मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास

5 मिनिट वाचन

बीएचयूमधून शिकलेला आफताब अन्सारी खंडणीखोर बनून तिहार जेलमध्ये पोहोचला आणि तिथून आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा म्होरक्या कसा बनला?

शेअर करा:
पत्रकारितेचा विद्यार्थी ते कुख्यात जिहादी: आफताब अन्सारीचा गुन्हेगारी प्रवास

आफताब अन्सारीचा जन्म वाराणसीच्या लालापुर मोहल्ल्यातला. घरी आई मोठा भाऊ आणि चार बहिणी. बनारस हिंदू विद्यापीठातून पदवी मिळवल्यानंतर पत्रकारीतेच्या अभ्यासक्रमासाठी त्याने शिकण्यासाठी प्रवेश घेतला, पण थोडेच दिवसात त्याचंचत्याला कळलं की त्याचा कल पत्रकारीतेपेक्षा त्याचा 'क्राईम'म्हणजे गुन्हेगारीकडे आहे. त्याचा मोठा भाऊ वकील -पत्रकार आणि गुन्हेगारांच्या संपर्कात असल्यामुळे त्यानी आफताबची ओळख किडनॅपींग आणि खंडणी स्पेशालीस्ट दिलीप ठाकूरशी करून दिली.

दिलीप ठाकूरने तरुण आफताबचे गुण हेरून त्याला धंद्याचे ट्रेनींग द्यायला सुरुवात केली. अपहरणाच्या लायक सावज शोधायचं -त्याच्यावर पाळत ठेवायची- सेफ हाउस भाड्याने घ्यायचं - खंडणीची मागणी करून खंडणी वसूली करायची या सगळ्या कामात दिलीप ठाकूरने त्याला एक्स्पर्ट बनवलं.थोड्याच दिवसात आफताब दिलीप ठाकूरचा उजवा हात बनला.

१९९५ साली दिल्लीतल्या गिरीश अरोरा या एका व्यावसायीकाचं अपहरण या जोडगोळीने केलं.चार लाखाची खंडणी मागीतली. पण एक घोडचूक केली ती अशी की दोघं स्वतःच खंडणी वसूली करायला गेले. अरोराच्या कुटुंबाने पोलीसांची मदत घेतली होती. पैसे घेतल्या क्षणी पोलीसांनी गोळीबार सुरु केला. दिलीप ठाकूर जागीच आडवा झाला आणि आफताब निसटला. पण फार काळ नाही. थोड्याच दिवसात पोलीसांनी त्याला पकडून दिल्लीच्या तिहार जेलमध्ये टाकलं. दिलीप ठाकूर मेल्यामुळे आफताबची गुन्हेगारीची शाळा बंद पडली होती, पण तिहार जेल म्हणजे त्याच्यासाठी विद्यापीठच ठरलं. देशातले सगळेच अट्टल अतिरेकी इथे जमा झाले होते.

आधी त्याची ओळख झाली असिफ रझा खान सोबत आणि त्यानंतर एकेका जिहादींच्या सोबत आफतब अन्सारीची बैठक जमली.त्याच वेळी यांची भेट ओमर शेख सोबत झाली. कास्मिरमधून पाच विदेशी पर्यटकांचे अपहरण करणारा ओमर शेख कट्टर जिहादी होता.काही दिवसातच या गटात अख्तर हुसेन उर्फ हाशीमभाई सामील झाला. गुजराथ बॉर्डरवरच्या प्रकरणात सीबीआयच्या हातात न सापडलेला हाच तो अख्तर शेख !आधी एक खंडणी गुन्हेगार असलेला आफताब या दरम्यान कट्टर जिहादी अतिरेकी झाला.

ओमर शेख हे नाव तुम्ही आताच वाचलं पण तो कोण ते आठवलं का ? १९९९ साली घडलेल्या इंडीयन एअरलाइन्सचे विमान कंदाहारला पळवून नेण्यात आलं तेव्हा तीन अतिरेक्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. मौलाना मसूद अझर -मुश्ताक झरगर आणि तिसरा होता ओमर शेख !

त्या अगोदर म्हणजे १९९८ साली दिल्लीच्या अपहरण प्रकरणात आफताबला जामीन मिळाला होता पण ओमर शेखसोबत त्याचा संपर्क कायम होता. कंदाहार प्रकरणानंतर जेव्हा ९/११ चा बेत शिजायला लागला तेव्हा पुन्हा ओमर शेख आणि आफताब अन्सारी एकत्र आले.नव्याने जिहादी झालेल्या आफताब अन्सारीने खंडणीतला हिस्सा ९/११साठी देण्याचं ठरवलं.

पण असं ठरवून काही उपयोग नव्हता.आफताब अन्सारीला जेलमधून बाहेर पडण्यासाठी वकीलाचा मोठा खर्च करावा लागला होता.हातात दमडा शिल्लक नव्हता.त्याच वेळी त्याची ओळख हॅप्पी सिंग नावाच्या दुसर्‍या अपहरण स्पेशालीस्टा सोबत झाली.दोघं मिळून उत्तर प्रदेशातल्या बबलू श्रीवास्तव गँगला सामील झाले.त्या गँगकडून सात लाख उसने घेऊन त्यांनी दोन गाड्या घेतल्या आणि खंडणीसाठी सावज शोधायला सुरुवात केली.

त्यांचं पहिलं सावज होतं आनंद अग्रवाल-वाराणसीचा कोळशाचा व्यापारी. ५ ऑगस्ट १९९९ ला आफताब अन्सारी आणि हॅप्पी सिंग सीबीआयच्या अधिकार्‍याच्या वेशात आनंद अग्रवालच्या घरात घुसले आणि त्याचे अपहरण केले. यावेळी खंडणी वसूलीचे काम दुबईत बसलेल्या राजू उनडकट आणि चंकी यांच्या मार्फत करण्यात आले.खंडणी वसूल केल्यावर आनंद अग्रवालला नेपाळच्या बाजारात सोडून देण्यात आले.आफताब अन्सारीचे नाव अपहरण क्षेत्रात कायम झाले.

राजू उनडकटने आफताब अन्सारीला मदत केली कारण त्याला मुंबईच्या निरंजन शाह नावाच्या एका माणसासोबत जुना हिशोब पूर्ण करायचा होता.थोड्याच दिवसात आफताबने निरंजन शाहला पळवून आणले आणि खंडणी वसूल केली.राजू उनडकट आणि आफतब यानंतर कायमचे दोस्त झाले.

यानंतरचे पुढचे सावज होते पार्थ प्रतिम रॉय बर्मन -कलकत्त्याच्या खादीम शूज कंपनीचा मालक! यावेळी अपहरणाच्या प्रत्यक्ष कामात स्वतः जाण्याऐवजी अकीब अली खान आणि असीम रझा खान गेले. बर्मन फॅक्टरीच्या दिशेने निघाल्यावर रस्त्यात त्याची गाडी अडवण्यात आली. पार्थ प्रतिमने सुटण्याची धडपड केल्यावर त्याच्या पायात गोळी घालण्यात आली.त्यानंतर त्याला २४ परगणा जवळच्या बांगला देशाच्या सीमेवरच्या एका घरात ठेवण्यात आले.

या दरम्यान आफताब अन्सारीने दुबईहून खंडणीची बोलणी सुरु केली.एकूण आठ दिवस या वाटाघाटी चालत राहिल्या.त्याचे सर्व कॉल रेकॉर्ड करण्यात आले पण त्या दरम्यान बर्मनचा शोध लावण्यात पोलीसांना यश मिळाले नाही.शेवटी चार कोटीची खंडणी हैद्राबादच्या एका हवाला रॅकेटमार्फत दुबईला पोहचली आणि बर्मनची सुटका झाली. अकीब अली - असीम रझा खान यांना त्यांचा हिस्सा मिळाला.आफताबने त्यांच्या खंडणीच्या वाट्यातले ४९ लाख रुपये ओमर शेखच्या मार्फत ९/११ च्या सूत्रधाराला -मोहम्मद अट्टाला दिले.

या प्रकरणातला त्याचा साथीदार असीम रझा खान एनकाउंटरमध्ये मारला गेला आणि त्याचा सूड म्हणून अमेरीकन वकीलातीवर हल्ला करण्यात आला.

वाचकहो,आतापरयंत जी कथा तुम्ही वाचली त्यावरून गुन्हेगारीच्या साखळ्या कशा तयार होतात ?सर्वसाधारण गुन्हेगार अतिरेकी संस्थांसोबत कसे जोडले जातात ? आणि शेवटी त्यांची एक्च चूक त्यांना कशी भोवते? गुन्ह्याचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांच्या कामाच्या पध्दती कशा असतात? हे तुमच्या लक्षात आलं असेलच.

आता पुढच्या भागात आपण नीरज कुमार यांच्यासोबत दुबईला जाऊ या !

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

शोधसूत्र - भाग ३: सूत्रधार आफताब अन्सारी अखेर पकडला गेला
राजकारण

शोधसूत्र - भाग ३: सूत्रधार आफताब अन्सारी अखेर पकडला गेला

कोलकात्यातील अमेरिकन वकिलातीवरील हल्ला आणि खंडणी प्रकरणाचा मास्टरमाइंड आफताब अन्सारी सीबीआयच्या जाळ्यात कसा अडकला?

२४ जुलै, २०२६

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या
लाइफस्टाइल

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या

इन्स्टाग्रामवरील खोट्या माहितीवर आंधळा विश्वास ठेवून करोडपती होण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची भोपाळमधील धक्कादायक घटना.

२० ऑगस्ट, २०२६

शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला
राजकारण

शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला

दुबई पोलिसांशी चतुर मुत्सद्देगिरी करत सीबीआयने कुख्यात दहशतवादी आफताब अन्सारीला भारतात कसे आणले, याची अखेरची रोमहर्षक कथा.

२७ जुलै, २०२६

६० वर्ष, ५ खंड आणि करोडोंचे हिरे: ही 'आजी' आहे इंटरनॅशनल चोरांची राणी!
लाइफस्टाइल

६० वर्ष, ५ खंड आणि करोडोंचे हिरे: ही 'आजी' आहे इंटरनॅशनल चोरांची राणी!

डोरीस पेन या ८० वर्षांच्या आजींनी जगभरातील महागड्या दुकानांतून हिरे कसे चोरले? वाचा एका 'स्टायलिश' चोराची थक्क करणारी कहाणी.

२० मे, २०२६