मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

२०० कोटीचं लग्न आणि तब्बल ४००० किलो कचरा....कोणाचं लग्न होतं हे ??

2 मिनिट वाचन
शेअर करा:
२०० कोटीचं लग्न आणि तब्बल ४००० किलो कचरा....कोणाचं लग्न होतं हे ??

आपल्याकडे पूर्वी फक्त सिनेमे ‘लार्जर दॅन लाईफ’ असायचे, पण हल्ली लग्नं पण ‘लार्जर दॅन लाईफ’ असतात. प्री-वेडिंग शूट, मोठे मंडप, सजावट, याखेरीज जयपूर, उदयपूरसारख्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडींग, लग्नात स्टार मंडळींचे डान्स, एक ना दोन..  श्रीमंत लोकांमध्ये अशा प्रकारच्या लग्नाचा नवीन ट्रेंड आला आहे. नुकतंच उत्तराखंडच्या औली येथे असंच एक लग्न पार पडलं आणि मागे राहिला तब्बल ४०० किलो कचरा

२०० कोटीचं लग्न आणि तब्बल ४००० किलो कचरा....कोणाचं लग्न होतं हे ?? – चित्र 1

मंडळी, लग्न होतं तब्बल २०० कोटी रुपयांचं. उत्तराखंडच्या औली येथील निसर्गरम्य ठिकाणी हे लग्न पार पडलं. साऊथ आफ्रिकेत राहणारे कोट्याधीश अतुल गुप्त यांच्या दोन मुलांचं हे लग्न होतं.

२०० कोटीचं लग्न आणि तब्बल ४००० किलो कचरा....कोणाचं लग्न होतं हे ?? – चित्र 2

दोन भव्य मंडप, स्वित्झर्लंडवरून मागवलेले फुलांचे ताटवे, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वराती असा सगळा लग्नाचा थाट होता. लग्न पार पडल्यावर उत्तराखंड महानगरपालिकेसमोर मात्र याहून मोठा प्रश्न उभा राहिला होता. लग्नामुळे तब्बल ४००० किलो कचरा तयार झाला होता.

२०० कोटीचं लग्न आणि तब्बल ४००० किलो कचरा....कोणाचं लग्न होतं हे ?? – चित्र 3

औली भागात फारसे पर्यटक नसतात आणि तिथली लोकसंख्या कमी आहे. त्यामळे स्वच्छता राखण्यासाठी साधारणपणे ४ लोक लागतात. पण या लग्नामुळे जवळजवळ २० लोकांची फौज कामाला लावण्यात आली होती. इतक्या माणसांकडूनही हा कचरा आवरला गेला नाहीय. याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उत्तराखंड कोर्टाने प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी आणली.

२०० कोटीचं लग्न आणि तब्बल ४००० किलो कचरा....कोणाचं लग्न होतं हे ?? – चित्र 4

मंडळी, ही बातमी व्हायरल झाल्यानंतर गुप्ता परिवाराने भरपाई म्हणून ५४,००० रुपये दिले आहेत. तरी शेवटी प्रश्न उरतोच, ‘लार्जर दॅन लाईफ’ लग्न करण्याची खरंच गरज असते का ?

मंडळी, तुम्हाला काय वाटतं या घटनेविषयी. केमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा !!

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सीआयएच्या अधिकाऱ्याने चोरल्या ३३५ कोटींच्या सोन्याच्या लगडी; फोर्ट नॉक्सवर प्रश्न!
राजकारण

सीआयएच्या अधिकाऱ्याने चोरल्या ३३५ कोटींच्या सोन्याच्या लगडी; फोर्ट नॉक्सवर प्रश्न!

अमेरिकेच्या माजी सीआयए अधिकाऱ्याच्या घरात सापडलेल्या ३३५ कोटींच्या सोन्याच्या लगडी आणि फोर्ट नॉक्सच्या सुरक्षेवर उठलेले प्रश्न.

२ जून, २०२६

विसर्जनानंतरची रिकामी जागा आणि बाप्पाची ओढ!
लाइफस्टाइल

विसर्जनानंतरची रिकामी जागा आणि बाप्पाची ओढ!

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिल्यानंतर घरात आणि मनात निर्माण होणारी शांतता व बाप्पाची ओढ व्यक्त करणारा भावूक लेख.

२५ सप्टेंबर, २०२६

विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?
लाइफस्टाइल

विमानातली मासिकं — सीटवर ठेवलेला कागद की कोट्यवधींचा व्यवसाय?

विमानातील सीटच्या खिशात मिळणाऱ्या मासिकांमागे कोट्यवधी रुपयांचे जाहिरात मॉडेल कसे काम करते? जाणून घ्या विमानातील मीडिया बिझनेस.

१० सप्टेंबर, २०२६

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!
लाइफस्टाइल

१५०० कोटींची 'सेटलमेंट' आणि NSE च्या IPO चा मार्ग मोकळा!

सेबीसोबत १५०० कोटींची सेटलमेंट झाल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) आयपीओचा मार्ग मोकळा झाला, पण सामान्य गुंतवणूकदारांचे काय?

८ सप्टेंबर, २०२६

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी
लाइफस्टाइल

एका तासात ७.७७ कोटींचा नफा; आशिष कचोलियांची शेअर बाजारातील मोठी खेळी

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी आरडी इंडस्ट्रीजच्या आयपीओ लिस्टिंगमधून कोट्यवधींची कमाई कशी केली?

१३ ऑगस्ट, २०२६

एका जिंगलने जिंकलेली कायदेशीर लढाई: 'विको वज्रदंती'चा रंजक प्रवास
लाइफस्टाइल

एका जिंगलने जिंकलेली कायदेशीर लढाई: 'विको वज्रदंती'चा रंजक प्रवास

मुंबईच्या स्वयंपाकघरातून सुरू झालेला ब्रँड आणि औषध की सौंदर्यप्रसाधन या वादात जिंकलेली कायदेशीर लढाई; विकोची यशोगाथा.

११ ऑगस्ट, २०२६