांनी पळवून नेलेले गोवेकरांचे ५,५८४ दागिन्यांची पाकिटे ३० वर्षांच्या मुत्सद्देगिरीनंतर ३ ऑगस्ट १९९१ रोजी भारतात परत आली.

३ ऑगस्ट, २०२६

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार
लाइफस्टाइल

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार

सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा मार्ग: इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) म्हणजे काय आणि ते डिजिटल युगात कसे फायदेशीर आहे, याबद्दलची माहिती.

१० मे, २०२६

नशिबाने गवसलेला २७ किलो सोन्याचा गोळा: हँड ऑफ फेथची थरारक गोष्ट
लाइफस्टाइल

नशिबाने गवसलेला २७ किलो सोन्याचा गोळा: हँड ऑफ फेथची थरारक गोष्ट

ऑस्ट्रेलियातील एका सामान्य माणसाला जमिनीखाली सापडलेला २७ किलो सोन्याचा गोळा आणि त्याचे पालटलेले नशीब, वाचा ही रंजक गोष्ट.

९ मे, २०२६