मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

बाईक, कार, पैसे नाही तर चोरांनी अख्खा बस स्टॉप चोरून नेलाय.....असा प्रकार कधी पाह्यलाय का ?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
बाईक, कार, पैसे नाही तर चोरांनी अख्खा बस स्टॉप चोरून नेलाय.....असा प्रकार कधी पाह्यलाय का ?

बाईक, कार चोरी होणे तसे नेहमीचेच. घरात, ऑफिसात कधी चोरी होईल काय सांगता येत नाही. मोठ्या आकाराच्या गाड्या चोरणे तसे कठीण, पण चोर तेही शक्य करून दाखवतात. पण पुण्याने नविन विक्रम केला आहे.

पुणे आणि पाट्या हे काही नवं प्रकरण नाही. पण कालपासून पुण्यात लागलेल्या एका बॅनरने खळबळ माजवली आहे. या बॅनरच्या म्हणण्यानुसार चक्क आख्खा बस स्टॉप चोरीला गेला आहे. एवढेच नाही, तर जे कोणी हा बस स्टॉप चोरीला गेला या गोष्टीची माहिती देतील, त्यांना ५,००० रुपये इनाम देखील जाहीर झाले आहे. 

बाईक, कार, पैसे नाही तर चोरांनी अख्खा बस स्टॉप चोरून नेलाय.....असा प्रकार कधी पाह्यलाय का ? – चित्र 1

या बॅनरवर लिहिले आहे, 'बी टी कवडे देवकी पॅलेस समोरील बसस्टॉप चोरीला गेला आहे. कोणाला दिसल्यास संपर्क साधा, रोख रु ५,००० रुपये देण्यात येतील. - नगरसेवक प्रशांत म्हस्के... 

या बॅनरमुळे मात्र पुण्यात चर्चांना उधाण आले आहे. लोक सोशल मीडियावर देखील या बॅनरचे फोटो फिरवत आहेत. आता हे बॅनर कशासाठी लावण्यात आले, आणि त्यामागील हेतू नक्की काय होता, याचा उलगडा अजून झाला नसला तरी लोकांची करमणूक मात्र झाली आहे. 

बाईक, कार, पैसे नाही तर चोरांनी अख्खा बस स्टॉप चोरून नेलाय.....असा प्रकार कधी पाह्यलाय का ? – चित्र 2

काही वर्षांपूर्वी "जाऊ तिथं खाऊ" नावाच्या सिनेमात विहिर चोरीला गेली होती, तसे तर हे प्रकरण नसेल ना?

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६