मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

खऱ्या आयुष्यातील कुंभकर्ण...हे महाशय वर्षातून ३०० दिवस कसे झोपतात?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
खऱ्या आयुष्यातील कुंभकर्ण...हे महाशय वर्षातून ३०० दिवस कसे झोपतात?

एखादा व्यक्ती खूप जास्त झोपत असेल तर आपण तिला कुंभकर्ण म्हणतो. ही जास्तीची झोप तशी २-४ तास असते. पण राजस्थानात एका व्यक्तीने झोपेचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

राजस्थानातील राजौर जिल्ह्यात पुरखाराम नावाचे ४२ वर्षीय व्यक्ती आहेत. ते थोडेथोडके नव्हे, तर वर्षातील तब्बल ३०० दिवस झोपलेले असतात. याच कारणाने त्यांना सगळीकडे कुंभकर्ण म्हणून ओळखले जाते. 

पुरखाराम आराम किंवा आळस म्हणून झोपत नाहीत. त्यांना एक दुर्मिळ असा आजार आहे. एक्सीस हायपरसोम्निया (Axis hypersomnia) असे त्या आजाराचे नाव आहे. या आजारात माणूस नेहमी झोपेत असतो. विचित्र गोष्ट म्हणजे पुरखाराम आपली सर्व दैनंदिन कामे ते झोपेत असतानाच पार पाडत असतात. 

खऱ्या आयुष्यातील कुंभकर्ण...हे महाशय वर्षातून ३०० दिवस कसे झोपतात? – चित्र 1

वयाच्या २३ व्या वर्षांपासून त्यांना हा आजार आहे. तेव्हापासून त्यांना या त्रासाने ग्रासले आहे. साधारणपणे माणूस झोपला तर जास्तीत जास्त काही तास झोपेल. मात्र पुरखाराम एकदा झोपले तर २५ दिवस उठत नाहीत. सुरुवातीला हे प्रमाण ६-७ दिवसांचे होते, पण आता ते वाढले आहे.

पुरखाराम गावात एक किराणा दुकान चालवतात. पण त्यांच्या या समस्येमुळे दुकान फक्त महिन्यातून ५ दिवस सुरू असते. बऱ्याचदा तर दुकानात काम करत असतानाच त्यांना झोप लागते. त्यांच्या या आजाराचा त्यांच्या कुटुंबाला देखील मोठा त्रास होतो. त्यांना जेऊ घालण्यापासून ते आंघोळ घालण्यापर्यंत सर्व कामे ते झोपेत असताना त्यांच्या कुटुंबाला करावी लागतात.

झोप ही प्रत्येकाला एक सुंदर देणगी वाटते, पण कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर गेली तर त्याचे सुख कमी दुःख जास्त असते, हेच यातून दिसून येईल.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!
लाइफस्टाइल

लोकमान्य टिळकांचे अखेरचे दिवस: आजारपणाशी झुंज आणि सरदार गृहातील तो अखेरचा श्वास!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस आणि सरदार गृहातील अखेरच्या क्षणांची भावूक कहाणी.

१ ऑगस्ट, २०२६

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'
लाइफस्टाइल

सेजेचा एकांत आगीपाशी कळे: डोळे झाकून अध:पाताकडे जाणाऱ्यांसाठी तुकोबांचा 'अलार्म'

जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगातून आजच्या 'फेक' पॉझिटिव्हिटीच्या काळात वास्तवाचा सामना कसा करावा, याचे मार्गदर्शन.

३० मे, २०२६