मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

ऐका लेडी भगीरथची कहाणी...३ महिन्यात खोदली ६० फुट खोल विहीर !!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
ऐका लेडी भगीरथची कहाणी...३ महिन्यात खोदली ६० फुट खोल विहीर !!!

अधून मधून आपण एक वाक्य नेहमी ऐकत असतो मंडळी ते म्हणजे ‘तिसरं महायुद्ध हे पाण्यामुळेच होईल’. काही जण तर अगदी ठासून सांगतात. सध्याची परिस्थिती बघता ते खरेही वाटते. दुष्काळ, हवामान, पर्यावरण ऱ्हास अशी गोंडस करणं देऊन चर्चा झडतात, पण या सर्वांना आपणच कारणीभूत आहोत हे मात्र आपण विसरतो.

मंडळी हे सर्व सांगण्यामागचा उद्देश असा की पाण्याची समस्या वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून 'पाणी फाउंडेशन' सारख्या संस्था कामही करत आहेत. पण व्यक्तिगत स्वरुपात आपणही यावर मात करू शकतो हे एका स्त्रीने दाखवून दिलंय.

उत्तर कन्नडमधल्या सिरसी गावातल्या ‘गौरी नायक’ या महिलेने अवघ्या ३ महिन्यात तब्बल ६० फूट खोल विहीर खणली आहे मंडळी. शेवटच्या दिवसात फक्त तीन महिलांना त्यांनी मदतीला घेतले. बाकी पूर्ण विहीर त्यांनी एकटीने खोदली आहे.

51-Year-Old Woman Single-Handedly Dug A 60-Foot Deep Wellस्रोत

झालं असं की, गौरी यांच्या नारळाच्या आणि पोफळीच्या झाडांना पाणी हवे म्हणून त्यांनी विहीर खोदायचं ठरवली. पण पैसे नसल्याने ते शक्य नव्हते. शेवटी त्यांनी स्वतःहून विहीर खोदायचं काम हाती घेतलं आणि बघता बघता ३ महिन्यात विहीर खोदून पूर्णही झाली. अंगदुखीची तक्रार असूनसुद्धा त्यांचं काम काही थांबलं नाही.

गौरी यांच्या रोजच्या ५ ते ६ तास मेहनतीने आज त्यांच्यासाठी आणि गावकऱ्यांसाठी पाण्याचा भक्कम स्रोत उपलब्ध झाला आहे. कौतुकाची बाब म्हणजे या कामगिरीला अनुसरून त्यांना एक योग्य नावही देण्यात आले.  ते म्हणजे ‘लेडी भगीरथ’ ! आहे ना योग्य नाव ?

Gowri Chandrasekhar Naik digs 60-feet-deep well

वेठबिगारी करणाऱ्या एक सामान्य महिलेने समाजापुढे ठेवलेला हा एक मोठा आदर्श आहे असंच म्हणावं लागेल. अश्या या लेडी भगीरथला बोभाटाचं साष्टांग दंडवत !!!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलबागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!
लाइफस्टाइल

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.

३ नोव्हेंबर, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!
लाइफस्टाइल

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचा जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास.

१६ मे, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६