मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

जगातील सर्वात मोठी फॅमिली बघितली आहे ?

2 मिनिट वाचन
शेअर करा:
जगातील सर्वात मोठी फॅमिली बघितली आहे ?

एकूण १८१ माणसे, ३९ बायका, ९४ मुले, १४ सुना, ३३ नातू आणि एक पणतू!! चक्कर आली ?

७० वर्षीय झीओना चाना नावाच्या गृहस्थाची ही फॅमिली आहे. मिझोरम मधल्या बट्वांग गावात १०० खोल्यांच्या घरात हे कुटुंब राहतं. ‘चाना’ या ख्रिस्ती पंथाचे झीओना हे प्रमुख आहेत. या समाजात बहुपत्नीत्वाला स्थान आहे. वयाच्या १७ वर्षी झीओना यांनी पहिले लग्न केलं होतं.

एवढ्या अवाढव्य कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी अन्नही तेवढंच अवाढव्य लागतं. एका दिवसात १०० किलो तांदूळ, ६० किलो बटाटे, ३९ चिकन फस्त केलं जातं. झीओनांच्या सगळ्या  ३९ बायका घर सांभाळणं तसेच शेतातील कामं करतात तर घरातील तरुण कारपेंटरचं काम करतात. झीओना यांच्या पहिल्या पत्नी घरातील सर्व हालचालींवर नजर ठेवून असतात. पूर्ण घराचं कामकाज एखाद्या मिलिटरी कँप प्रमाणे चालत असतं. एवढ मोठं कुटुंब असूनही सर्वजण मिळून मिसळून प्रेमानं राहतात हे ही एक नवलच आहे.

झीओना यांना एवढ्यावरच थांबायचं नाही, तर त्यांना पुढेही लग्न करण्याची इच्छा आहे. त्यासाठी ते मुलगी (बाई) शोधत आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणे “३९ जणींचा पती असल्या बद्दल आणि जगातील सर्वात मोठ्या फॅमिलीचा कुटुंबप्रमुख असण्या बद्दल स्वतःला मी भाग्यवान समजतो”.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!
लाइफस्टाइल

एका माचीसच्या काडीने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आग लावणारा इव्हार क्रुगर!

माचीसच्या मक्तेदारीच्या जोरावर युरोपमधील सरकारांनाच कर्जाच्या जाळ्यात ओढणाऱ्या स्वीडिश उद्योगपती इव्हार क्रुगरची थक्क करणारी कहाणी.

१४ ऑक्टोबर, २०२६

५ किलोमीटर लांब तिरंगा आणि दोन जागतिक विक्रम; हरयाणाने रचला इतिहास!
लाइफस्टाइल

५ किलोमीटर लांब तिरंगा आणि दोन जागतिक विक्रम; हरयाणाने रचला इतिहास!

पलवलमध्ये ५ किलोमीटर लांब तिरंगा पदयात्रेचे आयोजन करून हरयाणाने एकाच दिवशी दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स नोंदवले.

१७ ऑगस्ट, २०२६

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?
लाइफस्टाइल

इतिहासाची जिवंत कवाडं: म्युझियमची संकल्पना कशी जन्माला आली?

मेसोपोटेमियातील पहिल्या संग्रहालयापासून ते आजच्या आधुनिक म्युझियम्सपर्यंतचा रंजक प्रवास आणि त्याचे महत्त्व.

५ ऑगस्ट, २०२६

जगातील सर्वात 'कुरूप' बूट, ज्याने उभा केला अब्जावधींचा ब्रँड: क्रॉक्सची अजब यशोगाथा
लाइफस्टाइल

जगातील सर्वात 'कुरूप' बूट, ज्याने उभा केला अब्जावधींचा ब्रँड: क्रॉक्सची अजब यशोगाथा

सुरुवातीला फॅशनचा अपमान ठरवून हिणवल्या गेलेल्या क्रॉक्सने स्वतःच्या बेढबपणालाच ताकद बनवत अब्जावधी डॉलर्सचे साम्राज्य कसे उभे केले?

२४ जुलै, २०२६

भाषेचे राजकारण: 'या' १० भाषा जगावर राज्य करतायत!
लाइफस्टाइल

भाषेचे राजकारण: 'या' १० भाषा जगावर राज्य करतायत!

जगातील ७००० भाषांपैकी अर्धी लोकसंख्या फक्त १० भाषा बोलते. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून भूराजकीय वर्चस्वाचे शस्त्र कशी बनते, जाणून घ्या.

२२ जुलै, २०२६