मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

स्वतःची श्रद्धा तपासण्यासाठी या बाईनी धावती कार देवाच्या भरवशावर सोडली? व्हिडीओ पाहा!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
स्वतःची श्रद्धा तपासण्यासाठी या बाईनी धावती कार देवाच्या भरवशावर सोडली? व्हिडीओ पाहा!!

वाहनांचे अपघात हे कोणत्याही कारणाने घडू शकतात. गाडीतल्या तांत्रिक बिघाडापासून ते दरड कोसळणे, रस्त्यांवरचे खड्डे, इत्यादी करणे देता येतील, पण कधी गाडी चालवणाऱ्याने स्वतःच अपघात ओढवून घेतल्याचं ऐकलंय का? हे दुर्मिळ प्रकरण आहे.

अशीच एक घटना अमेरिकेच्या ओहायो येथे घडली. एका कारचा अपघात झाला. कारमध्ये एक महिला आणि तिची ११ वर्षांची मुलगी होती. पोलिसांनी तपास केल्यावर त्या महिलेने अपघाताबद्दल जे सांगितलं ते ऐकून पोलिसांनीही कपाळावर हात मारला असेल.

ती म्हणाली की, ‘मी स्वतःची श्रद्धा तपासून पाहण्यासाठी गाडीवरचा ताबा सोडून दिला आणि गाडी देवाच्या भरवशावर सोडली.’ हे तिने पूर्ण शुद्धीत केले होते. पोलीस तपासात दिसून आले की तिने कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ घेतले नव्हते.

या बाईंनी कारला देवाच्या भरवशावर सोडल्यानंतर कारची गती वाढवत नेऊन कार चक्क ताशी १९० किलोमीटरच्या गतीवर नेऊन ठेवली होती. एवढ्या वेगात येणाऱ्या कारने इतर कार्सना तर धडक दिलीच पण रस्त्यावरच्या दिव्यांना धडक देत शेवटी एका घरावर आदळली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.

एवढ्या मोठ्या जीवघेण्या अपघातानंतरही या बाईंना आपल्या कृत्यावर पश्चाताप झालेला नाही. तिला अजूनही असंच वाटतं, की तिने जे केलं ते योग्य होतं. कायद्यापुढे श्रद्धेची कारणे चालत नसल्याने या बाईंना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे.

तर, स्वतःची श्रद्धा तपासणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी, ती अशा जीवघेण्या मार्गाने तपासून पाहू नये. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजाफाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

टॅग्स:

संबंधित लेख

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!
लाइफस्टाइल

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.

३ नोव्हेंबर, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!
लाइफस्टाइल

एव्हरेस्ट म्हणजे फक्त पुरुषांची मक्तेदारी? जुन्को ताबेई यांनी मोडीत काढलेला तो अहंकार!

जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचा जिद्दीचा आणि संघर्षाचा प्रेरणादायी प्रवास.

१६ मे, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६

नशिबाने गवसलेला २७ किलो सोन्याचा गोळा: हँड ऑफ फेथची थरारक गोष्ट
लाइफस्टाइल

नशिबाने गवसलेला २७ किलो सोन्याचा गोळा: हँड ऑफ फेथची थरारक गोष्ट

ऑस्ट्रेलियातील एका सामान्य माणसाला जमिनीखाली सापडलेला २७ किलो सोन्याचा गोळा आणि त्याचे पालटलेले नशीब, वाचा ही रंजक गोष्ट.

९ मे, २०२६