मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

पिझ्झा डिलिव्हरी झाली नाही म्हणून फोन केला आणि ९५,००० रुपये गमावले? काय आहे प्रकरण?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
पिझ्झा डिलिव्हरी झाली नाही म्हणून फोन केला आणि ९५,००० रुपये गमावले? काय आहे प्रकरण?

ऑनलाईन शॉपिंग करताना फार काळजी घ्यावी लागते. तुमचे बँक डीटेल्स एखाद्या ठगाच्या हाती लागले तर तुमचं अकाऊंट रिकामं झालंच  म्हणून समजा. सध्या लोक थोडे शहाणे झाले आहेत, ते सहसा कोणाला आपले डीटेल्स सांगत नाहीत. म्हणून मग ठगांनी नवनवीन मार्ग शोधून काढले आहेत. हा किस्सा त्याचं चांगलं उदाहरण आहे.

पिझ्झा डिलिव्हरी झाली नाही म्हणून फोन केला आणि ९५,००० रुपये गमावले? काय आहे प्रकरण? – चित्र 1

१ डिसेंबरला एन. व्ही. शेख नावाच्या व्यक्तीने झोमॅटोवरून पिझ्झा मागवला होता. पिझ्झा यायला उशीर झाल्याने शेखने गुगलवरून झोमॅटोचा कस्टमरकेअर नंबर शोधून काढला. त्याने नंबरवर फोन करून आपली तक्रार नोंदवली. फोनवरच्या ‘ग्राहक सेवा प्रतिनिधी’ने त्याला सांगितलं कीकाही कारणांनी आम्ही तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही, तुमचे पैसे तुम्हाला परत केले जातील.’

पिझ्झा डिलिव्हरी झाली नाही म्हणून फोन केला आणि ९५,००० रुपये गमावले? काय आहे प्रकरण? – चित्र 2

यानंतर शेखला SMS वर एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवरून त्याला त्याचे PhonePe युझर नेम विचारण्यात आला आणि रिफंडची रक्कम विचारण्यात आली. त्याप्रमाणे शेखने आपली माहिती दिली. थोड्याच वेळाने त्याला SMS आला की त्याच्या बँक खात्यातून ४५,००० रुपये कमी करण्यात आले आहेत. शेखने घाबरून उरलेली रक्कम दुसऱ्या अकाऊंटला ट्रान्स्फर करायला घेतली, पण इतक्यात पुन्हा SMS आला. यावेळी त्याच्या खात्यातून ५०,००० रुपये गेले होते.

शेख म्हणतो की मी फक्त PhonePe युझर नेम दिलं होतं. त्यांनी माझ्या खात्यातून पैसे कसे लंपास केले माहित नाही.

नेमकं काय घडलं ?

नेमकं काय घडलं ?

मंडळी, एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही आम्ही लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे झोमॅटो आणि स्विग्गी यांचे कस्टमर केअर नंबर अस्तित्वात नाहीत. झोमॅटोच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार तुमच्या तक्रारी फक्त अॅपवर मांडायच्या असतात. 1800-120-2125 हा क्रमांक फक्त Interactive voice response पुरताच मर्यादित आहे.

पिझ्झा डिलिव्हरी झाली नाही म्हणून फोन केला आणि ९५,००० रुपये गमावले? काय आहे प्रकरण? – चित्र 4

ही माहिती सगळ्यांनाच माहित असते असं नाही. याचाच फायदा घेऊन अनेक चोरटे खोट्या नंबरच्या आधारे लोकांना फसवत असतात. zomato customer care असा सर्च केल्यावर तुम्हाला सहज झोमॅटोचा नंबर मिळेल.

तर मंडळी, तुम्ही कधी अशा खोट्या नंबरला बळी पडलेलात का? तुमचा अनुभव नक्की शेअर करा !!

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल'जगातील पहिली व्हायरल फेक न्यूज': एका पत्रकाराने रचलेला बाथटबचा बनावट इतिहासपत्रकार एच. एल. मेन्केन यांनी केवळ गंमत म्हणून लिहिलेला बाथटबचा खोटा इतिहास जगाने १०० वर्षे कसा खरा मानला, याची रंजक गोष्ट.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या
लाइफस्टाइल

एका खोट्या इन्स्टाग्राम रीलमुळे भोपाळमध्ये १७ वर्षांच्या मुलाची हत्या

इन्स्टाग्रामवरील खोट्या माहितीवर आंधळा विश्वास ठेवून करोडपती होण्याच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलाची हत्या झाल्याची भोपाळमधील धक्कादायक घटना.

२० ऑगस्ट, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६

पुलित्झर जिंकणारी ती 'फेक न्यूज': जॅनेट कूक आणि वॉशिंग्टन पोस्टचा तो धक्कादायक किस्सा
लाइफस्टाइल

पुलित्झर जिंकणारी ती 'फेक न्यूज': जॅनेट कूक आणि वॉशिंग्टन पोस्टचा तो धक्कादायक किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार जॅनेट कूक यांनी लिहिलेली 'जीमी'ची हृदयद्रावक कथा कशी खोटी ठरली आणि त्यांना पुलित्झर पुरस्कार परत करावा लागला, याची ही गोष्ट.

१६ एप्रिल, २०२६