मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

व्हिडीओ ऑफ दि डे : अरबी शेखची दादागिरी...भारतीयांना जबरदस्ती केलं कैद !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
व्हिडीओ ऑफ दि डे : अरबी शेखची दादागिरी...भारतीयांना जबरदस्ती केलं कैद !!

AFC एशियन कप फुटबॉल स्पर्धेत भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात सामना रंगला. या सामन्यात भारताचा पराभव झाला, पण या पराभवापेक्षा जास्त चर्चा रंगली ती एका व्हिडीओची.

— مزمز فيديو (@mzmzvideo) January 10, 2019

मंडळी, या व्हायरल व्हिडीओ मध्ये एका अरबी माणसाने भारतीयांना कैद केलं आहे. कारण काय, तर हे भारतीय UAE मध्ये राहून भारताला सपोर्ट करतायत. तो त्यांना विचारतो की तुम्ही कोणाला सपोर्ट करता ? आत बंद असलेले लोक भारताचं नाव घेतात तेव्हा तो त्यांना उपदेश देतो, “तुम्ही UAE मध्ये राहून भारताला सपोर्ट करता, हे चुकीचं आहे. तुम्ही UAE ला सपोर्ट केलं पाहिजे...” यानंतर तो त्यांना पुन्हा विचारतो. जेव्हा ते लोक UAE चं नाव घेतात तेव्हा तो त्यांना सोडून देतो.

स्रोत

मंडळी, भारत काय आणि UAE काय सगळीकडेच असा प्रकार म्हणजे गंभीर गुन्हा मानला जातो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर UAE पोलिसांकडून त्या माणसाचा शोध घेण्यात आला. UAE च्या अधिकाऱ्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्याला जाब विचारल्यानंतर तो जे म्हणाला ते काहीतरी भलतंच होतं.

तो म्हणाला की हा व्हिडीओ म्हणजे एकप्रकारचा ‘जोक’ आहे. हे सगळं ठरवून केलेलं होतं. त्याने पुढे सांगितलं की मी ज्यांना कैद केलं होतं ते माझ्याच शेतावर काम करणारे भारतीय मजूर आहेत. त्यांच्यातील एक तर गेल्या २२ वर्षापासून माझ्यासोबत काम करतो. आम्ही एकाच ताटात जेवतो. मी त्यांना मारलेलं नाही किंवा त्यांना कैदही केलं नव्हतं.

मंडळी, आता हा व्हिडीओ पुन्हा बघा. हा व्हिडीओ म्हणजे तो म्हणतोय त्याप्रमाणे ‘जोक’ वाटतो का ? सांगा बरं !!  

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआधार सुरक्षित करण्यासाठी असा करा आपला आधार नंबर लॉक आणि अनलॉक!!वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

कंपनी विकून कामगारांना वाटले २ हजार कोटी: ग्रॅहम वॉकर यांचा अनोखा आदर्श!
लाइफस्टाइल

कंपनी विकून कामगारांना वाटले २ हजार कोटी: ग्रॅहम वॉकर यांचा अनोखा आदर्श!

आपली कंपनी १.७ अब्ज डॉलर्सना विकल्यानंतर ग्रॅहम वॉकर यांनी ५४० कर्मचाऱ्यांना २ हजार कोटी रुपयांचा बोनस वाटून नवा आदर्श ठेवला.

२२ जून, २०२६

फिस्टिंजर्स लॉक: तुमची स्वतःची ताकदच तुमचा काळ कशी ठरू शकते?
लाइफस्टाइल

फिस्टिंजर्स लॉक: तुमची स्वतःची ताकदच तुमचा काळ कशी ठरू शकते?

एका अस्वलाच्या गोष्टीवरून शिका की आपली चुकीची प्रतिक्रिया कशी आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकते. मानसशास्त्रातील 'फिस्टिंजर्स लॉक' संकल्पनेचा उलगडा.

२८ एप्रिल, २०२६