मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

नाणे जमवणे हा तुमचा छंद आहे का? इथे वाचा तुमच्या छंदाला व्यवसायात कसे बदलायचे ते!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
नाणे जमवणे हा तुमचा छंद आहे का? इथे वाचा तुमच्या छंदाला व्यवसायात कसे बदलायचे ते!!

विविध देशाच्या नोटा आणि नाणी जमवणे हा आता पोरखेळ राहीलेला नाही.नाणी संग्राहकांची मोठी यशस्वी बाजार पेठ आता भारतात विकसीत झालेली आहे. या विकासात आंतरजालाचे योगदान फार मोठे आहे.नाण्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे जुनी ऐतिहासीक संग्राह्य नाणी विकत घेऊन त्यात गुंतवणूक करणे. या पर्यायात अनभिज्ञ गुंतवणूकदारांचे पैसे पाण्यात जाण्याची शक्यता असते. नविन संग्राहकाला -गुंतवणूकादाराला दुसरा पर्याय आहे भारतीय टांकसाळी तर्फे वितरीत करण्यात येणार्‍या कमोमोरेटीव्ह कॉइन्स मध्ये गुंतवणूक करणे. छोट्या गुंतवणूकीतून मोठा फायदा कमावण्याची ही सुवर्णसंधी आहे. 

अशी नाणी इंडीया मिंट (भारतीय टांकसाळ) तर्फे वारंवार वितरीत केली जातात. या नाण्यांचे दोन संच वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक : यु.एन.सी म्हणजे अनसर्क्युलेटेड कॉइन्स आणि दोन : प्रूफ कॉइन्स. 

या पैकी एक किंवा दोन्ही संचात केलेली गुंतवणूक दिर्घकालीन नफा मिळवून देते.उदाहरणार्थ २००३ साली वितरीत झालेले राणा प्रतापांच्या नाण्याचा संच नुकताच  अकरा हजारात विकला गेला. 

सध्या उपलब्ध असलेली संधी आहे .अलाहाबाद हायकोर्टाच्या १५० व्या वर्षानिमित्त येणारा तीन नाण्यांचा संच .युएन्सी आणि प्रूफ अशा दोन्ही संचात ही नाणी उपलब्ध आहेत. गुंतवणूक चार हजाराची आहे. येत्या काही वर्षात हा संच फायदा  मिळवून देईल यात शंका नाही. 

समजा ,या नाण्यात तुम्हाला गुंतवणूक कराविशी वाटत नसेल तर टांकसाळीच्या सेल्स काउंटर वर आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या नाण्याचा संच उपलब्ध आहे . 

बाकी सर्व माहिती या दुव्यावर उपलब्ध आहे

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

२० किलो वजनाची तांब्याची नाणी आणि कागदाचा तुकडा: युरोपातील पहिल्या बँक नोटेची गोष्ट!
लाइफस्टाइल

२० किलो वजनाची तांब्याची नाणी आणि कागदाचा तुकडा: युरोपातील पहिल्या बँक नोटेची गोष्ट!

१६५० च्या दशकात स्वीडनमध्ये २० किलोच्या तांब्याच्या नाण्यांना कंटाळून युरोपातील पहिली कागदी नोट कशी जन्माला आली, वाचा ही रंजक कहाणी.

१६ जुलै, २०२६

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट
लाइफस्टाइल

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट

जिओ कॉईन्सच्या प्रतीक्षेत असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि एका चिमुरड्याने मुकेश अंबानींना विचारलेल्या प्रश्नाची ही मजेशीर गोष्ट.

२१ मे, २०२६