कुठल्याही अन्नपदार्थांवर माशी बसली असेल तर तो अन्नपदार्थ अस्वच्छ आहे हे मानले जाते. माशी पडली की आपण तो पदार्थ फेकून देतो. माशी नेमकं करते काय? तुम्ही हेही पाहिले असेल जेव्हा माशी एखाद्या पृष्ठभागावर बसते तेव्हा ती स्वतःचे पुढचे पाय एकमेकांवर घासते. ती नक्की पाय का घासते? हा प्रश्न अनेकांना पडत असेल. आज हेच जाणून घेऊयात.
माशी पाय का घासते? या उत्तरात लपलं आहे मोठं विज्ञान!


माशीला त्यांच्या सभोवतालच्या जगाची जाणीव होण्यासाठी त्यांच्या डोळ्यावर, अँटेनावर आणि त्यांच्या शरीरावर आणि पायांवर असलेल्या ब्रिस्टल्सवर म्हणजे बारीक केसांवर अवलंबून रहावे लागते. डोळे हे आजूबाजूला बघण्यासाठी तर ब्रिस्टल्स हे अन्नपदार्थ गोड म्हणजे खाण्यायोग्य अन्न आहे का किंवा कडू चव किंवा विषारी तर नाही ना हे ओळखण्यासाठी महत्वाची मदत करतात. म्हणूनच योग्य अन्न शोधण्यासाठी आणि तसेच इतर भक्षकांपासून वाचण्यासाठी त्यांना या ज्ञानेंद्रियांना स्वच्छ ठेवावे लागते.

म्हणूनच ही माशा स्वत: ला स्वच्छ करण्यासाठी त्यांचे पाय एकमेकांवर घासतात. त्यांच्या शरीरावर जे छोटे केस असतात त्यात एक प्रकारचे चिकट द्रव असते. या चिकट द्रव्यामुळे अनेक छोटे जिवाणू किंवा विषाणू पायाला चिटकून राहतात आणि हेच दूर करण्यासाठी माशी आपले पाय एकमेकांवर घासते. हेच विषाणू मग अन्नपदार्थांमध्ये मिसळून रोगराई पसरवण्यास मदत करतात. आता तुम्हाला माशी अन्नपदार्थ कसे खराब करते याचंही उत्तर सापडलं असेलच.

फक्त पायच नाही तर ते आपले डोके व पंख हेही साफ करत असतात. थोडक्यात माशी स्वतःला स्वच्छ ठेवण्याचे काम करत असते. स्वतःच्या शरीराची स्वछता ठेवण्यासाठी जसे आपण अंघोळ करतो अगदी तसेच.
"तुपात पडली माशी आणि चोंदोमामा राहिला उपाशी" या ओळींचा शात्रीय अर्थ यातून समजतो. नाही का?
लेखिका: शीतल दरंदळे
संबंधित लेख

बसचं रुपांतर शाळेत? कोणी आणि कुठे केलं आहे?
२४ ऑगस्ट, २०२१

इंग्रजांशी कडवी झुंज देणारी, वयाच्या तेराव्या वर्षी नागा जमातीचे नेतृत्व करणारी राणी गाईदिन्ल्यू!!
२१ ऑगस्ट, २०२१

या ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१

खमंग, रवाळ साजूक तूप कसे बनवायचे? तूप कढवायची पद्धत आणि त्यामागील विज्ञान समजून घ्या!!
३० ऑगस्ट, २०२१

