मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

शेतीत केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा कसा मिळवला? उत्तर प्रदेशच्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा !!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
शेतीत केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा कसा मिळवला? उत्तर प्रदेशच्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा !!

भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही शेती ही उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. अनेक शेतकरी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करून अधिक चांगला नफा कमवत आहेत. सेंद्रिय पद्धत शेतीसाठी वरदानच ठरत आहे. आज आपण अशा एका महिला शेतकऱ्याबद्दल बोलू ज्यांनी आपल्या अनोख्या शेतीपद्धतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ज्या शेतातून साधा लागवडीचा खर्चही काढणे कठीण होते, त्या शेतात या महिलेने आपल्या परिश्रमांनी टोमॅटोचे पीक घेतले. आता त्यांचे टोमॅटो परदेशात जात आहेत.

शेतीत केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा कसा मिळवला? उत्तर प्रदेशच्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा !! – चित्र 1

कनकलता यांचं वय ५२ वर्षे आहे. त्या उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात राहतात. विठ्ठलपूर गावात असलेल्या त्यांच्या शेतात त्या टोमॅटोची लागवड करतात. कनकलता यांच्या टोमॅटोला यूके आणि ओमान सारख्या देशांकडून मागणी आहे. पूर्वी त्या लागवड पारंपारिक जुन्या पद्धतींनी करायच्या पण त्यामुळे नफा फारसा व्हायचा नाही. मग एकेदिवशी त्या नाबार्ड आणि कृषी विभागाच्या एक कॅम्पमध्ये गेल्या, तिथे त्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याची माहिती मिळाली आणि तेव्हा त्यांनी ठरवले की या पद्धतीने शेती करायची.

शेतीत केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा कसा मिळवला? उत्तर प्रदेशच्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा !! – चित्र 2

कनकलता त्यांच्या दीड एकर शेतात मटार आणि टोमॅटोची लागवड करत. चांगले उत्पादन होत नसल्याने उत्पन्न तुटपुंजे होते, पण जेव्हापासून कनकलता यांनी शेतीची पद्धत बदलली आहे तेव्हापासून उत्पादन वाढू लागले. त्यांनी शेतात सेंद्रिय खताच्या साहाय्याने ठिबक सिंचन व तुतीच्या पालापाचोळा वापरुन टोमॅटोची लागवड केली. या नवीन तंत्राने त्यांचं उत्पन्न वाढलं. आता दररोज दीड ते ७ क्विंटल टोमॅटो त्यांच्या शेतात पिकतात. केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा त्यांनी मिळवला आहे. एवढंच नाही तर त्यांच्या शेतात पिकलेले टोमॅटो परदेशातही जातात. लंडन आणि ओमान सारख्या देशांत त्यांच्या टोमॅटोला खूप मागणी आहे.

शेतीत केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा कसा मिळवला? उत्तर प्रदेशच्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा !! – चित्र 3

कनकलता यांना नवचेतना अ‍ॅग्रो सेंटर प्रोड्यूसर लिमिटेड नावाच्या कंपनीकडून या आधुनिक शेतीची माहिती मिळत राहते. या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश पांडे म्हणतात की, 'कनकलता यांनी सेंद्रिय खत वापरून नव्या प्रजातींचे टोमॅटो तयार केले आहेत. केवळ साठ हजार रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड करून तिप्पट फायदा मिळवला आहे.'

या टोमॅटोचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे टोमॅटो काही महिने खराब होत नाही. अशा नवीन प्रजातींमुळे या टोमॅटोची मागणी वाढत आहे. ओमान आणि लंडन येथे त्यांनी टोमॅटो पाठवल्यानंतर टोमॅटोच्या उत्तम दर्जाबद्दल त्यांचे खूप कौतुक झाले. त्या शेतकऱ्यांना आता या नवीन पद्धतीने शेती करण्यास मार्गदर्शनही करत आहेत.

शेतीत केवळ ६० हजार गुंतवून २.५ लाखाचा नफा कसा मिळवला? उत्तर प्रदेशच्या महिला शेतकऱ्याची यशोगाथा !! – चित्र 4

कनकलता यांच्या अथक प्रयत्नांमुळे शेतीची ही पद्धत आता त्यांच्या जिल्ह्याची ओळख बनली आहेत. कनकलता यांनी हे दाखवून दिले की शेतात नीट अभ्यास आणि मार्गदर्शन मिळवून लागवड केली तर चांगले उत्पन्न मिळवणे सोपे जाते.

 

लेखिका: शीतल दरंदळे

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलजगभरात भारतीयांचा तिरस्कार का होतो? आर्थिक प्रगती की नागरी शिस्त?परदेशात भारतीयांच्या वाढत्या संपत्तीमुळे आणि प्रभावामुळे स्थानिकांमध्ये निर्माण होणाऱ्या आर्थिक असुरक्षिततेचा घेतलेला आढावा.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

‘लाडू विकणारे आता डिग्र्या विकणार का?’: LPU च्या यशाची प्रेरणादायी गोष्ट
लाइफस्टाइल

‘लाडू विकणारे आता डिग्र्या विकणार का?’: LPU च्या यशाची प्रेरणादायी गोष्ट

जालंधरमधील एका छोट्या मिठाईच्या दुकानापासून सुरू झालेला प्रवास आज 'लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'च्या अवाढव्य साम्राज्यापर्यंत कसा पोहोचला?

१३ मार्च, २०२६

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स
लाइफस्टाइल

जगाच्या नजरेआड राहून कोट्यवधी कमावणाऱ्या अवलियांची गोष्ट: अननोन मार्केट विझार्ड्स

शेअर बाजारात शांतपणे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या सामान्य ट्रेडर्सच्या यशोगाथा सांगणाऱ्या पुस्तकाचा आढावा.

९ मार्च, २०२६

१० वी - १२ वी चे मार्कं म्हणजे आयुष्य नाही! विनीत नायर यांचा तो 'व्हायरल' संदेश
लाइफस्टाइल

१० वी - १२ वी चे मार्कं म्हणजे आयुष्य नाही! विनीत नायर यांचा तो 'व्हायरल' संदेश

बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी HCL चे माजी सीईओ विनीत नायर यांचा डोळे उघडणारा संदेश.

१५ फेब्रुवारी, २०२६