मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या?

आपण जन्माला येताच आपल्याला जात आणि धर्म चिकटतो. फारच कमी लोक असे असतात जे जात आणि धर्माचा रकाना रिकामा ठेवतात. आज आपण एका अशा महिलेला भेटणार आहोत जिने फक्त जात आणि धर्मच लावणं सोडलेलंच नाही, तर भारतातलं पाहिलं ‘No Caste, No Religion’ सर्टिफिकेट मिळवलं आहे.

भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या? – चित्र 1

तिरुपत्तुर, वेल्लोर येथील स्नेहा यांनी हे सर्टिफिकेट मिळवलं आहे. स्नेहा या स्वतः वकील आहेत. बालपणापासून त्यांच्या आईवडिलांनी जन्माच्या दाखला असो किंवा शाळेतील नाव नोंदणी किंवा इतर कागदपत्रांवर जात-धर्म नोंदवलेला नाही. आईवडिलांचे हेच संस्कार स्नेहा यांनी आत्मसात केले आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या कोणत्याच कागदपत्रांवर जात धर्म नोंदवलेला नाही. त्यांची ओळख ‘भारतीय’ अशी आहे.

भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या? – चित्र 2

मंडळी, एखाद्याने जात आणि धर्म न लिहिण्याचं ठरवलं तरी हे सहज शक्य नाही. कारण काही कागदपत्रांमध्ये जात-धर्म लिहिणं बंधनकारक असतं. हेच लक्षात घेऊन स्नेहा यांनी एक पाऊल पुढे जायचं ठरवलं. ‘जात आणि धर्म नसलेला’ या सर्टिफिकेटसाठी त्यांनी अर्ज केला. हे वर्ष होतं २०१०.

तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे सर्टिफिकेट मिळवणं सोप्पं नव्हतं. समस्या लोकांच्या विरोधाची नव्हती, तर समस्या होती या प्रकारचं सर्टिफिकेट यापूर्वी कधीच कोणी मागितलं नव्हतं. शेवटी अशाही प्रकारचं सर्टिफिकेट मिळू शकतं हे सिद्ध झालं आहे. यासाठी स्नेहा यांनी सरकारपुढे आपली बाजू खंबीरपणे मांडली आहे.

 

भारतातली पहिली जात आणि धर्म नाही असं सर्टिफिकेट मिळवणारी बाई, कोण आहेत या? – चित्र 3

मंडळी, जातीचे सर्टिफिकेट आपण सगळ्यांनीच पहिले असतील, पण जात नसलेल्या सर्टिफिकेटची ही पहिलीच वेळ आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६