मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!!

4 मिनिट वाचन
शेअर करा:
जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!!

जगातले देश आणि त्यांचे ध्वज हा वेगळाच विषय आहे. देशाची संस्कृती, मानचिह्ने, राजकीय सत्ता आणि भूमिका यांबद्दलचं ध्वज हा एक विधान असतो. त्यामुळे बरेचदा देशांचे ध्वज बदलतातही. ध्वजांच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा अफगाणिस्तानचा ध्वज बदलण्यात आलाय आणि शेवटचा बदल आत्ता, यावर्षीच घडलाय. ३०व्यांदा हा ध्वज बदलण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात जे चालू होते त्यावर पूर्ण जगाचे लक्ष होते. तालिबान्यांनी हल्ला करून अफगाणिस्तानचा ताबा घेतला. अफगाणिस्तानचा स्वातंत्र्यदिन १९ ऑगस्ट रोजी असतो. तालिबानने राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा स्वातंत्र्यदिन आला. मात्र यावेळी काळा-लाल-हिरव्या ध्वजाऐवजी अरेबिक संदेश लिहिलेला पूर्ण पांढरा ध्वज त्यादिवशी फडकवण्यात आला. आज पाहूयात या ध्वज बदलांची संपूर्ण कहाणी..

अफगाणिस्तानला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळून १०० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊनही तालिबानमुळे अफगाणिस्तानला पुन्हा एकदा गुलामगिरीत अडकल्याचे जाणवत आहे. त्यांच्या विरोधात आता अफगाणिस्तानच्या लोकांनी स्वातंत्र्यलढा पुकारला आहे. आणि हा लढा लोकशाहीचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजासाठीही आहे. तालिबानला राष्ट्रध्वजाच्या जागी त्यांचा स्वतःचा ध्वज लावायचा आहे.

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 1

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल, पण अफगाणिस्तानात राष्ट्रध्वज बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या १०२ वर्षांमध्ये या देशाचा राष्ट्रध्वज ३० वेळा बदलण्यात आला. फक्त १९१९ मध्येच तो ६ वेळा बदलला गेला होता. ब्रिटिश राजवटीत म्हणजेच १९०१पर्यंत अफगाणिस्तानचा ध्वज साध्या काळ्या रंगाचा होता. नंतर या ध्वजावर एक राष्टचिह्न लावण्यात आले. या चिह्नात तलवारींवर उभी असलेली एक मशीद दिसते. १९१९ मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९२१ मध्ये अफगाणिस्तानच्या ध्वजाच्या मध्यभागी मशीद होती, मात्र खालच्या दोन तलवारींचा आकार कमी करण्यात आला होता.

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 2

१९२६ मध्ये अफगाणिस्तानला प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आणि त्यांच्या ध्वजातील तलवारी काढून टाकण्यात आल्या. १९२८ मध्ये एक नवीन ध्वज सादर करण्यात आला. हा अफगाणिस्तानचा पहिला रंगीत ध्वज होता. अफगाणिस्तान प्रजासत्ताक घोषित झाल्यावर पुन्हा एकदा मशीद तीन रंगी ध्वजाच्या मध्यभागी दिसू लागली आणि तलवारीही परतल्या. त्याच्या पुढच्याच वर्षी १९२९मध्ये मध्ये रंगांचे पट्टे आडव्याचे उभे झाले आणि १९३० मध्ये मशिदीसह ध्वजावर गव्हाच्या कोंबांना स्थान मिळाले. हे अफगाणिस्तानच्या समृद्धीचे प्रतिक होते. १९२८-३० मध्ये तब्बल 7 वेळा ध्वज बदलण्यात आला. नंतर १९३० ते १९७३ या कालावधीत मात्र ध्वज बदलण्यात आला नाही.

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 3

१९७३च्या लष्करी उठावानंतर ध्वज पुन्हा एकदा बदलण्यात आला, परंतु हा बदल किरकोळ होता. १९७४ मध्ये धवजमधील रेषा आडव्या झाल्या. ध्वजाच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला. ध्वजाच्या कोपऱ्यात एक गरुड काढण्यात आला. १९७४ ते १९७८ ध्वजामध्ये झालेला एकमेव बदल म्हणजे गरुड चिन्ह काढण्यात आले.

 

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 4

१९७८ मध्ये पुन्हा अफगाणिस्तानचा संपूर्ण ध्वज लाल झाला. गव्हाच्या ढिगाऱ्याने वेढलेल्या डिझाईनमध्ये एक शब्द लिहिला होता, 'खल्क' . याचा अर्थ लोक. १९८०-१९९२ मध्ये काळा,लाल, हिरव्या आडव्या रेषांचा ध्वज पुन्हा आला. पण त्यातले चिन्ह दोनदा बदलण्यात आले.

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 5

१९९६ मध्ये दोन वर्षांच्या लढाईनंतर तालिबानने काबूलवर कब्जा केला आणि अफगाणिस्तानला इस्लामिक अमिरात घोषित केले. तेव्हा त्यांनी तोच झेंडा फडकला होता जो आज फडकवला जात आहे.

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 6

२००२ मध्ये हमीद करझाई अफगाणिस्तानचे अध्यक्ष झाले आणि या देशाचा ध्वज पुन्हा बदलण्यात आला. अफगाणिस्तानचा ध्वज शेवटचा २०१३ मध्ये बदलण्यात आला होता. आणि आता अफगाणिस्तानातील लोक हा झेंडा हातात घेऊन तालिबानी ध्वजाचा विरोध करत आहेत. काही दिवसांपूर्वी जलालाबादमध्ये झेंड्यांची लढाई सुरू झाली, तेव्हा निदर्शकांनी तालिबानच्या पांढर्‍या ध्वजाच्या जागी अफगाण तिरंग्याचा ध्वज लावला. या संघर्षात तालिबानने तीन लोक मारले, देशाचा एकेकाळचा अधिकृत ध्वज आता तालिबानच्या विरोधाचे प्रतीक आहे.

ध्वज हा कोणत्याही देशाचा चेहरा असतो. त्यातला बदल हा देशातल्या बऱ्याच स्थित्यंतराचं प्रतिक असतो. अफगाणिस्तानात तेच घडत आहे. त्यामुळे आता यापुढेही त्यांचा राष्ट्रधवज टिकून तोच राहतो की तालिबान हा विरोध मोडून काढतात, यावर जगाचे लक्ष राहील.

सोबत हे ही वाचून घ्या...

 

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 7काही वेगळे राष्ट्रध्वज!! देशाची मूल्यं, स्वातंत्र्यलढा आणि कायकाय दडलेलं असतं या ध्वजांत!!

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 8या ११ देशांच्या ध्वजांचा सारखेपणा पाहून चक्रावून जाल...पाहा बरं भारताचा ध्वज कोणत्या देशाने ढापलाय ते !!

जगात सर्वाधिकवेळा राष्ट्रध्वज बदलणाऱ्या देशाचा ध्वज यावर्षी पुन्हा बदललाय!! जाणून घ्या त्याची स्थित्यंतरे आणि कारणे!! – चित्र 9या ४ प्रकारे देशांना नावे दिली जातात...पहा बरं भारत कोणत्या प्रकारात मोडतो !!

शीतल दरंदळे

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

यूपीआय आणि भारतीय आदरातिथ्य: एका एनआरआय जोडप्याचा हृदयस्पर्शी अनुभव!
लाइफस्टाइल

यूपीआय आणि भारतीय आदरातिथ्य: एका एनआरआय जोडप्याचा हृदयस्पर्शी अनुभव!

अमेरिकेत राहणाऱ्या एका जोडप्याला भारताच्या यूपीआय तंत्रज्ञानाने आणि एका टॅक्सी ड्रायव्हरच्या माणुसकीने कसे भारावून टाकले, याची ही सत्यकथा.

२२ फेब्रुवारी, २०२६