मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

२०२० च्या संकटात भारतीयांनी केलेले १२ भन्नाट जुगाड...हे जुगाड नक्कीच कौतुकास्पद आहेत!!

4 मिनिट वाचन
शेअर करा:
२०२० च्या संकटात भारतीयांनी केलेले १२ भन्नाट जुगाड...हे जुगाड नक्कीच कौतुकास्पद आहेत!!

जुगाड हा भारतीयांचा स्वभाव आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत आहे त्या गोष्टीतून मार्ग काढण्यात भारतीयांचा हात कोणीही धरू शकत नाही. २०२० सालात करोनामुळे नवीन समस्या निर्माण झाल्या आणि भारतीय लोकांनी यातूनही खास भारतीय पद्धतीने मार्ग शोधून काढले. अशा खास जुगाडांची एक यादीच आम्ही आज घेऊन आलो आहोत. २०२० संपायला एक दिवस उरलेला आहे, यानिमित्ताने भारतीयांनी केलेले जुगाड नक्कीच पाहण्यासारखे आहेत.

१. करोना काळात सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे होते, पण लग्नही महत्त्वाचे आहे. म्हणून एका लग्नात चक्क पेंट रोलरने नवरीला हळद लावली गेली. याहून चांगला पर्याय शोधून सापडला नसता. 

२. मध्ये एकदा बँक ऑफ बडोदाच्या गुजरात शाखेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. बँकेतील कॅशियर चेक निर्जंतुक करण्यासाठी चक्क इस्त्रीचा वापर करताना दिसतायत.

३. हा जुगाड एका भारतीय शेतकऱ्याचा आहे. या शेतकऱ्याने ठिबक सिंचनासाठी ग्लुकोजच्या बाटल्यांचा वापर केलाय.

३. हा जुगाड एका भारतीय शेतकऱ्याचा आहे. या शेतकऱ्याने ठिबक सिंचनासाठी ग्लुकोजच्या बाटल्यांचा वापर केलाय.

४. भाज्या आणि फळे स्वच्छ करणे अत्यंत अवघड काम होते. यासाठी एका भारतीयाने तर थेट कुकरच्या वाफेचा वापर केला.

५. कोरोना तर येत-जात राहील ओ, पण दारू महत्त्वाची आहे. एका दारूविक्रेत्याने ग्राहकांना दारू विकण्यासाठी काय जुगाड केला हे तुम्ही फोटोत पाहूच शकता. 

५. कोरोना तर येत-जात राहील ओ, पण दारू महत्त्वाची आहे. एका दारूविक्रेत्याने ग्राहकांना दारू विकण्यासाठी काय जुगाड केला हे तुम्ही फोटोत पाहूच शकता. 

६. या जुगाडाचं नक्कीच कौतुक करायला हवं. झोपाळ्याच्या आधारे उदरनिर्वाह करणाऱ्या या माणसाने झोपाळ्यावरच सगळा संसार लादलेला दिसतोय. प्रवास करता यावा म्हणून झोपाळ्याला बाईक जोडली आहे.

७. वरतीच म्हटल्याप्रमाणे दारू महत्त्वाची आहे. यासाठी दुकानदार जसे प्रयत्नशील आहेत तसेच ग्राहकही प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूच्या एका ग्राहकाने तर स्वतःच्या रोबॉटलाच दारू आणायला पाठवलं.  

७. वरतीच म्हटल्याप्रमाणे दारू महत्त्वाची आहे. यासाठी दुकानदार जसे प्रयत्नशील आहेत तसेच ग्राहकही प्रयत्न करत आहेत. तामिळनाडूच्या एका ग्राहकाने तर स्वतःच्या रोबॉटलाच दारू आणायला पाठवलं.  

८. आकारानुसार फळांची विभागणी करण्यासाठी  या फळवाल्या भाऊने अगदी सोपी पण प्रभावी शक्कल लढवली आहे.

८. आकारानुसार फळांची विभागणी करण्यासाठी  या फळवाल्या भाऊने अगदी सोपी पण प्रभावी शक्कल लढवली आहे.

९. हा फोटो नोएडाचा आहे. लिफ्टला बोट लागू नये म्हणून एक टूथपिक्स ठेवलेले आहेत. एक टूथपिक काढायची आणि त्याने बटन दाबायचं. बटन दाबून झालं की टूथपिक खालच्या डब्यात टाकायची. स्वच्छता राखण्यासाठी हा मार्गही भारीच आहे.

१०. लॉकडाऊनमध्ये पाणीपुरी प्रेमींचे हाल झाले होते. म्हणून छत्तीसगडच्या रायपुर जवळील एका पाणीपुरीवाल्याने पानिपुरची मशीनच तयार केली. ग्राहक स्वतः पाणीपुरी घेऊन खाऊ शकतात अशी व्यवस्था या मशीनमध्ये होती.

११. दुधविक्रेत्याने दुधाचं वाटप करण्यासाठी एक लांब पाईप वापरला होता. या पाईपच्या माध्यमातून लांबूनच ग्राहकांना दुध मिळत होतं. आहे का नाही डोक्यालिटी ?

११. दुधविक्रेत्याने दुधाचं वाटप करण्यासाठी एक लांब पाईप वापरला होता. या पाईपच्या माध्यमातून लांबूनच ग्राहकांना दुध मिळत होतं. आहे का नाही डोक्यालिटी ?

सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी दुध विक्रेत्याने काय शक्कल लढवली पाहा !!

१२. आगरतळाच्या एका व्यक्तीने कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी एका नवीन बाईकचीच निर्मिती केली आहे. या बाईकमध्ये दोन सीटच्यामध्ये भरपूर जागा ठेवण्यात आली आहे.

१२. आगरतळाच्या एका व्यक्तीने कोरोना काळात सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी एका नवीन बाईकचीच निर्मिती केली आहे. या बाईकमध्ये दोन सीटच्यामध्ये भरपूर जागा ठेवण्यात आली आहे.

१३. अलीकडेच एका भारतीय शिक्षकाने पिरीयोडिक टेबल किंवा मराठीत सांगायचं तर आवर्त सारणी लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा आणि मजेशीर जुगाड शोधून काढला होता. हा व्हिडओ प्रचंड व्हायरल झाला.

१४. टोळधाड रोखण्यासाठी तयार केलेली मशीन

१४. टोळधाड रोखण्यासाठी तयार केलेली मशीन

तुम्हाला तर ठाऊक असेलच की काही महिन्यांपूर्वी टोळधाडीने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं होतं. या संकटातून बाहेर पडण्यासाठी एका शेतकऱ्याने एक मशीन तयार केली होती. या मशीनचा आकार विमानासारखा होता. त्यावर लावलेल्या पंख्यामुळे धातूचा डबा वाजायचा आणि त्यामुळे टोळधाड थांबायची.

१५. हा शेवटचा आणि अस्सल भारतीय जुगाड आहे. या बाईंनी सायकलला चक्की जोडली आहे. सायकल चालवून बाईंचा व्यायाम तर होतोच आहे पण घरच्या घरीच पीठही दळलं जात आहे.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलVim: एका डिशवॉशिंग लिक्विडने भारतीय किचन सिंक कसं काबीज केलं?पारंपरिक राख आणि साबणाऐवजी 'निंबू का पावर' या कल्पक रणनीतीने व्हिमने भारतातील डिशवॉशिंग मार्केटवर कसे राज्य केले?वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

भारतातील या ३ वस्त्रपरंपरांची निर्मिती करण्यासाठी लागतात कित्येक महिने!
लाइफस्टाइल

भारतातील या ३ वस्त्रपरंपरांची निर्मिती करण्यासाठी लागतात कित्येक महिने!

काही साड्या केवळ नेसण्यासाठी नसतात; त्या म्हणजे मानवी कौशल्य, संयम आणि कल्पकतेचा अद्भुत आविष्कार असतात. भारतातील तीन वस्त्रपरंपरा याचीच साक्ष देतात.

२७ ऑक्टोबर, २०२६

सातासमुद्रापार मेक्सिकोचा 'अन्नदाता' बनलेला एक विदर्भाचा वाघ: पांडुरंग खानखोजे
लाइफस्टाइल

सातासमुद्रापार मेक्सिकोचा 'अन्नदाता' बनलेला एक विदर्भाचा वाघ: पांडुरंग खानखोजे

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक ते मेक्सिकोत हरितक्रांती घडवणारे कृषी शास्त्रज्ञ; वाचा विदर्भाचे सुपूत्र पांडुरंग सदाशिव खानखोजे यांची गाथा.

८ सप्टेंबर, २०२६

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?
लाइफस्टाइल

'ॲव्होकॅडो'चा भारतीय बाजारात धुमाकूळ: आरोग्याचा नवा 'ट्रेंड' की केवळ महागडा फॅड?

महागडे विदेशी फळ असणाऱ्या ॲव्होकॅडोची भारतात वाढती मागणी आणि त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे याविषयी सविस्तर माहिती.

३१ जुलै, २०२६

भारतातलं असं गाव जिथे 'कार्ल मार्क्स' शेतात राबतो आणि 'लेनिन' शाळेत जातो!
लाइफस्टाइल

भारतातलं असं गाव जिथे 'कार्ल मार्क्स' शेतात राबतो आणि 'लेनिन' शाळेत जातो!

तामिळनाडूच्या वन्नी वेलाम पट्टी गावात गेल्या सात दशकांपासून मुलांची नावे मार्क्स, लेनिन आणि स्टॅलिन ठेवण्याची अनोखी परंपरा चालत आली आहे.

२९ जून, २०२६

पिवळा डबा आणि वनस्पती तूप: डालडाचा भारतीय घराघरांतील रंजक प्रवास
लाइफस्टाइल

पिवळा डबा आणि वनस्पती तूप: डालडाचा भारतीय घराघरांतील रंजक प्रवास

पामच्या झाडाचा पिवळा डबा आणि हिंदुस्थान लिव्हरच्या मार्केटिंगच्या जोरावर भारतीय स्वयंपाकघरांवर राज्य करणाऱ्या डालडाचा इतिहास.

९ जून, २०२६