मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

व्हिडीओ ऑफ दि डे: एक हात निकामी असूनही या पोलीस अधिकाऱ्याने रुग्णाला खांद्यावर वाहून नेलं !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
व्हिडीओ ऑफ दि डे: एक हात निकामी असूनही या पोलीस अधिकाऱ्याने रुग्णाला खांद्यावर वाहून नेलं !!

पोलीस स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून नागरिकांसाठी खडा पहारा देत असतात. त्यासाठी त्यांचं कौतुक तर होतंच, पण काहीवेळा पोलीस मंडळी अशी काही कामं करत की त्यांच्या कौतुकापेक्षा त्यांना कडक सलाम ठोकावासा वाटतो. अश्याच एका कामाची सध्या चर्चा सुरु आहे. 

घटना मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना घेऊन एक ट्रक जात होता. काही तांत्रिक बिघाडीमुळे ट्रक उलटला. ट्रक मधल्या ३५ लोक या अपघातात जखमी झाले.  

व्हिडीओ ऑफ दि डे: एक हात निकामी असूनही या पोलीस अधिकाऱ्याने रुग्णाला खांद्यावर वाहून नेलं !! – चित्र 1

अपघाताबद्दल समजताच तिथे पोलीस आले. ताबडतोब ऍम्ब्युलन्सची व्यवस्था होऊ शकली नसल्याने पोलिसांनाच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. पोलिसांनी स्वतःच्या खांद्यावर रुग्णांना वाहून नेलं. या पोलीस तुकडीत एक पोलीस अधिकारी असे होते ज्यांचं सध्या कौतुक होत आहे. 

एएसआय संतोष सेन हे ते पोलीस अधिकारी. काही वर्षापूर्वी चोरांशी झालेल्या चकमकीत त्यांच्या उजव्या हाताला गोळी लागली होती. तेव्हापासून उजव्या हाताने त्यांना नीट काम करता येत नाही. पण हात निकामी असूनही त्यांना काम करण्यापासून कोणी अडवू शकलं नाही. इतर पोलीस रुग्णांना वाहून नेत असताना तेही मागे नाही राहिले. त्यांनी देखील एका रुग्णाला खांद्यावर घेतलं.  त्यांचं हे काम सध्या एका व्हिडीओच्या माध्यमातून जगभर पोचलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांचं कौतुक केलं. 

पोलीस रात्रंदिन नागरिकांची सेवां तर करतातच पण आणीबाणीच्या प्रसंगी अशाप्रकारे झोकून देऊन काम करायलाही मागे पुढे बघत नाहीत, ही घटना त्याचं मोठं उदाहरण आहे. संतोष सेन आणि त्यांच्या पोलीस तुकडीला सलाम !!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६