मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

अक्षय कुमारचा येतोय नवीन सिनेमा - रूस्तम...

1 मिनिट वाचन
शेअर करा:
अक्षय कुमारचा येतोय नवीन सिनेमा - रूस्तम...

आजच अक्षय कुमारच्या रुस्तमचा ट्रेलर रिलीज झालाय. पोस्टर्सवरून दिसतं आहे की हा सिनेमा ’कावसजी माणेकशॉ नानावटी’ यांच्या खटल्यावरून प्रेरित आहे. अर्थातच नानवटींची भूमिका अक्षयकुमार करत आहे. १९५९मध्ये हा खून खटला बराच गाजला होता. या खटल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्तमानपत्रांनी या खटल्याबद्दल इतकं भरभरून लिहिलं, की तेव्हा न्यायदानासाठी असलेल्या ज्युरींना नानावटी निर्दोष वाटले. त्यामुळे केलेला खून मान्य करूनही नानावटी ज्युरींच्या मते निर्दोष  ठरले. मुंबई हायकोर्टाने ज्युरींचा निर्णय रद्दबातल ठरवत ज्युरी सिस्टीमच बंद केली. काही जुन्या सिनेमांत दिसणारी ’मेंबर्स ऑफ ज्युरीं’ना संबोधित करणारी सिस्टीम तेव्हापासून भारतातून नाहिशी झाली. म्हणजेच मिडिया ट्रायल हा प्रकार तसा भरपूर जुनाच आहे.  या खटल्यावर आजपर्यंत अनेक पुस्तके आणि सिनेमे निघाले आहेत. 

आपल्या पंजाबी राजीव भाटियाने म्हणजेच अक्षयकुमारने आजवर वेगवेगळ्या भूमिका केल्या. पण पारसी हिरोची भूमिका तो ’रुस्तम’या सिनेमात पहिल्यांदाच करत आहे. या सिनेमाचा दिग्दर्शकही  आपला ’बेबी’ वाला नीरज पांडे आहे. 

पुढची गोष्ट
मनोरंजनझाडावरचं एक पान आणि मृत्यूशी झुंज देणारं प्रेम: 'लुटेरा' आणि ओ. हेन्री१९०५ मध्ये ओ. हेन्री यांनी लिहिलेल्या The Last Leaf या लघुकथेतील एका पानाने वाचकांना रडवलं. तब्बल १०८ वर्षांनंतर, २०१३ मध्ये 'लुटेरा' या चित्रपटाने पुन्हा एकदा तीच भावना पडद्यावर जिवंत केली.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

'पद्मश्री' नाकारणारा स्वाभिमानी सूर: जेव्हा हेमंत कुमार यांनी सरकारलाच आरसा दाखवला
मनोरंजन

'पद्मश्री' नाकारणारा स्वाभिमानी सूर: जेव्हा हेमंत कुमार यांनी सरकारलाच आरसा दाखवला

आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांनंतर उशिरा दिलेला पद्मश्री पुरस्कार नम्रपणे नाकारून स्वाभिमान जपणारे ज्येष्ठ संगीतकार-गायक हेमंत कुमार.

१६ जून, २०२६

ट्रक ड्रायव्हरला आवडणारा 'ढिंच्याक' आवाज आणि गुलशन कुमार: झंकार युगाची गोष्ट!
मनोरंजन

ट्रक ड्रायव्हरला आवडणारा 'ढिंच्याक' आवाज आणि गुलशन कुमार: झंकार युगाची गोष्ट!

९० च्या दशकात गाजलेल्या 'झंकार बीट्स'चा जन्म कसा झाला आणि गुलशन कुमार यांनी संगीताचे लोकशाहीकरण कसे केले, याची ही रंजक सफर.

५ मे, २०२६