मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला....तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!!

2 मिनिट वाचन
शेअर करा:
भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला....तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!!

आजवर भारतात महिला सक्षमीकरणाबद्दल खुप बोलले गेले पण म्हणावी तशी प्रगती दिसत नव्हती. पण आता काळ बदलत आहे. भारतीय महिला सर्व क्षेत्रांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. काही दिवसांपूर्वी हिमा दासने मिळवलेले सुवर्णपदक महिलांसाठी प्रेरणादायी ठरले तर गेल्या काही दिवसांपासून बोभाटाने बेस्टची ड्रायव्हर असलेली महिला, अंत्यविधीचा सामान विकणारी महिला यांच्यासारख्या पुरुषांच्या म्हणवल्या जाणाऱ्या कामात यशस्वी झालेल्या महिलांची ओळख करून दिली आहे. यावरून छोरीया भी छोरो से कम नही हेच सिद्ध होत आहे. आता पण एका जिगरबाज मुलीने मोठे काम केले आहे राव!! ती आदिवासी समाजातील पहिली कमर्शियल पायलट बनली आहे.

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला....तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!! – चित्र 1

ओडिसातील मलकानगिरी या नक्षल प्रभावित परिसरातील अनुप्रिया लाकडा हिने वर्षानुवर्ष आदिवासी मुलींना प्रेरणा मिळेल अशी उंची गाठली आहे. अनिप्रिया आता उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाली आहे. 27 वर्ष वय असलेली अनुप्रियाच्या नावावर भारतातील पहिली आदिवासी समाजातून आलेली कमर्शियल पायलट बनण्याचा विक्रम झाला आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलची मुलगी असलेली अनुप्रिया सर्वांसाठी आदर्श ठरली आहे. लहानपानापासून असलेले पायलट बनण्याचे स्वप्न इंडिगो एयरलाईन्ससाठी पायलट बनून पूर्ण झाली आहे.

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला....तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!! – चित्र 2

मंडळी, तिचे वडील सांगतात की तिच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांना खूप कठीण होते, पण तिला पायलट बनवायचेच हा निश्चय केल्यावर सगळ्या अडचणींना तोंड देऊन तिचे स्वप्न पूर्ण केले. एका साध्या घरात राहणाऱ्या या कुटुंबात सध्या प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.

ओडिसाचे मुख्यमंत्री नविन पटनाईक यांनी पण अनुप्रियाला शुभेच्छा देऊन तिचे अभिनंदन केले. येणाऱ्या काळात अनुप्रिया पासून प्रेरणा घेऊन इतर आदिवासी मुली सुद्धा कर्तृत्व गाजवतील अशी आशा पण त्यांनी व्यक्त केली.

भेटा आदिवासी समाजातील पहिल्या कमर्शियल पायलटला....तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!! – चित्र 3

मंडळी, मलकानगिरी जिल्ह्यात अजूनही रेल्वे गेलेली नाही. अशा परीसरातील मुलगी आता थेट विमान उडवणार आहे.

 

लेखक : वैभव पाटील

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलहॉवर्ड ह्यूजेस : आभाळात उड्डाण करणारा वैमानिक आणि बंद खोलीतला म्हाताराएका श्रीमंत वैमानिकाचे आयुष्य एका अपघातानंतर कसे पूर्णपणे बदलले, ही त्याचीच कहाणी आहे.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!
लाइफस्टाइल

चित्रकाराने कल्पनेतून काढलं चित्र आणि वर्षभरानंतर तीच तरुणी समोर आली!

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.

३ नोव्हेंबर, २०२६

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट
लाइफस्टाइल

गंजलेल्या तलवारीच्या वजनाइतके सोने: एका वृद्ध स्त्रीच्या चातुर्याची गोष्ट

बोलण्याने हत्ती मिळवता येतो आणि बोलण्यानेच हत्ती गमावताही येतो. अवधच्या नवाबांच्या काळातली, बोलण्याच्या कलेची ताकद सांगणारी एक सुरेख गोष्ट.

२ नोव्हेंबर, २०२६

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

१८५५ चा तो 'हूल': १८५७ च्या स्वातंत्र्यसमराआधी आदिवासींचा ब्रिटिशांविरुद्ध लढा!
लाइफस्टाइल

१८५५ चा तो 'हूल': १८५७ च्या स्वातंत्र्यसमराआधी आदिवासींचा ब्रिटिशांविरुद्ध लढा!

१८५७ च्या उठावाच्या दोन वर्षे आधी सिधू आणि कान्हू मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली संथाल आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेला ऐतिहासिक लढा.

३० जून, २०२६

इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!
लाइफस्टाइल

इतिहासाच्या पानांत हरवलेले भारताचे पहिले वैमानिक 'पुरुषोत्तम मेघजी काबाली'!

जेआरडी टाटांपूर्वी स्वतःचे विमान घेऊन उड्डाण करणारे भारताचे पहिले वैमानिक पुरुषोत्तम मेघजी काबाली यांच्या अज्ञात प्रवासाची गोष्ट.

१६ जून, २०२६