मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे !!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे !!

 गेल्या काही वर्षात १ रुपयाची किंमत घसरली आहे. आजही जुने लोक ‘त्याकाळी १ रुपयात काय काय यायचं’ या संदर्भातली वाक्य म्हणताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का, की १ रुपयाची किंमत कमी झाली असली तरी १ रुपयाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च हा तेवढाच आहे ? नाही माहित ? हे खुद्द रिझर्व बँकेने उघड केलंय राव.

मंडळी, रिझर्व बँकेने ‘इंडिया टुडे’च्या RTI ला (माहितीचा अधिकार) दिलेल्या उत्तरात नाणी उत्पादनासंदर्भात माहिती दिली आहे. १ रुपयाचा एक नाणं तयार करण्यासाठी १.११ एवढा खर्च येतो. म्हणजे १ रुपया तयार करण्यासाठी त्याच्या किमतीच्या ११ पैसे जास्त मोजावे लागतात. हा खर्च जास्त का याचं उत्तर मिळालेलं नाही. रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीतून आणखी महत्वाच्या गोष्टी समजल्या आहेत ते जाणून घेऊया.

मुंबईच्या टाकसाळीने नाण्यांच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च सांगितलेला नाही. मुंबई शाखेच्या म्हणण्याप्रमाणे माहिती अधिकाराच्या Section 8 (1) (d) प्रमाणे हे एक trade secret म्हणजे व्यापारातील गुप्त माहिती आहे. पण याउलट हैद्राबादच्या टाकसाळीने सगळी माहिती दिली आहे. हैद्राबादच्या टाकसाळीकडून मिळालेल्या माहितीत पुढील आकडे सांगण्यात आले आहेत.

'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे !! – चित्र 1

(नाणी आणि त्यांच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च)

१ रुपये – १.११

२ रुपये – १.२८ पैसे

५ रुपये – ३.६९ पैसे

१० रुपये – ५.५४ पैसे

टाकसाळीत नाणी पाडण्याचं प्रमाण २०१८ सालात कमी झाल्याचं रिझर्व बँकेच्या माहितीत म्हटलंय. २०१६ ते २०१७ दरम्यान सर्वात जास्त नाणी पाडण्यात आली होती. १ रुपयाची नाणी पाडण्याचं प्रमाणही ९.०३ कोटीवरून ६.३० कोटींवर आलं आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला'....नाणी तयार करण्यासाठी लागतात एवढे पैसे !! – चित्र 2

तर मंडळी, १ रुपयाच्या नाण्याच्या बाबतीत ‘'चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला' असा प्रकार दिसतोय. याशिवाय नाण्याचं चलनातील प्रमाण कमी होतंय ही गोष्टही विचार करायला लावणारी आहे.

 

आणखी वाचा :

तुमच्या खिशातलं नाणं नक्की कोणत्या टाकसाळीत बनलंय असं तपासून पाहा...

गोष्ट ६८ कोटींना विकल्या गेलेल्या भारतीय सोन्याच्या मोहोरेची.. कुणाची होती ती मोहोर?

हे तर खरोखरचे मनी प्लांट...या झाडाला खरंच पैसे लागून राह्यले ना भाऊ !!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र
लाइफस्टाइल

गल्फ वॉरची क्रूरता जगासमोर आणणारे केनेथ जारेके यांचे 'ते' छायाचित्र

१९९१ च्या गल्फ वॉरमध्ये जळालेल्या इराकी सैनिकाचे छायाचित्र घेणारे केनेथ जारेके आणि त्या एका फोटोने मांडलेले युद्धाचे विदारक वास्तव.

२४ ऑगस्ट, २०२६

२० किलो वजनाची तांब्याची नाणी आणि कागदाचा तुकडा: युरोपातील पहिल्या बँक नोटेची गोष्ट!
लाइफस्टाइल

२० किलो वजनाची तांब्याची नाणी आणि कागदाचा तुकडा: युरोपातील पहिल्या बँक नोटेची गोष्ट!

१६५० च्या दशकात स्वीडनमध्ये २० किलोच्या तांब्याच्या नाण्यांना कंटाळून युरोपातील पहिली कागदी नोट कशी जन्माला आली, वाचा ही रंजक कहाणी.

१६ जुलै, २०२६

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!
लाइफस्टाइल

जेव्हा स्वतःची घागर स्वतः भराल, तेव्हाच कळेल निसर्गाची खरी किंमत!

फुकट मिळणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीची नासाडी आणि भविष्यातील पाणी टंचाईच्या संकटावर प्रकाश टाकणारा विचारप्रवर्तक लेख.

१० जून, २०२६

शंभर कोटीची पगानी कार: भारतीय रस्ते आणि अवाढव्य स्वप्नाची किंमत
लाइफस्टाइल

शंभर कोटीची पगानी कार: भारतीय रस्ते आणि अवाढव्य स्वप्नाची किंमत

जगातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असलेल्या पगानी कारची किंमत आणि ती भारतात आणण्यासाठी येणारी आव्हाने.

२५ मे, २०२६

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट
लाइफस्टाइल

मुकेशकाका, ते 'जीओ कॉईन' कधी येणार? एका चिमुरड्याचा सवाल आणि रंजक गोष्ट

जिओ कॉईन्सच्या प्रतीक्षेत असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि एका चिमुरड्याने मुकेश अंबानींना विचारलेल्या प्रश्नाची ही मजेशीर गोष्ट.

२१ मे, २०२६

सोन्याच्या भावात फुलांची विक्री? हॉलंडचं ट्युलिप वेड आणि मानवी लोभाचे अजब किस्से!
लाइफस्टाइल

सोन्याच्या भावात फुलांची विक्री? हॉलंडचं ट्युलिप वेड आणि मानवी लोभाचे अजब किस्से!

१६३० च्या दशकात हॉलंडमध्ये ट्युलिपच्या एका फुलासाठी लोक आपली घरं विकायला तयार झाले होते. या पहिल्या आर्थिक बुडबुड्याची ही रंजक गोष्ट.

१२ फेब्रुवारी, २०२६