मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

चोरट्यांनी ट्रॅफिकमधून चक्क मिराज विमानाचे चाकं पळवले!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
चोरट्यांनी ट्रॅफिकमधून चक्क  मिराज विमानाचे चाकं पळवले!!

वस्तूंची चोरी होणे काय नविन गोष्ट नाही. काही जबरदस्त डोक्यालिटी लढवून चोऱ्या करतात. तर काही अशा ठिकाणी चोरी करतात, जिथे त्यांच्या हिमतीला काय म्हणावे असा प्रश्न पडतो. लखनऊ येथे चक्क एका मिराज फायटर विमानाचे टायर चोरी झाले आहे.

लष्करी सामानांचे वाहतूक करणारी एक ट्रक जोधपूर जाण्यासाठी लखनऊ एयरबेसवर निघाली होती. चोरट्यांनी ट्रक ट्रॅफिकमध्ये अडकली आहे या गोष्टीचा फायदा उचलून थेट मिराज विमानाचे टायर लंपास केले आहे. या ट्रकचा ड्रायव्हर हेम सिंग रावतने या घटनेची माहिती दिली आहे.

हे टायर कोणी चोरी केले हे अजूनपर्यंत समजू शकले नाही. शहीद पथवर ट्रॅफिक जाम असल्याने स्कॉर्पिओ आलेले चोर मिराजच्या टायरला पट्ट्याने ओढून गायब करते झाले. ड्रायव्हरला हा प्रकार समजेपर्यन्त चोर पसार झाले होते. शेवटी ड्रायव्हरने हा प्रकार पोलिसांना कळवला.

मिराज विमानाचे ५ टायर लखनऊहुन पाठवले जात असताना चोरांनी थेट ट्रॅफिकमधून टायर गायब केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. १२.३० ते १ या भर दिवसाच्या वेळेत ही घटना घडली. फायटर विमानाचे टायर चोरीला गेल्याने पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

पोलीस आता गोष्टीचे महत्व ओळखून खच्चून तपास करतील. टायरचोर पण आज ना उद्या सापडतील, चोर सापडल्यावरच त्यांनी हे टायर बाजारात विकण्यासाठी चोरी केले की इतर कारणासाठी हे स्पष्ट होईल.

उदय पाटील

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलवाहतूक नियमांचे शिस्तशीर पालन!! हा भारतातल्या कुठल्या राज्यातला फोटो असेल असे वाटते?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

१२ टन किटकॅटची चोरी? चॉकलेटच्या ४ लाख बारचा असा झाला थरार!
लाइफस्टाइल

१२ टन किटकॅटची चोरी? चॉकलेटच्या ४ लाख बारचा असा झाला थरार!

इटलीहून पोलंडला जाणारा १२ टन किटकॅटचा ट्रक वाटेतच गायब झाला. ४ लाख चॉकलेट बारच्या या अजब चोरीमागचं रहस्य काय?

२ एप्रिल, २०२६

अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प
लाइफस्टाइल

अमेरिकेतून नेपाळला परतणार १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे दुर्मिळ शिल्प

नेपाळमधून तस्करी करून अमेरिकेत नेलेले १२ व्या शतकातील गौतम बुद्धांचे ऐतिहासिक शिल्प आता पुन्हा मायदेशी परतणार आहे.

२० मार्च, २०२६