मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

शेअर बाजारातली पहिली 'सिनेमा' कंपनी: बॉम्बे टॉकीज आणि देविका राणींचा काळ

3 मिनिट वाचन

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली पब्लिक लिमिटेड कंपनी 'बॉम्बे टॉकीज' आणि अभिनेत्री देविका राणी यांचा प्रेरणादायी प्रवास.

शेअर करा:
शेअर बाजारातली पहिली 'सिनेमा' कंपनी: बॉम्बे टॉकीज आणि देविका राणींचा काळ

शेअर बाजारातली पहिली 'सिनेमा' कंपनी: बॉम्बे टॉकीज आणि देविका राणींचा तो काळ

१९३४ साली जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टी बाल्यावस्थेत होती,तेव्हा 'बॉम्बे टॉकीज' ही देशातील पहिली पब्लिक लिमिटेड सिनेमा कंपनी म्हणून शेअर बाजारात नोंदवली गेली होती.आज ९० वर्षांनंतरही या कंपनीचं नाव शेअर बाजाराच्या रेकॉर्डमध्ये 'बॉम्बे टॉकीज लिमिटेड' (BSE: 511246) म्हणून झळकत आहे

एखाद्या चित्रपट कंपनीने जनतेकडून पैसे उभे करून स्टुडिओ उभारण्याची ही भारतातील पहिलीच वेळ होती.या ऐतिहासिक कंपनीच्या केंद्रस्थानी होती एक महिला—देविका राणी.त्यांना 'फर्स्ट लेडी ऑफ इंडियन सिनेमा' म्हटलं जातं, पण त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या.त्या काळातील त्या सर्वात मोठ्या बिझनेस वुमन होत्या.रवींद्रनाथ टागोर यांच्या नात्यातील असलेल्या देविका राणींनी लंडनमध्ये शिक्षण घेतलं होतं. तिथेच त्यांची भेट हिमांशू राय यांच्याशी झाली आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली.

बॉम्बे टॉकीज हा त्या काळातील सर्वात आधुनिक स्टुडिओ होता. तिथे जर्मन तंत्रज्ञ काम करायचे, साऊंड-प्रूफ फ्लोअर्स होते आणि कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीनची सोय होती. हिमांशू राय यांनी व्हिजन दिलं आणि देविका राणींनी आपल्या अभिनयाने आणि ग्लॅमरने या कंपनीला यशाच्या शिखरावर नेलं. पण या झगमगाटाच्या मागे एक मोठा ड्रामा दडलेला होता.

यामागचं कारण म्हणजे १९३६ सालचा तो प्रसिद्ध किस्सा. 'जीवन नैया' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान देविका राणी त्यांचे सहकलाकार नजम-उल-हसन यांच्यासोबत पळून गेल्या होत्या. हिमांशू राय यांनी त्यांना शोधून परत आणलं, पण नजम-उल-हसन यांना कामावरून काढून टाकलं. आता प्रश्न होता की हिरो कोण होणार?

वस्तुस्थिती अशी आहे की, अशोक कुमार यांचा अभिनेता बनण्याचा कोणताही विचार नव्हता.ते स्टुडिओत लॅब असिस्टंट म्हणून काम करत होते. हिमांशू राय यांनी रागाच्या भरात या साध्या दिसणाऱ्या कुमुदलाल गांगुलीला (अशोक कुमार) कॅमेऱ्यासमोर उभं केलं.एका स्कँडलमुळे भारतीय सिनेमाला आपला पहिला मोठा सुपरस्टार मिळाला.

१९४० मध्ये हिमांशू राय यांचा मृत्यू झाला आणि बॉम्बे टॉकीजची संपूर्ण जबाबदारी देविका राणींच्या खांद्यावर आली. एका महिलेने एवढा मोठा स्टुडिओ चालवणं त्या काळात अनेकांना रुचलं नाही.अंतर्गत वाद वाढले आणि शशधर मुखर्जी, अशोक कुमार यांसारख्या दिग्गजांनी बाहेर पडून 'फिल्मिस्तान' नावाची वेगळी कंपनी स्थापन केली.

देविका राणींनी काही काळ झुंज दिली, 'किस्मत' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला, पण हळूहळू त्या सिनेमाच्या जगाला कंटाळल्या. १९४५ मध्ये त्यांनी रशियन चित्रकार स्वेतलोस्लाव रोएरिच यांच्याशी लग्न केलं आणि सिनेसृष्टीला कायमचा रामराम ठोकला.

त्यांचं उत्तर आयुष्य बंगळुरूच्या ४५० एकरच्या 'ततगुनी' इस्टेटमध्ये गेलं. तिथे त्या निसर्गाच्या सानिध्यात अगदी साधेपणाने राहिल्या. ज्या महिलेने भारतीय सिनेमाला कॉर्पोरेट शिस्त लावली, जिने दिलीप कुमारसारखा हिरा शोधला, ती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ग्लॅमरपासून कोसो दूर होती. १९९४ मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराला मोजकीच माणसं होती.

आज आपण मोठ्या प्रोडक्शन हाऊसेसच्या आयपीओबद्दल बोलतो, पण नऊ दशकांपूर्वी एका महिलेने हे स्वप्न सत्यात उतरवलं होतं. शेअर बाजाराच्या पडद्यावर आजही 'बॉम्बे टॉकीज' हे नाव दिसतं, तेव्हा ते एका विसरल्या गेलेल्या साम्राज्याची आठवण करून देतं.

आजच्या कॉर्पोरेट जगात काम करणाऱ्या किती महिलांना ठाऊक असेल की त्यांच्यासाठी हा रस्ता १९३० च्या दशकातच एका अभिनेत्रीने त्या तयार केला होता? देविकाराणींचा यांचा जन्मदिवस आहे

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!
लाइफस्टाइल

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!

सेबीसोबत १५०० कोटींची सेटलमेंट झाल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आयपीओचा मार्ग मोकळा झाला, पण सामान्य गुंतवणूकदारांचे काय?

८ सप्टेंबर, २०२६

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी
लाइफस्टाइल

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी आरडी इंडस्ट्रीजच्या आयपीओ लिस्टिंगमधून कोट्यवधींची कमाई कशी केली?

१३ ऑगस्ट, २०२६

एका वडाच्या झाडापासून ५ ट्रिलियन डॉलर्सच्या साम्राज्यापर्यंत: बीएसईचा १५० वर्षांचा प्रवास
लाइफस्टाइल

एका वडाच्या झाडापासून ५ ट्रिलियन डॉलर्सच्या साम्राज्यापर्यंत: बीएसईचा १५० वर्षांचा प्रवास

टाऊन हॉलसमोरील वडाच्या झाडाखाली पाच दलालांनी सुरू केलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा दलाल स्ट्रीटपर्यंतचा ऐतिहासिक प्रवास.

९ जुलै, २०२६

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?
लाइफस्टाइल

वॉल स्ट्रीटचे मोठे खेळीये गाशा गुंडाळतायत; गुंतवणूकदारांनी सावध होण्याची वेळ?

मायकल बरी आणि पीटर थिलसारखे दिग्गज गुंतवणूकदार शेअर्स विकून बाहेर पडत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.

२५ जून, २०२६

३७,७०० कोटींचा महा-आयपीओ: जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात इतिहास घडवणार!
लाइफस्टाइल

३७,७०० कोटींचा महा-आयपीओ: जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात इतिहास घडवणार!

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्स ३७,७०० कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत असून बाजारात मोठी हालचाल सुरू आहे.

२० जून, २०२६

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार
लाइफस्टाइल

कपाटातून क्लाउडपर्यंत: सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार

सोन्याच्या गुंतवणुकीचा नवा मार्ग: इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (EGR) म्हणजे काय आणि ते डिजिटल युगात कसे फायदेशीर आहे, याबद्दलची माहिती.

१० मे, २०२६