मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जिंकलेली सगळी रक्कम सैन्याला दान करणार....'पब्जी'च्या या टीमचं कौतुक तर झालंच पाहिजे !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
जिंकलेली सगळी रक्कम सैन्याला दान करणार....'पब्जी'च्या या टीमचं कौतुक तर झालंच पाहिजे !!

पब्जी पासून नुकसान होते हे तुम्ही ऐकले असेल. पब्जीमुळे मुलं कशी बेजबाबदार होत आहेत, त्यांचे कसे करियरवर दुर्लक्ष होत आहे या गोष्टी नेहमी ऐकण्यात येतात. पण आज काहीतरी वेगळं घडलंय. एका पब्जी प्लेयरने चक्क भारतीय सैन्याला मदत केली आहे!!

जिंकलेली सगळी रक्कम सैन्याला दान करणार....'पब्जी'च्या या टीमचं कौतुक तर झालंच पाहिजे !! – चित्र 1

पब्जी मोबाईल क्लब ओपन फॉल स्प्लिट 2019 या नावाची दक्षिण आशियाई देशांसाठी एक स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात भारतीय प्रोफेशनल पब्जी प्लेयर्सची ‘सोल’ (SouL) या नावाच्या टीमने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर या टीमची जागतिक स्तरावरील फायनलसाठी निवड झाली आहे. आता या टीमची स्पर्धा जगभरातील टिम्स सोबत होणार आहे.

खरी बातमी संपलेली नाही!! या टीमचा प्रमुख असलेला नमन माथूर जो मोर्टल या नावाने ओळखला जातो. त्याने फेसबुक पोस्ट करून सांगितले की या स्पर्धेत जिंकेलेली सगळी रक्कम ते भारतीय सैन्याला देणार आहेत.

जिंकलेली सगळी रक्कम सैन्याला दान करणार....'पब्जी'च्या या टीमचं कौतुक तर झालंच पाहिजे !! – चित्र 2

त्या पोस्टमध्ये त्याने स्टेडियमवर त्याला समर्थन देणाऱ्या फॅन्सचे आभार मानले आहेत. आणि जिंकलेली रकम सैन्याला देण्याचे जाहीर केले आहे.

मंडळी, टीम ‘सोल’ ही एकमेव भारतीय टीम आहे जी वर्ल्ड फायनलसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड फायनल क्वालालांपुर येथे नोव्हेंबरच्या शेवटी भरवण्यात येणार आहे.

 

लेखक : वैभव पाटील

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलजाणून घ्या 'वंदे मातरम्' चा मराठी अर्थ काय आहे !!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका अजगरासाठी ३० झुरळं खाणारा तरुण आणि एका रात्रीत मृत्यू!
लाइफस्टाइल

एका अजगरासाठी ३० झुरळं खाणारा तरुण आणि एका रात्रीत मृत्यू!

फ्लोरिडामध्ये एका अजगरासाठी आयोजित केलेल्या झुरळं खाण्याच्या स्पर्धेत एडवर्ड आर्चबोल्ड या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.

२२ मे, २०२६