आपण काय बघावं आणि बघू नये याची छानपैकी काळजी घेणारे आपले महान सेन्सॉर बोर्ड, हे एका अर्थी पुण्य कर्म करत आहेत. बँडीट क्वीन, ब्लॅक फ्रायडे, फिराक, पांच, अन-फ्रीडम, उडता पंजाब, आत्ताचा लिपस्टिक अंडर माय बुरखा हे असले सिनेमे बघून आपली पिढी बिघडू शकते. लोकांनी कसे छान छान पारिवारिक सिनेमे पाहावेत, या माफक इच्छेतून सेन्सॉर बोर्डने काही संस्कारी सिनेमे काहीही अडचण न येवू देता रिलीज केलेत.
असं आहे मंडळी, ज्या सिनेमांना खरंच बंदी घालायला हवी होती त्या सिनेमांना सेन्सॉर बोर्डने एकही कट न लावता प्रदर्शित केले, पण भारतीय समाजाचा चेहरा उघडपणे दाखवू इच्छिणाऱ्या सिनेमांवर मात्र यांनी बंदी आणली. तर मंडळी आज आपण बघणार आहोत असे काही सिनेमे, ज्यांच्यावर खरं तर बंदी यायला हवी होती.. पण ते बिनदिक्कत प्रदर्शित झाले!!











