मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ओळखा पाहू या अजगराच्या पोटात काय आहे?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
ओळखा पाहू या अजगराच्या पोटात काय आहे?

तुम्हांला हे तर माहितच असेल की अजगर त्याचं भक्ष्य चावून खात नाही, तर तो भक्ष्य पूर्ण गिळतो आणि शरीराचं वेटोळं करत पोटातल्या प्राण्याची हाडं हळूहळू मोडत जातो. असं आख्खं गिळलेलं अन्न हळूहळू पचतं. गुजरातमधल्या जुनागढजवळच्या जंगलातल्या एका अजगराने घेतलेला घास मात्र त्याला झेपला नाही. 

तर या सहा मीटर लांबीच्या अजगराने गिळला चक्क एक काळवीट. हा हा काळवीट अजगराच्या पचवण्याच्या मानाने चांगलाच मोठा निघाला.    मग त्याचं पोट टम्म फुगलं, हालचाल करता येईना. असा सुस्तावलेला आणि हालचाल करू न शकणारा का असेना, तो आहे अजगर. त्याला शेतात पाहून लोक भ्यायले आणि कदाचित लोकांनी त्याला मारलेही असते. नशीबाने त्याला वेळीच एका सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. त्याच्या पोटातला काळवीट पूर्ण पचला की हा अजगर पुन्हा एकदा जंगला सोडण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएका अजगरासाठी ३० झुरळं खाणारा तरुण आणि एका रात्रीत मृत्यू!फ्लोरिडामध्ये एका अजगरासाठी आयोजित केलेल्या झुरळं खाण्याच्या स्पर्धेत एडवर्ड आर्चबोल्ड या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'इबू बॅरोन': २४ फूट लांबीचा महाकाय अजगर आणि थरारक जागतिक विक्रम!
लाइफस्टाइल

'इबू बॅरोन': २४ फूट लांबीचा महाकाय अजगर आणि थरारक जागतिक विक्रम!

इंडोनेशियाच्या जंगलात सापडलेल्या 'इबू बॅरोन' नावाच्या मादी अजगराने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सर्व जुने विक्रम कसे मोडीत काढले, वाचा.

१२ मार्च, २०२६