मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

वऱ्हाड निघालंय इंडोनेशियाला !!!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
वऱ्हाड निघालंय इंडोनेशियाला !!!

सौदीचा राजा सलमान (आपले चुलबुल पांडे नाय!) इंडोनेशियाला निघालेत म्हणे. एक महिन्याच्या मुक्कामासाठी.  ४५० टन सामान त्यानं संगती घेतलंय. यात दोन मर्सिडीज लिमोझिन गाड्या हायेत, दोन आपोआप खाली-वर होणाऱ्या शिड्या पण हायेत. देखरेखीसाठी १५०० गडी , ५० मंत्री अन लय लय राजपुत्र जोडीनं चालल्यात. (म्हंजी अख्खं गावच संगती घेतलाय पठ्ठ्यानं)

राजा कुठं बी जाऊ. ते मरूदे, पन त्याच्या सामानाचीच मार्केट मंदी लय चर्चा हाय. परवा आमची कमळा म्हणत हुती," राजा असला तरी एवढं ओझं कशापाई घेऊन जायचं?  इमानातून खाली पडलं तर हकनाक जीव जाईल कुनाचा तरी."

आपण साधी माणसं कुठं जायचं म्हटलं की काय काय घेतु? दोन तीन शर्टा, पँटा, (स्वतःच्या) बायकोच्या साड्या, तिचे लिपस्टिक, पावडर, मुलांच्या चड्ड्या, बनयान, दात घासायला टूथ ब्रश, कोलगेट, कंगवा... आणि आता एवढ्यानंच  ते बोचकं  किती वाढतं!!

असो, राजा म्हटलं की थाट आलाच. नाय तर आपल्या इथं पन अशे राजे लय पडल्यात.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

चामड्यावर नक्षी कोरणारा मुलगा कसा बनला भारताचा 'सिल्व्हर किंग'?
लाइफस्टाइल

चामड्यावर नक्षी कोरणारा मुलगा कसा बनला भारताचा 'सिल्व्हर किंग'?

एका चर्मकाराचा मुलगा ते जगातील सर्वात मौल्यवान चांदीचे कारागीर, ओमरसी मावजी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या 'OM' शिक्क्याच्या एका भांड्याची किंमत आज लाखात आहे.

२३ ऑक्टोबर, २०२६

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!
लाइफस्टाइल

३४ कोटींचा 'ब्लड मनी' आणि २० वर्षांचा वनवास; अब्दुल रहीम अखेर मायदेशी परतला!

सौदी अरेबियात फाशीची शिक्षा सुनावलेल्या अब्दुल रहीमची ३४ कोटींच्या 'ब्लड मनी'मुळे सुटका झाली. माणुसकीच्या या अभूतपूर्व गोष्टीचा आढावा.

२९ मे, २०२६

एका माचिसच्या काडीच्या जोरावर उभं केलेलं अब्जावधींचं साम्राज्य आणि एका रात्रीत झालेली राख!
लाइफस्टाइल

एका माचिसच्या काडीच्या जोरावर उभं केलेलं अब्जावधींचं साम्राज्य आणि एका रात्रीत झालेली राख!

स्वीडनच्या आयव्हर क्रुगरने काडेपेटीच्या व्यवसायातून उभे केलेले साम्राज्य आणि त्याच्या पतनाची ही थक्क करणारी गोष्ट.

६ मार्च, २०२६