मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!!

आपल्यापैकी कोणत्या मुलीला किंवा महिलेला मॉडेल व्हावसं वाटत नाही?  प्रत्येकीला वाटतंच ना?  मस्त वेगवेगळे ड्रेसेस घालून मिरवणं कोणत्या मुलीला आवडणार नाही बरं? बघा हं, अशीच एखादी संधी तुम्हाला मिळाली तर? अहो, थट्टा नाही काही... हे खरंय !....एक घरगुती काम करणारी महिला चक्क मॉडेल बनलीये....

फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!! – चित्र 1

मनदीप नागी या दिल्लीतल्या एका फॅशन डिजाईनरनं आपल्या डिझाईन्सच्या प्रदर्शनासाठी मॉडेलच्याऐवजी चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला आपलं मॉडेल बनवलं. मनदीप नागी यांच्या शेजाऱ्यांकडे घरगुती कामात मदत करणारी ‘कमला’ (बदललेले नाव) हीच आपल्या डिझाईन्सला न्याय देऊ शकते असं नागी यांना वाटलं. त्यांना खऱ्याखुऱ्या मॉडेल्सबरोबर काम करण्यात काहीही रस नाही.  पण त्यांना खऱ्या सौंदर्याबरोबर काम करण्याची आवड आहे असं मनदीप यांचं मत आहे.

मनदीपने निवडलेली कमला ही चक्क दोन मुलांची आई आहे. आणि ती आपल्या उपजीविकेसाठी दिल्लीत  घरगुती काम करते.  मनदीप नागींनी कमलाला मॉडेल बनण्याची ऑफर दिली. पण माहिती आहे, ही  कल्पना कमलाला मान्य करायलाच एक दिवस लागला.  सुरुवातीच्या दिवसांत या फोटोशूटच्या  कामात तिला खूपच विचित्रसुद्धा वाटलं. आता तुम्हीच विचार करा, घरगुती काम करणार्‍या कमलासाठी हे किती वेगळं काम होतं!  साहजिकच नक्की काय आणि कसं करावं  हे तिला समजत नव्हतं.  पण हळूहळू कमलाने त्या कामाशी जुळवून घेतलं.

फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!! – चित्र 2

फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!! – चित्र 3

फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!! – चित्र 4

फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!! – चित्र 5सर्व फोटो स्रोत

कॅमेरा आणि तिची वेगळीच गट्टी जमली आणि तिलासुद्धा तिच्या सौंदर्याची खूण पटली. मेकअप आणि हेअरस्टाइल ह्यात तिने स्वतःचीच प्रगती होताना पाहिली. त्यानंतर कमलाला आत्मविश्वास आला.  ह्या आत्मविश्वासाच्या आणि तिच्या निखळ सौंदर्याच्या मदतीने नागी यांच्या कामाला दाद मिळाली. एका प्रोफेशनल मॉडेलप्रमाणं कॅमेऱ्याशी खेळत तिनं ही लढाई जिंकली असंच म्हणता येईल. खरं सौंदर्य हे बघाणाऱ्याच्या नजरेत असतं.  ते सृष्टीत नाही तर आपल्याच दृष्टीत लपलेलं असतं हे मनदीप नागी यांनी सिद्ध केलंय!!

 

लेखिका : संयुक्ता पेनुरकर.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइललग्नासाठी १७ लाख आणि घर बांधायला मोफत जमीन देणारा देश: युएईचे वेल्फेअर मॉडेल!संयुक्त अरब अमिराती आपल्या नागरिकांना लग्नासाठी १७ लाख रुपये आणि मोफत जमीन का देते? जाणून घ्या तिथल्या वेल्फेअर स्टेटची माहिती.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सृजनमित्र २०२६: बोभाटाचा दिवाळी अंक. यंत्रांनी लिहिलेला मराठी अंक. ते चांगलं लिहू शकतं का?
लाइफस्टाइल

'माणूस खोटं बोलतो, मीटर बोलत नाही' हे वाक्य माणसाने लिहिलेलंच नाही!

बोभाटाच्या दिवाळी अंकातल्या २१ रचना पाच यंत्रांनी लिहिल्या आहेत. जमलंय की नाही, ते तुम्ही ठरवायचं.

५ नोव्हेंबर, २०२६

यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील
लाइफस्टाइल

यशाचं 'पंचामृत': या ५ मानसिक वृत्ती तुम्हाला गर्दीतून बाहेर काढतील

शार्क, ससाणा, रानगवा, कोल्हा आणि मुंगी यांच्या नैसर्गिक वृत्तींतून शिकण्यासारख्या ५ यशाच्या प्रभावी मानसिक पद्धती.

१० ऑगस्ट, २०२६