मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आजींची नवी जाहिरात बघितली का ?...नसेल बघितली तर आजच बघा !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
आजींची नवी जाहिरात बघितली का ?...नसेल बघितली तर आजच बघा !!

मंडळी ‘काहे दिया परदेस’ ही मालिका संपून काही महिने उलटून गेले. या मालिकेतील ‘शिव आणि ‘गौरी’ ही जोडी प्रचंड गाजली पण त्याच बरोबर ‘गौरीचे वडील’, जौनपुरवाली अम्मा, पाताळयंत्री वाहिनी, वगैरे सारखी पात्र सुद्धा आपल्या चांगल्याच लक्षात राहिली. या सगळ्यात भाव खाऊन गेली ती ‘गौरीची आजी’. मायाळू, भांडखोर, कठोर असे अनेक पदर असलेला हा रोल होता.

मंडळी, आज आजींची आठवण काढण्याचं निमित्त म्हणजे आजींची भूमिका साकारणाऱ्या ‘शुभांगी जोशी’ यांची नवी ‘अॅड फिल्म’. राव आजींची भूमिका त्यांनी अशी काही साकारली की त्यांच्या शिवाय तो रोल कुणी करूच शकणार नाही. या जाहिरातीत सुद्धा त्यांनी आपल्या ‘आजीच्या’ आठवणी जागवल्या आहेत. ही जाहिरात बघून ‘दिल खुश हो जायेगा !’

‘नमस्ते इंडिया घी’ या कंपनीची ही जाहिरात आहे. गोष्ट अशी आहे की ‘यमराज’ एका वृद्ध आजींचा प्राण घ्यायला आलेला असतो पण आजी त्याला आपल्या पदार्थांनी अशी काही भुरळ घालतात की तो त्यांना न घेताच निघून जातो आणि उलट जाता जाता म्हणतो की ‘तुम्ही इथेच थांबा, मी येत जात राहीन.’

सुंदर विषय, उत्तम बांधणी आणि सुंदर अभिनयाने ‘नमस्ते इंडिया घी’ ची जाहिरात मस्त झाली आहे.

 

जाहिरात : नमस्ते इंडिया घी

 

अभिनय -

यमराज : अखिलेंद्र मिश्रा

आजी : शुभांगी जोशी

 

जाहिरात -

एजन्सी : एडीके फॉर्चून

दिग्दर्शक : राहुल दड्डा

संगीत दिग्दर्शक : ओनी उडील

क्रिएटीव्ह टीम : अक्षत चोप्रा

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!
मनोरंजन

'जिंकू किंवा मरू'चा जयघोष आणि 'छोटा जवान': जेव्हा नागरिक सैनिक बनला!

भारत-चीन युद्धानंतर देशवासीयांचे मनोधैर्य उंचावणारा 'छोटा जवान' चित्रपट आणि बालकलाकार सचिन-महेश कोठारे.

१५ ऑगस्ट, २०२६

'सतलज'वर बंदी: भारतीय चित्रपट आणि सेन्सॉरशिपचा 'बॅन' पॅटर्न
मनोरंजन

'सतलज'वर बंदी: भारतीय चित्रपट आणि सेन्सॉरशिपचा 'बॅन' पॅटर्न

'सतलज' चित्रपटावरील बंदीच्या निमित्ताने 'आंधी' ते 'किस्सा कुर्सी का' पर्यंत भारतीय चित्रपट आणि राजकीय सेन्सॉरशिपचा इतिहास.

१७ जुलै, २०२६

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!
मनोरंजन

'कॉपी' करण्यात आपण पटाईत आहोत वाटतं? मग हा १.२० कोटींचा आकडा नीट वाचा!

बॉलिवूडच्या 'नॉक आउट' चित्रपटाने हॉलीवूडच्या 'फोन बूथ'ची कथा चोरल्यामुळे कोर्टाने १ कोटी २० लाखांचा दंड ठोठावला होता.

२३ जून, २०२६