मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जम्बो किंगचा १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास....वाचा धीरज गुप्ता यांची यशोगाथा !!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
जम्बो किंगचा १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास....वाचा धीरज गुप्ता यांची यशोगाथा !!

महाराष्ट्राचा लाडका बर्गर म्हणजे वडापाव. अगदी चमचमीत आणि खिशाला परवडणारा हा लाडका पदार्थ. लोकल टू ग्लोबल पोहोचणाऱ्या या इंडियन बर्गरने फक्त देशभरात नाही, तर इंग्रजांच्या मेन्यूकार्डमध्येही स्थान कमावलं. पंधरा रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत या वन मिल डिशची रेंज आहे. जर तुम्ही मुंबईला गेला आणि वडा पाव खाल्ला नाही, तर हा मुंबई शहराचा एक स्पेशल पदार्थ मिस केला समजा. याच वडापावचीच लोकप्रियता पाहून एका व्यवसायिकाने १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास केला आहे. आज वाचूया धीरज गुप्ता यांची प्रेरणादायी कहाणी.

जम्बो किंगचा १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास....वाचा धीरज गुप्ता यांची यशोगाथा !! – चित्र 1

धीरज गुप्ता यांचा जम्बो वडापाव मुंबईत खूप लोकप्रिय आहे. साध्या वड्यापेक्षा हा वडा २० टक्के मोठा आहे. म्हणून जम्बो वडा असे नाव ठरले. याच्या शाखा मुंबई, पुणे, इंदूर आणि लखनऊसह इतर शहरांमध्ये  आहेत. तसेच सध्या ११४ फ्रँचाइजी आहेत. त्यांचे पुढचे लक्ष्य १८० आउटलेट्सचे आहे.  मार्च २०२२ पर्यंत देशभरात हे आउटलेट्स चालू करण्याचे त्यांनी उद्दीष्ट ठेवले आहे.

मॅकडोनाल्डच्या बर्गरच्या लोकप्रियतेमुळे प्रेरित होऊन धीरजने वडा पाव निवडले. जंबोकिंग सुरू करण्यासाठी त्यांनी दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि मालाड रेल्वे स्थानकाबाहेर १०० चौरस फूट जागेत व्यवसाय सुरु केला. तिथे त्यांनी स्वच्छ जागेत बनवलेल्या वडा पाव विक्रीला सुरवात केली. तसेच त्याची चवही बाजारात मिळणाऱ्या वडापावपेक्षा कशी वेगळी आणि चवदार बनेल याचा अभ्यास केला. बाजारात असलेल्या वडा पावच्या तुलनेत हा जंबो वडा पाव आकारात २० टक्के मोठा होता.

जम्बो किंगचा १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास....वाचा धीरज गुप्ता यांची यशोगाथा !! – चित्र 2

धीरज गुप्ता यांचा आधी मिठाई व्यवसाय करण्याचा विचार होता. तिथे त्यांनी २ वर्ष कामही केले. पण तो व्यवसाय अयशस्वी ठरला. आर्थिक नुकसानही झाले. पण मनात असलेली व्यवसाय करण्याची दुर्दम्य इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. अपयशाने खचून न जाता त्यांनी या वडापावच्या व्यवसायात उडी घ्यायची ठरवली. हळूहळू जम्बो वडापावला लोकप्रियता मिळू लागली. त्यांचे यश पाहून अनेक जणांनी कॉपी करत वेगवेगळ्या नावाने जम्बो वडापाव आणले. तेव्हा धीरज यांनी फ्रँचाइजी देण्यास सुरुवात केली आणि आऊटलेट्स वाढवले.

आता जंबोकिंगमध्ये सेझवान जंबोकिंग आणि छोले जंबोकिंग हे प्रकार आहेत. त्यासहित तिथे बऱ्याच नवनवीन चटपटीत पदार्थांची रेलचेल असते. जसे की टँजी मेक्सिकन, कॉर्न पालक, नाचोस, चीज ग्रील्ड, बिग क्रंच, तंदुरी पनीर आणि क्रिस्पी वेज. तसेच बर्गरचेही प्रकार मिळतात जसे मॅक आणि चीज बर्गर. त्यासह आईस्क्रीम,  मिल्क शेक, आणि फ्रेंच फ्राइस देखील येथे मिळतात.

जम्बो किंगचा १०० चौरस फूट ते १०० कोटींचा थक्क करणारा प्रवास....वाचा धीरज गुप्ता यांची यशोगाथा !! – चित्र 3

धीरजने यशाचे गुपित विचारल्यावर संगितले की, ग्लोबल क्यूएसआर जायंट्सच्या बिझिनेस मॉडेल्सचे निरीक्षण करून त्यांनी त्याचा वापर केला. तसेच पदार्थांची गुणवत्ता टिकवणे याकडेही लक्ष दिले. पर्याय वाढवण्याऐवजी एका पाककृतीवर प्रयत्न करून सुधारणा करणे जास्त गरजेचे आहे, यावर त्यांचा विश्वास आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय बुडले. संकटाचा काळ सरल्यानंतर जम्बोकिंग नव्या जोमाने व्यवसाय परत सुरु केला आहे. खवय्यांची पावलं परत जम्बो वडापावकडे वळू लागली आहेत. त्यांचे पुढचे प्लॅनही यशस्वी होतील यासाठी त्यांना शुभेच्छा.

धीरज गुप्ता यांची कहाणी ही खरंच अनेक नवव्यवसायिकांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

 

लेखिका: शीतल  दरंदळे

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

५१ व्या वर्षी सुरू झालेलं लोणच्याचं साम्राज्य: 'झाजी स्टोअर'ची ही चवदार यशोगाथा
लाइफस्टाइल

५१ व्या वर्षी सुरू झालेलं लोणच्याचं साम्राज्य: 'झाजी स्टोअर'ची ही चवदार यशोगाथा

बिहारमधील दोन गृहिणी कल्पना झा आणि उमा झा यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी सुरू केलेल्या 'झाजी स्टोअर' या ५ कोटींच्या लोणचे ब्रँडची गोष्ट.

१६ जून, २०२६

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स
लाइफस्टाइल

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स

शेअर बाजारात शांतपणे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सामान्य ट्रेडर्सच्या यशोगाथा सांगणाऱ्या पुस्तकाचा आढावा.

९ मार्च, २०२६

जगभरात भारतीयांचा तिरस्कार का होतो? आर्थिक प्रगती की नागरी शिस्त?
लाइफस्टाइल

जगभरात भारतीयांचा तिरस्कार का होतो? आर्थिक प्रगती की नागरी शिस्त?

परदेशात भारतीयांच्या वाढत्या संपत्तीमुळे आणि प्रभावामुळे स्थानिकांमध्ये निर्माण होणाऱ्या आर्थिक असुरक्षिततेचा घेतलेला आढावा.

१८ फेब्रुवारी, २०२६

१० वी - १२ वी चे मार्कं म्हणजे आयुष्य नाही! विनीत नायर यांचा तो 'व्हायरल' संदेश
लाइफस्टाइल

१० वी - १२ वी चे मार्कं म्हणजे आयुष्य नाही! विनीत नायर यांचा तो 'व्हायरल' संदेश

बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी HCL चे माजी सीईओ विनीत नायर यांचा डोळे उघडणारा संदेश.

१५ फेब्रुवारी, २०२६