आजच्या पिढीचा परवलीचा शब्द म्हणजे मीम!! मीम ही गोष्ट कदाचित भविष्यात चाकाच्या शोधाइतकीच क्रांतिकारी मानली जाईल की काय अशी शंका यावी इतके सगळीकडे मीम्स दिसत असतात.
मीम्स बनवताय? ठीक आहे, पण हा शब्द किती जुना आहे आणि आला कुठून हे तर माहित करुन घ्या!!


एक चित्र हजार शब्दांचं काम करतं असं म्हणतात. पण मीम त्याच्याही पुढं जातं. काम मोठमोठे लेख लिहून होत नाही ते काम एका मीमने होते. मीममधून भावभावना, विनोद, भाषेचे अलंकार, उपहास.. काय कळत नाही ते सांगा!! आतातर मीम भाषा बनेल की काय असे वाटायला लागले आहे. लोक एकमेकांना मीम पाठवून कितीतरीवेळ बोलत असतात. तसं तर मीमबद्दल काहीही बोलण्याची गरज नाही एवढा परिचित हा शब्द आहे. पण हा मीम शब्द कुठून आला हे मात्र तुम्हाला माहीत नसेल. तर चला, जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या या शब्दाचा नेमका उगम कुठे झाला हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रिचर्ड डॉकिन्स नावाचे एक ब्रिटिश वैज्ञानिक आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिकलेले आणि काही काळ तिथेच शिक्षक म्हणून काम केलेल्या डॉकिन्स यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाचे नाव होते 'द सेल्फीश जीन'!! या पुस्तकात मीम या शब्दाचा वापर सर्वप्रथम आला आहे. या पुस्तकात मीमचा उल्लेख उत्क्रांतीच्या काळात कशाप्रकारे बदल होतात या अर्थाने आला आहे.
या डॉकिन्सना सुद्धा कदाचित माहीत नसेल की आपल्या पुस्तक लिहिल्याच्या ३० वर्षांनंतर हा शब्द जगातला कळीचा शब्द बनणार आहे.

संबंधित लेख

अदम्य साहस करणारे क्रांतिकारक उधमसिंह !!!
१३ मार्च, २०२५

गेल्या शतकातील स्त्रीजीवन कसं होतं हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचाच !
३ फेब्रुवारी, २०२५

नक्षलवादी संपतील पण नक्षलवाद संपेल का ?
२ जुलै, २०२५

गाण्यांच्या आवडीवरून 'जनरेशन गॅप' मोजायची बोभाटाची सोप्पी पध्दत आज वाचा !
१५ मार्च, २०२५

