मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

या करत आहेत कॉंक्रीटच्या जंगलात पारंपारिक शेती !!

3 मिनिट वाचन
शेअर करा:
या करत आहेत कॉंक्रीटच्या जंगलात पारंपारिक शेती !!

या जगात सगळं काही शक्य आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणारे  खूपच थोडे लोक असतात. अशाच एका व्यक्तीची आज आपण ओळख करून घेऊया !!


स्रोत

या आहेत ‘सुजाता नाफडे’. यांनी पुण्यातल्या पाषाण पुणे भागातल्या आपल्या ३५०० चौरस फुट जागेचं रुपांतर एका शेतात केलं आहे. या शेतात पिकं घेण्यापर्यंतच त्या थांबल्या नसून त्याही पुढे जात त्यांनी ‘ऑरगॅनीक शेती’ करण्याला पसंती दिली आहे. या ऑरगॅनीक शेती खत म्हणून त्या चक्क सुकलेला पाला पाचोळा वापरतात. 

केमिकल प्रोसेसने तयार भाज्या, फळे, खाद्यान्न शरीरास घातक असल्यामुळे त्यांचा वापर करू नये असं आपण नेहमी ऐकतो, पण सुजाता यांनी प्रत्यक्ष कृतीतून पारंपारिक शेतीचं महत्व दाखवून दिलंय. त्यांच्या १४ जणांच्या कुटुंबात याच शेतातली फळं-भाज्या खाल्ल्या जातात.


स्रोत

ऑरगॅनीक शेती म्हटलं की शेणखत आलंच. पण सुजाता या शेणखताचा देखील वापर करत नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणं, "पिकांची नैसर्गिकरीत्या वाढ होणे गरजेचं आहे. सुकलेल्या पानांचा खत म्हणून वापर केल्यामुळं आपण निसर्गाचं एक चक्र पूर्ण करतो. यामुळे निसर्ग आणि आपल्यात एक प्रकारे समतोल राखण्यास मदत होते."  त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या ‘मध्यस्थ दर्शन’ चा अभ्यास करत आहेत.

ज्या जागी त्या आज शेती करतात त्या जागी एकेकाळी बांधकामातून निघालेला कचरा जमा केला जायचा. त्यानंतर ती जागा सुजाता यांनी विकत घेतली आणि तिचं रुपांतर शेतीत केलं. त्यांच्या कुटुंबातली मंडळी रोज कमीत कमी १ तास शेतात काम करतात.  शिवाय त्यांनी रोजच्या कामासाठी एक माणूस देखील नेमला आहे.

भोपळा, शेंगा, कारली, करंद, कांघारा, अळू, अद्रक, हळद, कापूस, पपई, द्राक्ष, वाल, स्ट्रॉबेरी आणि अशाच अनेक झाडांची लागवड त्यांनी केली आहे. अशा एकूण ३४ प्रकारच्या भाज्या आणि ९ प्रकारची फळे त्या पिकवतात.


स्रोत


स्रोत

सुजाता पूर्वीपासून घराच्या गच्चीवर, अंगणात फळे-भाज्या पिकवण्याचं काम करत आहेत. २००८ पासून त्यांनी नैसर्गिक पद्धतीने झाडांची लागवड करायला सुरुवात केली. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी ऑरगॅनीक शेती करणाऱ्यांचा गट तयार केला आहे. 

राव, पुण्या सारख्या मेट्रो सिटीमध्ये, चारही बाजूंनी इमारतींनी बंदिस्त जागेत नैसर्गिकरीत्या शेती करणे खरंच कौतुकाचं आहे. सुजाता नाफडे यांनी खऱ्या अर्थाने ऑरगॅनीक शेतीचं महत्व आपल्याला दाखवून दिलं आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा
लाइफस्टाइल

५ हजार रुपयांतून गारमेंट साम्राज्य उभारणाऱ्या सरला आहुजा

फाळणीच्या विस्थापनानंतर ५ हजार रुपयांच्या बचतीवर जागतिक स्तरावर शाही एक्स्पोर्ट्सची निर्मिती करणाऱ्या महिला उद्योजक सरला आहुजा यांची प्रेरक गोष्ट.

२८ सप्टेंबर, २०२६

आंतरराष्ट्रीय योग दिन: संयुक्त राष्ट्रांच्या ठरावापासून जागतिक चळवळीपर्यंत प्रवास
लाइफस्टाइल

आंतरराष्ट्रीय योग दिन: संयुक्त राष्ट्रांच्या ठरावापासून जागतिक चळवळीपर्यंत प्रवास

२१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात कशी झाली आणि भारताचा हा वारसा जागतिक स्तरावर कसा पोहोचला?

२१ जून, २०२६

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!
लाइफस्टाइल

आपल्या विसरभोळेपणावर मॅकडोनाल्डसारख्या कंपन्या करतात कोट्यवधींची कमाई!

लोक गिफ्ट व्हाउचर्स विसरल्यामुळे किंवा मुदत संपल्यामुळे कंपन्या 'ब्रेकेज'च्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा नफा कसा कमावतात?

२० जून, २०२६

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!
लाइफस्टाइल

मदर्स डे: ज्या माऊलीने हा दिवस सुरू केला, तिनेच तो बंद करण्यासाठी आयुष्य पणाला लावलं!

मदर्स डेची सुरुवात करणाऱ्या ऍना जार्विस यांनी या दिवसाच्या व्यापारीकरणाविरुद्ध दिलेला लढा आणि त्यामागचा अस्वस्थ करणारा इतिहास.

१० मे, २०२६