मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

'अशी चिकमोत्याची माळ': गणपतीच्या सुपरहीट गाण्याची गोष्ट!

2 मिनिट वाचन

गणेशोत्सवात घरोघरी वाजणारे लोकप्रिय गाणे 'अशी चिकमोत्याची माळ' कसे रचले गेले आणि संगीतकारांना रॉयल्टी न मिळाल्याची खंत.

शेअर करा:
'अशी चिकमोत्याची माळ': गणपतीच्या सुपरहीट गाण्याची गोष्ट!

गेले आठ दहा दिवस घरोघरी, अगदी तुमच्याही घरातल्या 'आबा- बाबा- डॅड आणि छोटू' या चारी पिढ्या 'अशी चिकमोत्याची माळ हे एकच गाणं गात असतील.आज वाचूया या गाण्याच्या निर्मितीची कथा !

१९८९ साली अरविंद हळदीपूर आणि निर्मल मुखर्जी या संगीतकार जोडगोळीने गणपतीवर एक नव्या गाण्याची निर्मिती करण्याचा घाट घातला. अशी गाणी तयार करताना आधी चाल बनवली जाते आणि नंतर कवि त्यानुसार पद्य लिहितो. अरविंद हळदीपूर यांनी त्यांचे मित्र विलास जैतापकर यांच्याकडून हे गाणं लिहून घेतलं आणि त्यानंतर त्याला उत्सवाच्या ठेक्याची जोड देऊन चाल देण्यात आली.निर्मल मुखर्जी यांनी गाण्याच्या सुरुवातीला - दोन कडव्यांच्या मध्ये आणि शेवटी एक अशी ट्यून जोडली की ती कानावर पडल्यावर आपोआप सगळं गाणं मनात घुमायला लागतं. जयश्री शिवराम गायिकेनं हे गाणं गायलं.असं म्हटलं जातं की जॅकी श्रॉफला ही ट्यून इतकी आवडली की हे गाणं चित्रपटात घेण्याचा मनसुबा त्यानी बोलून दाखवला. पण नंतर काही कारणाने तो मनसुबाच राहिला आणि हे गाणं पडद्यावर आलंच नाही.

तो जमाना कॅसेटचा होता. मेलोडी नावाच्या कॅसेट कंपनीनं हे गाणं रिलीज केल्यावर आठवड्याभरात हे गाणं इतकं 'व्हायरल' झालं की महिनाभरात या गाण्याची राजरोस चोरी करून अनेक कंपन्यांनी स्वत:च्या कॅसेटी रिलिज केल्या.लाखो कॅसेट विकल्या गेल्या पण संगीतकारांना एक रुपायाचं ही मानधन मिळालं नाही.आजही हे गाणं आपण सगळेच गातो पण संगीतकार कोण - कोणी लिहिलं हे गाणं हा प्रश्नही कोणी विचारत नाही.एक रसिक म्हणून आज आपण सर्वांनी गीतकार जैतापकर-संगीतकार अरविंद -निर्मल आणि गायीका जयश्री शिवराम यांचे आभार मानायला हवेत.

आता शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा ! तुम्ही जर गायक-संगीतकार - कवि असाल तर तुम्ही केलेली रचना सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल. पण त्याचे कॉपीराइट्स तुम्ही वेळीच रजिस्टर केले नाहीत तर तुमच्या हक्काचा एकही रुपया तुमच्या पदरी पडणार नाही.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!
लाइफस्टाइल

बागेतल्या खुर्चीत बसून आकाशात झेप घेणारा लॅरी वॉल्टर्स!

विमान किंवा परवाना नसताना बागेतल्या खुर्चीला ४२ फुगे बांधून १६ हजार फूट आकाशात झेप घेणाऱ्या लॅरी वॉल्टर्सची अजब सत्यकथा.

१३ ऑक्टोबर, २०२६

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर
विज्ञान

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६