मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

या बँकेकडून चुकून करोडो रुपये लोकांच्या खात्यावर कसे काय जमा झाले?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
या बँकेकडून चुकून करोडो रुपये लोकांच्या खात्यावर कसे काय जमा झाले?

खात्यातून पैसे गेले तर होणारा मनस्ताप आपण अनुभवला आहे काय? बँकांचे विविध सेवांचे नियम असतात, त्याप्रमाणे पैसे कापले जातात. कधी आपण फसवणूकीला बळी पडतो आणि पैसे हातचे जातात. तेव्हा तर होणाऱ्या मनस्तापाची कल्पनाही करवत नाही. पण विचार करा, याच्या उलट झाले तर? म्हणजे बँकेंनेच आपल्या खात्यावर अचानक दुप्पट पैसे जमा केले तर? बँकेकडून असे कधी झाले तर तुम्ही काय कराल? हा काही शाळेतल्या निबंधाचा विषय नाही, अशी घटना युकेमध्ये खरोखर घडली आहे.

२५ डिसेंबरला युरोपियन बँक सँटेंडरच्या खातेदारांना अचानक धनलाभ झाला आणि तोही बँकेकडूनच! त्या दिवशी २००० व्यावसायिक खात्यांमध्ये तब्बल १७६ मिलियन म्हणजे १३१० कोटी जमा झाले. खातेदार या अनपेक्षित रकमेला बँकेकडून मिळालेले नाताळ गिफ्टच समजू लागले.

युरोपियन बँक सँटेंडरला जेव्हा हे लक्षात आले तेव्हा त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. काही तांत्रिक चुकीमुळे हे घडले आहे. बँकेने ही रक्कम ७५००० व्यवहारांतून टाकली. यूकेमधील २००० व्यावसायिक खातेदारांच्या खात्यांवर दोनदा पैसे पाठवले गेले. त्यामुळे काहींना दुप्पट पगार मिळाला. ज्या खात्यांमध्ये जास्तीचे पैसे जमा करण्यात आले, त्यातील काही खाती इतर बँकांचीही आहेत.

बँकेचे म्हणणे आहे की हे व्यवहार वेळापत्रकाच्या म्हणजे scheduling च्या समस्येमुळे असे झाले आहे. आता ही चूक सुधारण्यात आली आहे. डुप्लिकेट झालेल्या व्यवहारांची समस्या सोडवण्यासाठी बँक प्रयत्न करते आहे. बँक खातेदारांशी संपर्क करत आहे.

या घटनेनंतर बरीच चर्चा झाली. तिकडे ते खातेदार काय करतात माहीत नाही, पण विचार करा बँकेची अशी चूक आपल्याकडे घडली तर काय होईल?

शीतल दरंदळे

पुढची गोष्ट
लाइफस्टाइल५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजाफाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?
लाइफस्टाइल

सावधान! तुमच्या बँक खात्याचा 'खेचर' म्हणून वापर तर होत नाहीये ना?

सायबर गुन्हेगार तुमचे बँक खाते 'मनी लाँड्रिंग'साठी वापरू शकतात. 'म्यूल' बनून तुरुंगात जाण्यापेक्षा सावध राहा.

१६ फेब्रुवारी, २०२६

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!
लाइफस्टाइल

SBI ठरली जगातील सर्वोत्तम बँक, पण सोशल मीडियावर मात्र तुफान चर्चा!

Global Finance या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने SBI ला ‘World’s Best Consumer Bank’ हा बहुमान दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र बँकेच्या सेवेवरून भन्नाट विनोद व्हायरल होत आहेत.

२१ ऑक्टोबर, २०२६

बँका स्वतःच स्वतःचं 'मुंडण' का करून घेतात? समजून घ्या हेअरकटचं गणित
लाइफस्टाइल

बँका स्वतःच स्वतःचं 'मुंडण' का करून घेतात? समजून घ्या हेअरकटचं गणित

बड्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करताना बँका 'हेअरकट' कसा घेतात आणि सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होतो? सविस्तर विश्लेषण.

१ सप्टेंबर, २०२६

पीसी जेसी ॲण्ड आऊट: मनोरमा शेट्टी नावाच्या पात्राचा कागदोपत्री जन्म!
लाइफस्टाइल

पीसी जेसी ॲण्ड आऊट: मनोरमा शेट्टी नावाच्या पात्राचा कागदोपत्री जन्म!

बँक खाती उघडण्यासाठी नेटवर्क मार्केटिंगच्या आडून कागदपत्रे गोळा करणे आणि मनोरमा शेट्टीच्या बनावट खात्याची उभारणी.

६ ऑगस्ट, २०२६