मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

चमत्कार !! चमत्कार !! मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेले पाकीट तब्बल १४ वर्षांनी सापडले !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
चमत्कार !! चमत्कार !! मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेले पाकीट तब्बल १४ वर्षांनी सापडले !!

काही वर्षांपूर्वी हरवलेले भाऊ किंवा इतर जिवलग एकमेकांना भेटले अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. सलमान खानच्या भारत सिनेमात देखील कित्येक वर्षांनी लोकांची त्यांच्या कुटुंबियांची कशी भेट झाली हे दाखवले आहे. एकवेळ माणसे परत सापडतील, पण लोकलमध्ये चोरीला गेलेले किंवा हरवलेले सामान परत मिळणार नाही असे समजले जाते.

पण मुंबईत मात्र हा चमत्कार घडला आहे. चक्क चौदा वर्षांनंतर एकाला त्याचे हरवलेले पकिट परत मिळाले आहे. गोष्ट २००६ ची!! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये हेमंत पेडळकर यांचे पैशांचे पाकिट हरवले होते. त्यावेळी त्यात ९०० रुपये होते. साहजिकच आता त्यांना कदाचित त्यांना या घटनेचा विसर पडला असावा.

चमत्कार !! चमत्कार !! मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेले पाकीट तब्बल १४ वर्षांनी सापडले !! – चित्र 1

एप्रिलमध्ये पडळकरांना जीआरपीकडून फोन आला, तुमचे पाकिट सापडले आहे, येऊन घेऊन जा म्हणून त्यांनी सांगितले. तेव्हा लॉकडाऊन असल्याने त्यांना जाता आले नाही. पण त्यांनी आता त्यांचे वॉलेट परत घेतले आहे.

किती रुपये परत मिळाले?

चमत्कार !! चमत्कार !! मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेले पाकीट तब्बल १४ वर्षांनी सापडले !! – चित्र 2

(प्रातिनिधिक फोटो)

त्यांच्या वॉलेटमध्ये ९००रुपये होते. त्यात एक ५०० ची नोट होती. २०१६ सालीच ही नोट कागज का तुकडा झाली आहे. बाकीच्या कामकाजासाठी स्टॅम्पचे १०० रुपये कापून पोलिसांनी त्यांना ३०० रुपये दिले आहेत. पण त्यांचे ५०० रुपयेही पोलीस बदलून देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिटचोराला काही दिवसांपूर्वीच अटक झाल्याने त्याच्याकडून हे पाकिट जप्त केले आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी वर्षे त्यानेही या पाकिटातले पैसे खर्च न करता ते जसेच्या तसे सांभाळून ठेवले होते!!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे
लाइफस्टाइल

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे

आयआरसीटीसीने महसूल वाढवण्यासाठी तेजस एक्सप्रेसच्या ब्रँडिंगचा अनोखा करार कोका-कोला कंपनीशी केला आहे.

१४ ऑगस्ट, २०२६

९० वर्षांच्या आजींच्या मृत्यूवर पैसे लावले आणि वकिलाचेच दिवाळे निघाले!
लाइफस्टाइल

९० वर्षांच्या आजींच्या मृत्यूवर पैसे लावले आणि वकिलाचेच दिवाळे निघाले!

जीन कॅलमेंट यांच्या घरावर 'व्हायेजर' करार करणाऱ्या फ्रेंच वकिलाचा अजब डाव कसा उलटला, त्याची रंजक कथा.

१३ ऑगस्ट, २०२६