मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

५ लाख रुपयांची झाडे खाल्ली म्हणून गाढवांना जेल मध्ये टाकलं भाऊ...आहात कुठे !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
५ लाख रुपयांची झाडे खाल्ली म्हणून गाढवांना जेल मध्ये टाकलं भाऊ...आहात कुठे !!

गुन्हा हा गुन्हा असतो. कायद्याप्रमाणे सर्वांनाच शिक्षा होते. सिनेमातला एक प्रसिद्ध डायलॉग आहे, ‘कानून के हात लंबे होते हें...’ अर्थात कायद्यापासून कोणीही पळू शकत नाही. मग या गाढवांची काय बिशाद आहे राव!! आता ती गाढवं जरी असली तरी त्यांनी चोरी केली आहे. असो...

तर भाऊ, झालं असं की उत्तर प्रदेशच्या उरई जेलमध्ये काही झाडे लावायची होती. ही झाडे जेलच्या बाहेरच्या आवारात ठेवण्यात आली होती. थोड्याच दिवसात ती जेलमध्ये लावण्यात येणार होती. पण बाहेर फिरणाऱ्या ८ गाढवांनी ती सगळी झाडे खाऊन फस्त केली. आता ही झाडे काही हजार दहा हजारची नव्हती, त्यासाठी तब्बल ५,००,००० रुपये मोजावे लागले होते. एवढं मोठं नुकसान झाल्यावर युपीच्या पोलिसांनी गाढवांनाच ताब्यात घेतलं. अश्या प्रकारे गाढवांची स्वारी जेल मध्ये पोहोचली.

आठही गाढवांना उरई जेलमध्ये ४ दिवस ठेवण्यात आलं होतं. या गाढवांच्या मालकाने विनंती करून आपल्या गाढवांना सोडवून आणलं आहे. कालच त्यांची सुटका करण्यात झाली. मंडळी, या घटनेने अनेकांना बुचकळ्यात पाडलंय. कोणत्या कायद्यानुसार गाढवांना जेल मध्ये टाकलं? असा एक सवाल विचारला जातोय. तर काही जण कायद्यालाच गाढव म्हणतायत. काहीही असलं तरी ही केस विचित्रच आहे.

मंडळी, शेवटी एक प्रश्न पडला की नक्की गाढव कोण ?

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएका अजगरासाठी ३० झुरळं खाणारा तरुण आणि एका रात्रीत मृत्यू!फ्लोरिडामध्ये एका अजगरासाठी आयोजित केलेल्या झुरळं खाण्याच्या स्पर्धेत एडवर्ड आर्चबोल्ड या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण
लाइफस्टाइल

३८ जणांची हत्या करून मांस खाल्ल्याचा आरोप: युगांडातील भयावह प्रकरण

माणूस माणसाला खातो? युगांडात मुजुरिझी मोझेस नावाच्या व्यक्तीवर पंधरा वर्षांत ३८ जणांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप आहे. हे आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.

३० ऑक्टोबर, २०२६

नीता अंबानींच्या दागिन्यांचे ७ खास नमुने: किंमत ऐकून थक्क व्हाल!
लाइफस्टाइल

नीता अंबानींच्या दागिन्यांचे ७ खास नमुने: किंमत ऐकून थक्क व्हाल!

जगातील काही नामांकित ज्वेलर्सनी घडवलेले, दुर्मीळ हिरे, पाचू, मोती आणि ऐतिहासिक संदर्भांनी नटलेले नीता अंबानी यांच्या दागिन्यांचे हे सात नमुने पाहू या.

२२ ऑक्टोबर, २०२६