मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

तुमच्या नकळत फोनला हात लावणारा तो 'अदृश्य' चेहरा आता उघड होणार!

4 मिनिट वाचन

तुमच्या गैरहजेरीत कोणी तुमचा मोबाईल तपासलाय का? आता 'WTMP' अ‍ॅप गुपचूप फोटो काढून चोराला पकडणार!

शेअर करा:
तुमच्या नकळत फोनला हात लावणारा तो 'अदृश्य' चेहरा आता उघड होणार!

तुमच्या नकळत 'चोरी -चोरी' तुमच्या फोनला हात लावणारा तो 'अदृश्य' चेहरा आता उघड होणार!

एका ताज्या सर्वेक्षणात #Survey असं समोर आलंय की, जगातल्या जवळपास २५ टक्के लोकांनी मान्य केलंय की त्यांनी कधी ना कधी आपल्या जोडीदाराचा, मित्राचा किंवा घरच्यांचा मोबाईल त्यांच्या नकळत चोरून तपासला आहे.ही आकडेवारी वरवर साधी वाटत असली तरी, तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावणारे हे 'अदृश्य' चेहरे काहीवेळा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात.महाराष्ट्राची हास्यजत्रासाठी #MHJ हा एखाद्या स्किटचा विषय होईलही पण बर्‍याच वेळा अशी हेरगिरी महागात पडू शकते.#Spying

तुमच्या आयुष्यातलं निम्मं जग आज त्या छोट्याशा स्क्रीनमध्ये बंदिस्त आहे. बँक डिटेल्सपासून ते अगदी खाजगी चॅट्सपर्यंत सगळं काही तिथेच असतं. तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावून दुसऱ्या खोलीत जाता किंवा ऑफिसमध्ये डेस्कवर फोन ठेवून पाणी प्यायला उठता, आणि नेमकी त्याच वेळी कोणाचे तरी हात तुमच्या फोनकडे वळतात.

आपल्या नकळत कोणीतरी आपला फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केलाय, हे समजल्यावर येणारी ती अस्वस्थता मोठी विचित्र असते. समोरची व्यक्ती कदाचित आपला पासवर्ड माहीत करून घेण्याचा प्रयत्न करत असेल किंवा गॅलरीतले फोटो बघण्याची तिची इच्छा असेल. अशा वेळी आपल्याला गरज असते एका अशा पहारेकऱ्याची, जो आपल्या गैरहजेरीत तिथे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेल.

विज्ञानाची ही एक वेगळीच किमया आज 'Who Touched My Phone' (WTMP) या ॲपच्या रूपाने आपल्या समोर आली आहे. हे ॲप म्हणजे तुमच्या फोनसाठी असलेला एक छुपा सीसीटीव्ही कॅमेराच समजा. याचं काम साधं पण अत्यंत प्रभावी आहे, जे तुमच्या अनुपस्थितीत घडणाऱ्या हालचालींचा पुरावा गोळा करतं.#WTMP

या ॲपचं नाव ऐकल्यावर कदाचित तुम्हाला वाटेल की हे नेमकं काम कसं करतं? ऐका तर, तुम्ही जेव्हा हे ॲप सुरू करून फोन बाजूला ठेवता, तेव्हा ते बॅकग्राउंडमध्ये सक्रिय होतं. जर कोणी तुमच्या फोनला हात लावला किंवा तो अनलॉक करण्याचा प्रयत्न केला, तर हे ॲप गुपचूप समोरच्या कॅमेऱ्यातून त्या व्यक्तीचा फोटो काढतं.

आता इथे ट्विस्ट असा आहे की, त्या समोरच्या व्यक्तीला सुगावाही लागत नाही की तिचा फोटो काढला गेला आहे. इतकंच नाही, तर त्या व्यक्तीने फोनमध्ये कोणते ॲप्स उघडले आणि तिथे काय पाहिलं, याची संपूर्ण यादी हे ॲप तयार करतं. जेव्हा तुम्ही परत येता, तेव्हा तुम्हाला एक सविस्तर रिपोर्ट मिळतो, ज्यामध्ये त्या 'भामट्याचा' फोटो आणि त्याने केलेल्या पराक्रमांची माहिती असते.

गंमत म्हणजे, अनेकदा आपले मित्र किंवा नातेवाईक "अरे मी फक्त वेळ बघत होतो" असं म्हणून वेळ मारून नेतात. पण या ॲपमुळे आता त्यांच्याकडे कोणतीही सबब उरणार नाही. समोर स्पष्ट फोटो आणि वेळ असल्यावर समोरच्याची बोलती आपोआप बंद होते. हे ॲप प्रामुख्याने त्या लोकांसाठी वरदान आहे जे हॉस्टेलमध्ये राहतात किंवा ज्यांच्या घरी लहान मुलं सतत फोन मागतात.

ऑफिसमध्ये काम करताना अनेकदा आपण फोन डेस्कवर विसरतो. अशा वेळी तुमचे #सहकारी तुमच्या फोनमध्ये डोकावत नाहीत ना, याची खात्री करण्यासाठी हे ॲप उत्तम आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आपली #प्रायव्हसी जपण्यासाठी असे छोटे पण हुशार उपाय शोधणं ही काळाची गरज बनली आहे.

भविष्यात कदाचित हे ॲप आणखी प्रगत होईल आणि चोराचा फोटो थेट तुमच्या दुसऱ्या डिव्हाइसवर पाठवेल, पण सध्या तरी हे तुमच्या फोनचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. तुमच्या नकळत तुमच्या डिजिटल जगात कोणी प्रवेश केलाय, हे शोधण्यासाठी आता तुम्हाला गुप्तहेर बनण्याची गरज नाही.

तुमच्या फोनमध्ये दडलेली गुपितं आणि तुमची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी हा डिजिटल वॉचमन नेमणं आता पूर्णपणे तुमच्या हातात आहे. उद्या सकाळी उठल्यावर तुमच्या फोनच्या रिपोर्टमध्ये कोणाचा चेहरा दिसतो, हे पाहणं खरोखरच रंजक ठरेल, नाही का?

तुम्हीही हे अ‍ॅप वापरून #तुमचा_अनुभव आम्हाला कळवा !!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका खेळण्याने दिली आईची माया: पंच नावाच्या माकडाची काळजाला भिडणारी गोष्ट
लाइफस्टाइल

एका खेळण्याने दिली आईची माया: पंच नावाच्या माकडाची काळजाला भिडणारी गोष्ट

जपानमधील पंच नावाच्या माकडाच्या पिल्लाला त्याच्या आईने नाकारले, पण एका आयकीया बाहुलीने त्याला मायेची ऊब देऊन जीवदान दिले.

९ मार्च, २०२६

गूगलला टक्कर देणारा भारतीय तरुण: अरविंद श्रीनिवास आणि पर्प्लेक्सिटी
विज्ञान

गूगलला टक्कर देणारा भारतीय तरुण: अरविंद श्रीनिवास आणि पर्प्लेक्सिटी

सर्च रिझल्ट्सच्या जागी थेट अचूक उत्तरे देणारे 'पर्प्लेक्सिटी एआय' उभारणाऱ्या अरविंद श्रीनिवास यांची यशोगाथा.

१० ऑगस्ट, २०२६

कपिल सिब्बल: सुप्रीम कोर्टात इतिहास घडवणारे रोमहर्षक युक्तिवाद
राजकारण

कपिल सिब्बल: सुप्रीम कोर्टात इतिहास घडवणारे रोमहर्षक युक्तिवाद

राइट टू प्रायव्हसीपासून तिहेरी तलाकपर्यंत; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवलेले ऐतिहासिक खटले.

८ ऑगस्ट, २०२६