मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

आपल्या मुलाच्या करियरसाठी आर माधवन दुबईला का बस्तान हलवतोय? वेदांत माधवन नक्की काय करतो?

3 मिनिट वाचन
शेअर करा:
आपल्या मुलाच्या करियरसाठी आर माधवन दुबईला का बस्तान हलवतोय? वेदांत माधवन नक्की काय करतो?

वयाच्या सोळाव्या वर्षी अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांची मुले चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी धडपडत असतानाच आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवनने मात्र स्वत:साठी वेगळी वाट निवडली आहे. बाबाच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात धडपडण्यापेक्षा त्याने आपल्यातील एका वेगळ्या गुणाला उजाळा देणे अधिक योग्य समजले.

वेदांत एक राष्ट्रीय जलतरणपटू आहे. यापूर्वी त्याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव उज्वल केले आहे आणि आता तो २०२६ च्या ऑलंपिकची तयारी करत आहे.

कोरोनामुळे सध्या देशातील मोठमोठे स्विमिंग पूल बंद आहेत. शिवाय ऑलंपिकच्या तयारीसाठी लागणारी इतर साधनसुविधा देशात उपलब्ध नसल्याने त्याने यासाठी दुबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला मुलाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्या सोबतीसाठी आर. माधवन पत्नी सरिता सोबत दुबईला गेला आहे.

मुंबईतील मोठे पूल कोरोनामुळे बंद आहेत. त्याला मोठ्या स्विमिंग पूलमध्ये प्रॅक्टिस करता यावी म्हणून आपण दुबईला जात असल्याचे माधवने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अभिनयाऐवजी माझ्या मुलाने वेगळे क्षेत्र निवडले याबद्दल मला कधीच खेद वाटला नाही आणि वाटणारही नाही असे तो म्हणतो. मुलांना ज्या गोष्टीत रस आहे, त्यांना जे करू वाटते, ते त्यांना करू दिले पाहिजे. त्यांच्या या प्रवासात आपण त्यांच्या सोबत आहोत हा विश्वासही त्यांना देणे गरजेचे आहे, असे माधवनचे मत आहे. अभिनय जसा महत्वाचा आहे, तसाच तो जे काम करतो आहे तेही महत्वाचे आहे. कुठल्याच कामाला मी कमी लेखणार नाही. मुलांना अमुक हेच कर अशी सक्ती करण्यावर मला विश्वास नाही. इतर पालकांनाही त्याने हाच सल्ला दिला आहे.

आपल्या मुलाच्या करियरसाठी आर माधवन दुबईला का बस्तान हलवतोय? वेदांत माधवन नक्की काय करतो? – चित्र 1

यावर्षी झालेल्या ज्युनियर नॅशनल ॲक्वॅटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्राला सात पदके मिळवून दिली आहेत.

वयाच्या १२व्या वर्षी त्याने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेतही यश मिळवले होते. ज्युनियर नॅशनल्स स्विम मीट मध्येही त्याने तीन सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक मिळवले होते. एशियन इज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिपमध्येही त्याने भारताला एक रौप्य पदक मिळवून दिले आहे.

आर. माधवनला वेदांतच्या या कर्तृत्वाचा खूप अभिमान वाटतो. वेदांतच्या या यशाबद्दल ट्विटरवर पोस्ट करताना त्याने लिहिले होते, तुझ्यासारख्या मुलाचा बाबा असल्याबद्दल मला आज खूपच अभिमान वाटत आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे आणि देवाच्या आशीर्वादाने माझ्या मुलाने ज्युनियर नॅशनल्स स्विम मीटमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले आहे.

 

या वर्षीच्या ऑलंपिकमध्ये भारताने भालाफेक, वेटलिफ्टिंग, पुरुष कुस्ती, बॅडमिंटन, महिला बॉक्सिंग, पुरुष हॉकी, फ्री स्टाईल कुस्ती मध्ये अशी एकूण सात पदके पटकावली आहेत. आजवरच्या ऑलंपिक सामन्यांपैकी हा भारताचा सर्वोत्कृष्ट समान ठरला. यावेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य, चार कांस्य अशी पदकांची कमाई केली. २०२६ मध्येही भारताची कामगिरी अशीच उंचावत राहील, अशी अशा करण्यास हरकत नाही.

वेदांतने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून त्याच क्षेत्रात जाण्याऐवजी वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला हे मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे.

मेघश्री श्रेष्ठी

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलआधुनिक मुंबईचे खऱ्या अर्थाने शिल्पकार: 'नाना' शंकरशेठ आणि त्यांचं उत्तुंग कार्यमुंबईला आधुनिक रूप देणारे द्रष्टे समाजसुधारक जगन्नाथ 'नाना' शंकरशेठ यांच्या बहुमूल्य योगदानाचा घेतलेला ऐतिहासिक आढावा.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!
लाइफस्टाइल

१६ किलोचे सोन्याचे झुमके; याला झुमका म्हणावं की झुंबर ते तुम्हीच ठरवा!

जोयअलुक्कास या भारतीय कंपनीने दुबईत १६ किलोहून अधिक वजनाच्या सोन्याच्या भव्य झुमक्यांची निर्मिती केली आहे. ‘मयूर सहस्र’ असे नाव असलेले हे झुमके २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले आहेत.

२९ ऑक्टोबर, २०२६

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!
लाइफस्टाइल

आता पावसाचा सट्टा खेळू या? 'रेन मुंबई' आणि नशिबाचा पाऊस!

एनसीडीईएक्सने मुंबईतील पावसावर आधारित देशातील पहिला पावसाचा वायदा बाजार सुरू केला आहे. जाणून घ्या हा सट्टा नक्की कसा चालतो.

२ जुलै, २०२६

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ
लाइफस्टाइल

जमादार बापू लक्ष्मण लामखडे: मुंबईच्या स्मगलर्सचा कर्दनकाळ

१९५७ मध्ये व्हिक्टोरिया डॉकवर ३०० तोळे सोन्याची तस्करी पकडणारे मुंबई कस्टम्सचे कर्तव्यदक्ष अधिकारी बापू लक्ष्मण लामखडे यांची शौर्यकथा.

२ जुलै, २०२६

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण
लाइफस्टाइल

मुंबईचे काळीज: व्हिक्टोरिया टर्मिनसच्या ऐतिहासिक प्रवासाला १३९ वर्षे पूर्ण

बोरीबंदर ते व्हिक्टोरिया टर्मिनस आणि आजचे सीएसएमटी; मुंबईच्या या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचा १३९ वर्षांचा गौरवशाली प्रवास.

२० जून, २०२६