मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ब्लॅक पॅथर आणि बिबट्याची दुर्मिळ जोडी व्हायरल होत आहे....फोटो पाहून घ्या !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
ब्लॅक पॅथर आणि बिबट्याची दुर्मिळ जोडी व्हायरल होत आहे....फोटो पाहून घ्या !!

महिन्याभरापूर्वी कर्नाटकाच्या काबिनी राखीव वनात ब्लॅक पँथर म्हणजेच काळा बिबट्या फिरत असतानाचे फोटो चांगलेच वायरल झाले होते. नेटकऱ्यांनी या फोटोचे खूप कौतुक केले होते.

वाईल्डलाईफ फोटोग्राफर शाह जंग यांनी हा फोटो काढला होता. हा भन्नाट फोटो काढल्याबद्दल शाह जंग रातोरात प्रसिध्द झाले होते. लोकांना हा फोटो पाहिल्यावर जंगलबुकचीच आठवण होत होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shaaz Jung (@shaazjung) on

आता अजून एक वाईल्डलाईफ फोटोग्राफर मिथुन एच यांनी असाच एक अफलातून फोटो काढला आहे. साया नावाच्या त्याच ब्लॅक पॅथरचा क्लिओपत्रा नावाच्या मादी बिबट्यासोबत हा फोटो आहे. मिथुन यांच्या म्हणण्यानुसार हे जोडपे जवळपास ४ वर्षांपासून 'रिलेशनशिप' मध्ये आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mithun H (@mithunhphotography) on

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, "साधारणपणे जोडपे असले की नर पुढे चालतो आणि मादी त्याच्या मागे चालते. पण या दोघांमध्ये क्लिओ पुढे चालत आहे तर ब्लॅक पॅथर तिच्यामागे चालत आहे."

सध्या जंगलसफारीवर असलेल्या मिथुन यांना हा फोटो काढायला सहा दिवस लागले. नॅट जिओवरील रियल ब्लॅक पँथर नावाच्या शोसाठी देखील त्यांनी काम केले आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'
लाइफस्टाइल

१८ बाय १४ फुटांची अंधारकोठडी आणि भारताची गुलामी: 'ब्लॅक होल ऑफ कलकत्ता'

१७५६ मधील ब्लॅक होल ऑफ कलकत्ता घटनेचा ब्रिटिशांनी कसा प्रोपोगंडा म्हणून वापर केला आणि भारताच्या गुलामीचा पाया रचला गेला.

२० जून, २०२६

यूपीआय आणि भारतीय आदरातिथ्य: एका एनआरआय जोडप्याचा हृदयस्पर्शी अनुभव!
लाइफस्टाइल

यूपीआय आणि भारतीय आदरातिथ्य: एका एनआरआय जोडप्याचा हृदयस्पर्शी अनुभव!

अमेरिकेत राहणाऱ्या एका जोडप्याला भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाने आणि एका टॅक्सी ड्रायव्हरच्या माणुसकीने कसे भारावून टाकले, याची ही सत्यकथा.

२२ फेब्रुवारी, २०२६